मराठी बातम्या /बातम्या /religion /गुरु ग्रहाच्या उदयामुळं बनतोय हंस राजयोग; या 3 राशीच्या लोकांना खास फायदा

गुरु ग्रहाच्या उदयामुळं बनतोय हंस राजयोग; या 3 राशीच्या लोकांना खास फायदा

गुरू ग्रहाचे राशीपरिवर्तन

गुरू ग्रहाचे राशीपरिवर्तन

अनेक ग्रहांच्या उदय काळामुळे शुभ योग तयार होतात, जे काही राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असतात. आज आपण गुरू ग्रहाच्या राशीपरिवर्तनाबद्दल बोलत आहोत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 30 जानेवारी : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाचा एका ठराविक काळाने उदय आणि अस्त होतो. एका राशीतून दुसऱ्या राशीत जाताना उदय आणि अस्ताची क्रिया सुरू असते. ज्याचा थेट परिणाम 12 राशींवर होताना दिसतो. अनेक ग्रहांच्या उदय काळामुळे शुभ योग तयार होतात, जे काही राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असतात. आज आपण गुरू ग्रहाच्या राशीपरिवर्तनाबद्दल बोलत आहोत. गुरू ग्रह 29 एप्रिल 2023 रोजी उदयास येत आहे. त्यामुळे हंस राजयोग तयार होत आहे. ज्याचा शुभ प्रभाव विशेषत: 3 राशींवर दिसेल. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून त्या तीन राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

मीन -

ज्योतिष शास्त्रानुसार ज्यांची राशी मीन आहे, त्यांच्यासाठी गुरूचा उदय म्हणजेच हंसराज योग फायदेशीर ठरू शकतो. गुरू मीन राशीच्या चढत्या घरात प्रवेश करत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल, त्यांना जीवनसाथीची साथ मिळेल, पैशाचे नवीन स्रोत निर्माण होतील, व्यवसायात प्रगती होईल. पण 17 जानेवारीपासून मीन राशीच्या लोकांसाठी साडेसातीचा काळ सुरू झाला आहे. त्याचा परिणाम आरोग्यावर दिसून येईल. या दरम्यान मीन राशीचे लोक मानसिक तणावातून जातील.

धनु -

ज्या लोकांची राशी धनु आहे, त्यांच्यासाठी हंसराज योग लाभदायक ठरू शकतो. तुमच्या कुंडलीच्या दुसऱ्या घरात गुरूचा उदय होणार आहे. यामुळे तुम्हाला अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. दिलेले पैसे परत मिळू शकतात. या काळात तुम्ही केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल आणि पैसा वाढेल. आर्थिक स्थिती सुधारेल, 17 जानेवारीला शनीची साडेसाती संपली आहे. या दरम्यान मालमत्ता किंवा वाहन खरेदीची शक्यता आहे.

हे वाचा - आनंददायी, मोहक, प्रभावशाली असतात R आद्याक्षराच्या व्यक्ती; भावतो त्यांचा हा गुण

कर्क -

ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांची राशी कर्क आहे, त्यांच्यासाठी हंसराज योग करिअर आणि बिझनेसमध्ये यश मिळवून देतो. भाग्य साथ देईल, विद्यार्थ्यांना यश मिळेल. नोकरीच्या चांगल्या ऑफर मिळू शकतात, जे लोक परदेशात जाण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ उत्तम आहे.

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Rashichark