मराठी बातम्या /बातम्या /religion /

Haritalika Vrat 2022 : वैवाहिक जीवनात आनंद, आर्थिक भरभराटीसाठी हरितालिकेला करा हे खास उपाय

Haritalika Vrat 2022 : वैवाहिक जीवनात आनंद, आर्थिक भरभराटीसाठी हरितालिकेला करा हे खास उपाय

हरितालिका तृतीयेला करा हे उपाय

हरितालिका तृतीयेला करा हे उपाय

या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करून निर्जला व्रत ठेवले जाते. विवाहित महिलांनी या दिवशी व्रत केल्याने वैवाहिक जीवनात सुख-शांती येते आणि संतती प्राप्त होते अशी मान्यता आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 30 ऑगस्ट : हरितालिका तृतीयेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हा सण भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरा केला जातो. यंदा हा सण आज म्हणजेच मंगळवारी 30 ऑगस्ट रोजी साजरा होत आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करून निर्जला व्रत ठेवले जाते. विवाहित महिलांनी या दिवशी व्रत केल्याने वैवाहिक जीवनात सुख-शांती येते आणि संतती प्राप्त होते अशी मान्यता आहे. तसेच अविवाहित मुलींना आपला इच्छित वर मिळतो अशी देखील श्रद्धा आहे. धार्मिक मान्यतेनुसार हरितालिका तृतीयेला शिवप्रभू आणि माता पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी काही विशेष उपाय केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.

हरितालिका तृतीयेला करा हे उपाय

- हरितालिका तृतीयेच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीला खीर अर्पण करावी. असे केल्याने वैवाहिक जीवनात प्रेम टिकून राहते आणि पती-पत्नीचे नाते खूप गोड होते.

Ganpati Aarti 2022: यंदा न चुकता म्हणा बाप्पाची आरती! व्हॉट्सअ‍ॅपला ठेवा हे खास स्टेटस

- या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा दुधात केशर मिसळून अभिषेक करावा. यामुळे पती-पत्नीमध्ये सुरू असलेले मतभेद संपतात.

- हरितालिका तृतीयेला माता पार्वतीला तूप अर्पण केल्यानंतर ते तूप दान करावे. असे केल्याने आजारी व्यक्तीला आजारातू मुक्त होण्यास मदत होते.

- या दिवशी भगवान शंकराला चमेलीचे फूल अर्पण केल्याने वाहन प्राप्तीचे सुख मिळते अशी धार्मिक मान्यता आहे.

- घरामध्ये धन आणि ज्ञान टिकवून ठेवण्यासाठी या दिवशी देवी पार्वतीला आंबा आणि उसाच्या रसाने अभिषेक करावा. हा उपाय केल्याने घरात लक्ष्मी आणि सरस्वतीचा सदैव वास राहतो.

Vastu Tips : मोहरीचा हा उपाय केल्यास होईल आर्थिक भरभराट; काही दिवसांतच बदलेल तुमचं नशीब

- हरितालिका तृतीयेच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीला कापूर, अगरू, केशर, कस्तुरी आणि कमळाच्या पाण्याने अभिषेक केल्याने सर्व प्रकारचे दु:ख आणि पापांचा नाश होतो आणि सत्कर्मात यश मिळते असे मानले जाते.

First published:

Tags: Culture and tradition, Lifestyle, Religion