मराठी बातम्या /बातम्या /religion /16 वर्षे चालते गुरुची महादशा! कुंडलीतील गुरुबलानं एखाद्याची आश्चर्यकारक होते प्रगती

16 वर्षे चालते गुरुची महादशा! कुंडलीतील गुरुबलानं एखाद्याची आश्चर्यकारक होते प्रगती

गुरूची महादशा

गुरूची महादशा

एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात गुरूची महादशा म्हणजे सुवर्णकाळ ठरतो. ज्योतिषशास्त्राच्या मते, गुरूची महादशा व्यक्तीच्या कुंडलीत 16 वर्षे टिकते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 19 मार्च : वैदिक शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात ग्रहांच्या दशा आणि महादशांना सामोरं जावं लागतं. हिंदू धर्मग्रंथानुसार शनि हा सर्वात क्रूर ग्रह मानला जातो. ग्रहांच्या दशा आणि महादशांचा माणसाच्या जीवनावर खोलवर प्रभाव पडतो, असे मानले जाते. ज्योतिष शास्त्रात गुरू ग्रहाला वैवाहिक जीवन आणि सुखाचा कारक ग्रह असे मानले आहे, ज्यामुळे भाग्य वाढते. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरू शुभस्थानी असेल तर जीवनात यश आणि आनंद मिळतो. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात गुरूची महादशा म्हणजे सुवर्णकाळ ठरतो. ज्योतिषशास्त्राच्या मते, गुरूची महादशा व्यक्तीच्या कुंडलीत 16 वर्षे टिकते. यादरम्यान त्या व्यक्तीला वेगात प्रगती होते, असे मानले जाते. भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तुतज्ज्ञ पंडित हितेंद्र कुमार शर्मा या विषयावर अधिक माहिती देत आहेत.

गुरूची महादशा भाग्य उजळते- ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरू शुभस्थानी असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनात भरपूर प्रगती होते. जी इतरांच्या नजरेत सहज येते. गुरूची महादशा सुरू असेल तर व्यक्तीला प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळते. अशुभाचेही नशिबात रूपांतर होते आणि व्यक्तीला वैवाहिक सुखासोबत आर्थिक आनंदही मिळतो.

याशिवाय कुंडलीत गुरू दुर्बल असेल तर ते व्यक्तीला दुःख, त्रास सहन करावा लागू शकतो. अशा लोकांचे उशिरा लग्न होते. त्यांना आयुष्यात पुन्हा-पुन्हा अपयशाला सामोरं जावं लागतं. त्यांच्या कारकिर्दीत अडथळे आणि अडचणी येतात. आर्थिक तंगीचाही सामना करावा लागू शकतो.

गुरूच्या महादशेमध्ये हे उपाय करा

1. जर तुमच्या कुंडलीत गुरु कमजोर असेल तर तुम्ही गुरुवारी व्रत ठेवावे. या दिवशी भगवान विष्णू आणि गुरू ग्रहाची पूजा केल्याने लाभ होईल.

2. दर गुरुवारी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून आंघोळ करावी. शक्य असल्यास, असं दररोज करा, असे केल्याने तुमचे दुर्दैव सौभाग्यामध्ये बदलू शकते.

3. एखाद्या व्यक्तीच्या लग्नाला उशीर होत असेल किंवा कोणत्याही कारणाने वैवाहिक जीवनात अडचण येत असेल, तर गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केल्यास फायदा होईल.

4. गुरुवारी पिवळी हरभरा डाळ आणि पिवळी मिठाई गरीब आणि गरजू लोकांना दान करणे शुभ असते. असे केल्याने कुंडलीत गुरु बलवान होतो, असे मानले जाते.

हे वाचा - मिठाचे हे उपाय नकारात्मकतेला काढतात उंबरठ्याबाहेर; घर राहतं हसतं-खेळतं

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Culture and tradition, Religion