मराठी बातम्या /बातम्या /religion /क्या बात है! या 5 राशींसाठी 2023चा पहिला महिना राहील खूप लकी, जानेवारीत उजळेल भाग्य

क्या बात है! या 5 राशींसाठी 2023चा पहिला महिना राहील खूप लकी, जानेवारीत उजळेल भाग्य

वर्ष 2023चा पहिला महिना या लोकांना खूप प्रगती देईल आणि धनलाभदेखील करेल.

वर्ष 2023चा पहिला महिना या लोकांना खूप प्रगती देईल आणि धनलाभदेखील करेल.

वर्ष 2023चा पहिला महिना या लोकांना खूप प्रगती देईल आणि धनलाभदेखील करेल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 28 डिसेंबर: डिसेंबर महिना सरून नवीन वर्ष सुरू होणार आहे. येणारं नवं वर्ष कसं असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे. 2023चा पहिला महिना काही राशींसाठी खूप चांगला असणार आहे. कोणाला नोकरीची बातमी आणि लग्नाचा प्रस्ताव येईल तर एखाद्याचे अडकलेले काम पूर्ण होईल. वर्ष 2023चा पहिला महिना या लोकांना खूप प्रगती देईल आणि धनलाभदेखील करेल. चला जाणून घेऊया त्या राशींबद्दल ज्यांचे भाग्य पुढील महिन्यात जागे होणार आहे.

या राशींसाठी जानेवारी 2023 खूप शुभ   

वृषभ जानेवारी 2023 : लग्न करू इच्छिणाऱ्या वृषभ राशीच्या लोकांसाठी वर्षाचा पहिला महिना खूप चांगला राहील. म्हणजेच, अविवाहित लोकांसाठी हे खूप शुभ असेल कारण त्यांचे लग्न निश्चित केले जाऊ शकते. जर आपण विवाहित जोडप्याबद्दल बोललो तर त्यांचे जीवन आनंदी होईल. जोडप्यांना संस्मरणीय सहलीला जाता येईल. नोकरदारांसाठी काळ चांगला आहे, पण कार्यालयीन राजकारणापासून दूर राहा.

कन्या जानेवारी 2023 : कन्या राशीला या महिन्यात आर्थिक लाभ होईल. अडकलेला पैसाही कुठून तरी येऊ शकतो. व्यावसायिक लोक त्यांच्या व्यवसायात नवीन कल्पना लागू करू शकतात. नोकरदारांवर कामाचा ताण कमी असल्याने दिलासा मिळेल. मित्रांच्या भेटीगाठी होतील. कुमारिकांचे विवाह निश्चित केले जाऊ शकतात. कुटुंबासोबत वेळ घालवता येईल.

धनु जानेवारी 2023 : वर्षाचा पहिला महिना धनु राशीच्या लोकांसाठी चांगला राहील. शुभ गोष्टी घडू शकतात ज्याची तुम्ही वाट पाहत होता. तुम्हाला तुमच्या लाइफ पार्टनरकडून सरप्राईज मिळू शकते. नात्यात प्रेम वाढेल. ऑफिसमध्ये तुमची प्रतिमा चांगली होईल. नोकरदार लोकांसाठी कार्यालयातील वातावरण चांगले राहील, परंतु कामाचा ताण नक्कीच राहील.

मकर जानेवारी 2023 : नवीन वर्षाचा पहिला महिना मकर राशींसाठी आनंदाने भरलेला असेल. कुटुंबातील कोणत्याही सदस्याशी संबंधित कोणतीही शुभ माहिती मिळू शकते. तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत विशेषत: तुमच्या पत्नीच्या आरोग्याबाबत काळजी घ्यावी. संतानसुख मिळू शकेल. व्यवसायात लाभ होऊ शकतो. जुन्या मित्रांसोबत बराच वेळ घालवाल.

तूळ जानेवारी 2023 : तूळ राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिना लाभदायक राहील. जवळच्या व्यक्तीसोबत सुरू असलेले वाद दूर होतील. घरात चांगले वातावरण राहील. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना ऑफर मिळू शकते. या महिन्यात आर्थिक स्थिती मजबूत राहील. लग्न होण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायात तेजी येईल. जवळच्या व्यक्तींसोबत सहलीला जाऊ शकता.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion