मराठी बातम्या /बातम्या /religion /

Vastu: नवीन घर बांधणीसाठी हे 5 महिने असतात शुभ; नाहीत राहत कोणते वास्तुदोष

Vastu: नवीन घर बांधणीसाठी हे 5 महिने असतात शुभ; नाहीत राहत कोणते वास्तुदोष

घर बांधणीसाठी शुभ महिने

घर बांधणीसाठी शुभ महिने

आज आम्ही तुम्हाला ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार घर बांधणीसाठी शुभ आणि अशुभ महिन्यांबद्दल सांगत आहोत. याबाबत लक्षात घेऊन घराचे बांधकाम शुभ महिन्यांत केले तर घर आणि कुटुंब सुख-समृद्धीने भरून जाऊ शकते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

मुंबई, 06 डिसेंबर : नवीन घर बांधून त्यात आनंदानं राहायचं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण, प्रत्येकाचंच हे स्वप्न पूर्ण होत नाही. घर बांधूनही अनेक लोकांना त्यात समाधानानं राहता येत नाही. याचे एक कारण, घराच्या बांधकामाचा महिना योग्य नसणे हे असू शकते. आज आम्ही तुम्हाला ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार घर बांधणीसाठी शुभ आणि अशुभ महिन्यांबद्दल सांगत आहोत. याबाबत लक्षात घेऊन घराचे बांधकाम शुभ महिन्यांत केले तर घर आणि कुटुंब सुख-समृद्धीने भरून जाऊ शकते.

घर बांधणीसाठी शुभ महिना -

पंडित रामचंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार वर्षातील 12 महिन्यांपैकी पाच हिंदू महिने घरबांधणी सुरू करण्यासाठी शुभ मानले जातात. हे महिने वैशाख, श्रावण, कार्तिक, मार्गशीर्ष आणि फाल्गुन आहेत. धार्मिक मान्यतेनुसार या महिन्यांमध्ये घराचे बांधकाम सुरू केल्याने घरात सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते. यामध्ये वैशाख महिन्यात घर बांधणी सुरू केल्याने धन, पुत्र आणि आरोग्य प्राप्त होते.

श्रावण महिन्यात घर सुरू केल्याने प्राणी, पैसा आणि मित्रांची संख्या वाढते, असे मानले जाते. कार्तिक महिन्यात घर बांधल्याने पुत्रप्राप्ती, आरोग्य आणि संपत्ती प्राप्त होते. तर मार्गशीर्ष महिन्यात घर बांधणी सुरू केल्यास उत्तम अन्नधान्य आणि धनासोबत वंशवृद्धी होते. फाल्गुन महिन्यातही घर बांधणी शुभ असते. काही ग्रंथांमध्ये आषाढ महिन्याला घर बांधणी सुरू करण्यासाठीही शुभ मानले गेले आहे. मात्र, या महिन्यात घर बांधणे हे प्राण्यांचा नाश करणारे आहे, असे मानले जाते.

घर बांधण्यासाठी अशुभ महिने -

पंडित जोशी यांच्या मते ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात चैत्र, ज्येष्ठ, भाद्रपद, अश्विन, पौष आणि माघ महिन्यात घरबांधणी करण्यास मनाई आहे. शास्त्रानुसार चैत्र महिन्यात घर बांधणी सुरू केल्याने रोग आणि दुःखद घटना घडतात. ज्येष्ठ महिन्यात घर सुरू करणे अडचणी आणि मृत्यूचे कारण ठरते. भाद्रमासात नवीन घर बांधल्याने मित्रांबरोबर दुरावा, दारिद्र्य आणि विनाश होण्याची शक्यता असते.

हे वाचा - ॐ च्या शक्तीचे रहस्य अगाद! फक्त नामस्मरण करण्याचा असा होतो फायदा

आश्विन महिन्यात घरबांधणी केल्यानं कलह आणि पत्नीचा नाश होतो, पौष महिन्यात घरकाम केल्याने चोरांची भीती वाढते आणि माघ महिन्यात घरकाम केल्याने आगीची भीती असते. त्यामुळे या महिन्यांमध्ये नेहमी घरबांधणी करणं टाळावं.

वाचा - 'चोर' ते 'रोग'.. पंचकाचे आहेत इतके प्रकार; अग्नी पंचकात का टाळावीत शुभ कार्ये?

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Lifestyle, Religion, Vastu