मुंबई, 15 जानेवारी: सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 15 जानेवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.
मेष (Aries)
काही महिन्यांपूर्वी तुम्ही घेतलेले काही रँडम निर्णय योग्य असल्याचं आता दिसून येईल. त्याचे सकारात्मक परिणाम जाणवतील. तुमच्या फ्रेंड सर्कलमधल्या काही व्यक्ती तुमच्याबद्दल काही समज निर्माण करतील. रागावर नियंत्रण ठेवा आणि वाद टाळा. एखाद्यानं अगदी विचार करून दिलेली भेट तुम्हाला भावूक करेल. लवकरच जोडीदारासोबत ट्रिप होण्याचे संकेत आहेत.
LUCKY SIGN - A cruise ship
वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)
तुम्हाला येत असलेल्या विविध अडचणींबाबत, विशेषतः कामाच्या बाबतीत येणाऱ्या अडचणींबाबत चांगलं मार्गदर्शन मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकार्य करणारे, तुमच्या गरजा समजून घेणारे सहकारी लाभले आहेत. त्या बाबतीत तुम्ही नशीबवान आहात. रिलेशनशिपमध्ये असलेल्यांना सध्याचा काळ संथ असल्याचं जाणवेल. परदेश प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तत्काळ बुकिंग प्रक्रिया करणं आवश्यक आहे.
LUCKY SIGN - A sparrow
मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)
गेल्या वर्षीपर्यंत अगदी स्वप्नवत वाटणारी एखादी गोष्ट आता प्रत्यक्षात येत असल्याचं दिसेल. त्यासाठी तुम्हाला विश्वासार्ह सहयोगीदेखील लाभतील. शंकाकुशंका काढल्याने वेग मंदावू शकतो. सध्याची व्हायब्रेशन्स रिसेट करण्यासाठी धार्मिक यात्रेचं नियोजन करू शकता. उशीर झाल्याने बिघडलेल्या गोष्टींची आठवण अस्वस्थ करेल; मात्र आता गोष्टी खूप सुरळीत पार पडतील याची खात्री बाळगा. बिझनेसची नवी संधी उत्साहवर्धक वाटेल.
LUCKY SIGN - A building
कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)
तुम्ही पूर्वी ज्या उत्साहाने काम करत होतात त्याच उत्साहाने आताही काम करणं महत्त्वाचं आहे. मनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न उपयोगी ठरेल. पूर्वी काही दुर्दैवी गोष्टी घडल्या असतील तर त्याला इलाज नाही. तुम्ही सगळीकडून सर्वांची मदत आणि पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न कायम राखू शकता. तुमचे आई-वडील लवकरच तुम्हाला सरप्राइज देतील. एखादी सहल तुम्हाला ताजंतवानं करील. तुमचा उत्साह वाढेल.
LUCKY SIGN - A sunrise
सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)
तुम्हाला चांगली कमाई करायची असेल तर तुम्हाला अथक मेहनत घेणं, तसंच सातत्यपूर्ण गुंतवणूक करणं आवश्यक आहे. एखाद्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी त्याचा आराखडा, नियोजन आवश्यक आहे. पूर्वी तुम्ही ज्यांच्यासाठी काम केलं आहे, अशा व्यक्ती तुमच्याकडून सल्ल्याची अपेक्षा करतील. त्यांना पूर्वी लाभ झाला होता. सध्या वेगवेगळ्या मार्गांनी विविध लाभ होण्याचे संकेत ग्रह देत आहेत. तुमच्या काही विधानांवर कुटुंबातलीच एखादी व्यक्ती आक्षेप घेण्याची शक्यता आहे. घरगुती आयुष्य शांततामय असेल. काही अडचणी आल्या, तरी तुम्ही त्या सहज सोडवू शकाल. सध्या संयम राखणं अत्यंत आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा.
LUCKY SIGN - Blue ray
कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)
नुसत्या पुस्तकी ज्ञानापेक्षा, शहाणपणापेक्ष आता अधिक व्यावहारिक ज्ञान आणि कृतिशील प्रयत्नांची गरज आहे. एखादा नवीन उपक्रम सुरू करण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी संधी शोधणं आणि संधी मिळवण्यासाठी सतत पाठपुरावा करणं आवश्यक आहे. जनसंपर्क वाढवून तुमचं नेटवर्क वाढवावं लागेल. या कामात जुन्या सहकाऱ्याची मदत उपयुक्त ठरेल. कुटुंबाचीही चांगली साथ मिळेल. तुमच्या कल्पना, योजनांमधल्या खूप गोष्टी लोकांशी शेअर करू नका. गोड खाण्यावर नियंत्रण ठेवा.
LUCKY SIGN - A brass statue
तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)
इतर दिवसांपेक्षा आजचा दिवस अधिक अनुकूल आहे. तुमच्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी अगदी योग्य काळ आहे. त्यामुळे आता वेळ न घालवता, योजना प्रत्यक्षात आणल्या पाहिजेत. खरेदी असो किंवा एखादा पेपर सबमिट करणं असो, या गोष्टी व्यवस्थित पूर्ण होतील. तुमच्या आवडत्या खेळात मन रमेल. मित्र-मैत्रिणींना भेटणं नवीन ऊर्जा, उत्साह देईल. तुम्ही ज्या गोष्टीची आतुरतेनं वाट पाहत आहात त्यासाठी अजून थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते.
LUCKY SIGN - A tie
वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)
तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल तातडीनं अंतिम निर्णय घेण्याचा विचार करत असाल. परंतु सध्या त्यासाठी परिस्थिती अनुकूल नाही. तुम्हाला जी गोष्ट सगळ्यांना सांगायची आहे. ती सध्या तरी सांगू नका. दुसऱ्याच्या गोष्टीत नाक खुपसू नका. आता घेतलेल्या एखाद्या कठोर निर्णयाचा तुम्हाला नंतर पश्चाताप होऊ शकतो. बऱ्याच काळापासून काम करत असलेली एखादी योजना आता आकार घेऊ शकते. नियमित व्यायाम केल्याने तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर होऊ शकतील.
LUCKY SIGN - Violet flowers
धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)
काही तरी जादू घडल्यासारखं वाटेल. अनेक विस्कटलेल्या, विखुरलेल्या गोष्टी एकत्र येत असल्यासारखं वाटेल. लग्नाचे प्रस्ताव येतील. बिघडलेल्या नात्यालाही नवी पालवी फुटण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या संवादातली दरी दूर होईल. काही प्रभावी व्यक्तींची भेट होईल. या व्यक्ती आगामी काळात उपयोगी पडतील. तुमचा दृष्टिकोन, भूमिका व्यक्त करण्यास अजिबात संकोच करू नका. त्यामुळे तुमचं कौतुकच होईल. एखाद्या महत्त्वाच्या गेट-टुगेदरचं आमंत्रण मिळू शकतं.
LUCKY SIGN - A butterfly
मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)
तुमच्या प्रामाणिक हेतूने आणि गांभीर्याने तुम्ही इतरांना आश्चर्यचकित कराल. काही वेळा कोणत्याही कारणाशिवाय लोकांना स्वतःहून कॉल करणं चांगलं ठरेल. तुमची मैत्रीपूर्ण वृत्ती तुम्हाला अनेक संधी मिळवून देईल. क्षमतेपेक्षा जास्त मोठं वचन देऊ नका. कारण कमी वेळेत जास्त काम करण्याची वेळ येऊ शकते आणि कामाला उशीर होऊ शकतो. तुमच्या कुटुंबातली एखादी वडीलधारी व्यक्ती तुमच्याकडून काही ऐकण्याची वाट पाहत असेल. तुम्हाला जबरदस्तीने स्वयंपाकघरात अधिक वेळ घालवावा लागू शकेल.
LUCKY SIGN - A candle stand
कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)
सोशलायझिंग हा तुमचा फोकस असेल आणि आणि तुम्ही दर दोन-चार दिवसांनी बाहेर जाण्याचा विचार करत असाल, तर त्यावर काही निर्बंध घालणं आवश्यक आहे. याचा तुमच्या कामाला आणि मनःशांतीला फटका बसत आहे, हे लक्षात घ्या. तुमची कौशल्यं, ज्ञान अद्ययावत करण्यासाठी ही अगदी योग्य वेळ आहे. एखाद्या कनिष्ठ सहकाऱ्याला तुमच्याकडून प्रेरणा मिळू शकते. तुम्हाला लेखनाची आवड असल्यास, आता लेखसंग्रह तयार करण्याची आणि त्याच्या औपचारिक प्रकाशनाबाबत विचार करण्याची वेळ आली आहे. सर्जनशील व्यक्तींना नवीन संधी मिळतील. डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येऊ नये यासाठी आपल्या पचनसंस्थेची योग्य काळजी घ्या.
LUCKY SIGN - Calming music
मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)
अनेक तंत्रांवर तुम्ही प्रभुत्व मिळवलं असेल, पण तरीही नम्र वृत्ती बाळगणं आवश्यक आहे. काही वेळा तुम्ही विनम्रता विसरता आणि लोकांशी चुकीच्या पद्धतीने बोलता. आज तुम्ही जिथं पोहोचला आहात तिथवर येण्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतली असेल; मात्र त्याबाबत गर्व असून उपयोग नाही, याची आंतरिक जाणीव असणं आवश्यक आहे. आता तुमच्याकडे खूप संपत्ती असेल, लहानपणी असलेल्या परिस्थितीपेक्षा आता तुमची परिस्थिती खूप चांगली असेल, तुम्ही आता तेव्हापेक्षा खूप चांगलं आयुष्य जगत असाल, तरीही तुम्ही सर्व काही साध्य केलेलं नाही. संतुलित जीवन जगण्यासाठी तुम्हाला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. रचनात्मक टीका जरूर करा; पण विनाकारण टीका करू नका.
LUCKY SIGN - A thrilling novel
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion