मराठी बातम्या /बातम्या /religion /

भारतातील अशी मंदिरं जिथे प्रसाद म्हणून भक्तांमध्ये वाटलं जातं मांस, वाचा माहिती

भारतातील अशी मंदिरं जिथे प्रसाद म्हणून भक्तांमध्ये वाटलं जातं मांस, वाचा माहिती

सोर्स : गुगल

सोर्स : गुगल

बऱ्याच लोकांचा असा समज आहे की, हिंदू मंदिरात मांसाहार आणलं जात नाही किंवा खात नाही, तसेच हे देवाला देखील आवडत नाही. तुम्ही देखील असंच विचार करत असाल, तर हा तुमचा गैरसमज आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 5 सप्टेंबर : आपल्याला आजूबाजूला आपल्याला असे अनेक लोक पाहायला मिळतील ज्यांची देवावर अपरंपार भक्ती आहे. लोक आपआपल्या श्रद्धे प्रमाणे देवाला पूजा आणि प्रसाद अर्पण करतात. आपल्या देशात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहातात आणि ते आपल्या चालीरिती फॉलो देखील करतात.

बऱ्याच लोकांचा असा समज आहे की, हिंदू मंदिरं ही पवित्र असतात आणि येथे मांसाहार आणलं जात नाही किंवा खात नाही, तसेच हे देवाला देखील आवडत नाही. तुम्ही देखील असंच विचार करत असाल, तर हा तुमचा गैरसमज आहे. कारण भारतात असे अनेक हिंदू मंदिरं आहेत. जेथे देवाला मांस दिलं जातं.

भारतात अशी अनेक मंदिरे आणि धार्मिक स्थळे आहेत जिथे मांस अर्पण केले जाते आणि प्रसाद म्हणून त्याचं वाटप देखील केलं जाते. ही मंदिरे देशातील विविध राज्यांमध्ये आहेत. चला त्या मंदिरांची नावे जाणून घेऊया आणि तेथे भाविकांना प्रसादामध्ये काय मिळतं हे जाणून घेऊया.

हे वाचा : या गोष्टींचे गुप्त दान मानले जाते महादान! मनोकामना पूर्ण होण्यासाठी नक्की करावे असे दान

सोर्स : गुगल

सोर्स : गुगल

तामिळनाडूच्या मुनियादी स्वामी मंदिरात प्रसाद म्हणून चिकन आणि मटण बिर्याणी दिली जाते.

सोर्स : गुगल

सोर्स : गुगल

आसामच्या कामाख्या देवी मंदिरात मासे आणि मांस अर्पण केलं जातं.

सोर्स : गुगल

सोर्स : गुगल

बंगालच्या तारापीठ मंदिरात प्रसाद म्हणून मासे आणि मांस दिलं जातं.

सोर्स : गुगल

सोर्स : गुगल

ओडिशातील पुरी येथील बिमला देवी मंदिरात मटण आणि माशांपासून बनवलेला प्रसाद मिळतो.

सोर्स : गुगल

सोर्स : गुगल

केरळमधील पारासनिक करावू मंदिरात मासे आणि ताडी अर्पण केली जाते.

सोर्स : गुगल

सोर्स : गुगल

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील तारकुल्हा देवी मंदिरात बकरीचे मांस प्रसाद म्हणून दिलं जातं.

सोर्स : गुगल

सोर्स : गुगल

पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध कालीघाट मंदिरात बकरीचे मांस अर्पण केले जाते.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश कोणाच्या ही भावना दुखवणे नाही तर फक्त माहिती देणं आहे.)

First published:

Tags: Shocking news, Temple, Viral news