मुंबई, 10 डिसेंबर : जमीन खरेदी करणे किंवा घर बांधणे हे मालकासाठी कधी शुभ तर कधी अशुभ ठरू शकते. याची अनेक कारणे शास्त्रात सांगितली आहेत. जमिनीचा कोणताही भाग उंच किंवा खोलगट असणं हे त्यापाठीमागील एक कारण असू शकते. वास्तुशास्त्राव्यतिरिक्त नारद पुराण आणि वाल्मिकी रामायणातही याचा उल्लेख केला आहे. जमीन काही ठिकाणी उंच काही ठिकाणी खोलगट असण्याच्या परिणामांविषयी आज जाणून घेणार आहोत.
वाल्मिकी रामायण आणि नारदपुराणानुसार शुभ भूमी -
पंडित रामचंद्र जोशी यांच्या मते, वाल्मिकी रामायणात भगवान रामाने स्वतः भाऊ लक्ष्मणाला शुभ भूमीबद्दल सांगितले होते. सुग्रीवाच्या राज्याभिषेकानंतर भगवान राम प्रवस्त्रनगरीच्या शिखरावर राहण्यासाठी गुहा निवडतात. त्यावेळी ते लक्ष्मणाला जागेबद्दल सांगतात की, इथली जागा ईशान्येकडून खाली गेलेली आहे. म्हणूनच ही गुहा आपल्या निवासासाठी खूप चांगली असेल. नैऋत्य कोनाकडे त्याची उंची वारा आणि पावसापासून संरक्षण करण्यास उपयुक्त ठरेल. तसेच नारद पुराणात लिहिले आहे की, ईशान्य, पूर्व आणि उत्तर दिशेला सखल जमीन सर्वांसाठी लाभदायक असते. तर इतर दिशांना सखल जमीन हानीकारक ठरू शकते.
वास्तुशास्त्रानुसार जमिनीच्या उंचीचा प्रभाव -
पंडित जोशी यांच्या मते, वास्तुशास्त्रानुसार पूर्वेला उच्च असलेली जमीन संपत्तीचा नाश करणारी आणि पूर्वेला उतार असलेली जमीन ही पुत्रप्राप्ती आणि संपत्ती वाढवणारी मानली जाते.
पश्चिमेकडे उंच असलेली जमीन पुत्र आणि संपत्ती देते. तर पश्चिमेकडे उतार असलेली जमीन या दोन्हीं गोष्टी नष्ट करते.
उत्तरेकडील उंच भूमी पुत्र आणि संपत्ती नष्ट करते आणि उताराची जमीन संपत्ती-धान्य आणि घराणेशाही वाढवणारी असते.
दक्षिणेकडील उंच भूमी रोगराई घालवणारी आणि प्रत्येक इच्छा पूर्ण करणारी असते. उताराची जमीन रोग आणि मृत्यूचे कारण ठरू शकते.
नैऋत्य दिशेला उंच असलेली जमीन पैसे देणारी मानली जाते. तर या दिशेला उताराची जमीन धन-धान्य नाशक, रोगराई आणि चोराची भीती निर्माण करते.
वायव्य दिशेला उंच असलेली भूमी धन आणि सुख देणारी असते. या दिशेला उताराची जमीन परदेशात राहण्यास कारणीभूत ठरू शकते, कलह आणि रोगराई वाढते, धान्य नष्ट होते आणि मृत्यू होतो.
आग्नेय कोनात उंच जमीन धनवृद्धीसाठी शुभ असते. तर सखल जमीन संपत्तीचा नाश करणारी, आग आणि मृत्यूची भीती दर्शवणारी आहे.
ईशान्येकडील उंच जमीन ही मोठी आपत्ती मानली जाते. तर सखल जमीन ज्ञान, संपत्ती, रत्ने-दागिने आणि आनंद देणारी मानली जाते.
जागेच्या मध्यभागी सखल जमीन रोगराई वाढवून सर्वनाश घडवणारी मानली जाते.
हे वाचा - ॐ च्या शक्तीचे रहस्य अगाद! फक्त नामस्मरण करण्याचा असा होतो फायदा
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.