मराठी बातम्या /बातम्या /religion /गुरुचा 28 मार्चला होतोय अस्त, या 6 राशींवर होणार नकारात्मक परिणाम, जाणून घ्या सविस्तर

गुरुचा 28 मार्चला होतोय अस्त, या 6 राशींवर होणार नकारात्मक परिणाम, जाणून घ्या सविस्तर

ज्योतिषशास्त्रात गुरुचा अस्त होणं शुभ मानलं जात नाही. जेव्हा गुरु ग्रहाचा अस्त होतो तेव्हा लग्न, धार्मिक किंवा शुभ कार्य केलं जात नाही. गुरु ग्रहाच्या अस्तामुळे जवळपास सर्वच राशींवर प्रभाव पडतो.

ज्योतिषशास्त्रात गुरुचा अस्त होणं शुभ मानलं जात नाही. जेव्हा गुरु ग्रहाचा अस्त होतो तेव्हा लग्न, धार्मिक किंवा शुभ कार्य केलं जात नाही. गुरु ग्रहाच्या अस्तामुळे जवळपास सर्वच राशींवर प्रभाव पडतो.

ज्योतिषशास्त्रात गुरुचा अस्त होणं शुभ मानलं जात नाही. जेव्हा गुरु ग्रहाचा अस्त होतो तेव्हा लग्न, धार्मिक किंवा शुभ कार्य केलं जात नाही. गुरु ग्रहाच्या अस्तामुळे जवळपास सर्वच राशींवर प्रभाव पडतो.

  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India

भोपाळ, 27 मार्च : गुरुचा २८ मार्च रोजी मीन राशीमधून अस्त होणार असून २२ एप्रिल रोजी मेष राशीत प्रवेश करेल तर २७ एप्रिलला उदय होईल. ज्योतिषशास्त्रात गुरुला शिक्षण, विवाह, संतती, धन, भाग्याचा कारक ग्रह मानलं जातं. गुरू सूर्यापासून ११ अंश किंवा त्यापेक्षाही जवळ जातो तेव्हा अस्त होतो. यावेळी त्याची ताकद कमी होते असं म्हटलं जातं.

ज्योतिषशास्त्रानुसार गुरुचा अस्त होण्याचा परिणाम प्राण्यांच्या जीवनावर होतो. या कारणामुळेच गुरुचा अस्त होणं शुभ मानलं जात नाही. याचा जवळपास एक महिनाभर अनेक राशींवर नकारात्मक परिणाम होणार आहे. भोपाळमधील ज्योतिष पंडित हितेंद्र कुमार यांनी या राशींवर होणाऱ्या परिणामांबद्दल माहिती दिलीय.

मेष

गुरु ग्रहाचा अस्त झाल्याने मेष राशीच्या लोकांना संमिश्र परिणाम दिसून येतील. नशीब साथ देणार नाही, तर आई-वडील आणि गुरुंचीसुद्धा साथ लाभणार नाही. कष्टानुसार फळ मिळणार नाही. मन विचलित राहू शकते. अध्यात्मिक कार्याकडे कमी ओढा राहील. तुम्ही तीर्थ यात्रा, परदेशात किंवा मोठा प्रवास करण्याचा प्रयत्न करत असाल तर तो टाळणे योग्य राहील.

कसा असेल 27 मार्चचा दिवस? एखादं बिझनेस प्रपोझल तुमच्यासमोर येईल

वृषभ

वृषभ राशीत गुरु ग्रह आठव्या आणि ११ व्या स्थानाचे स्वामी असतात. ११ व्या स्थानीच गुरुचा अस्त होणार आहे. यामुळे वृषभ वाल्यांना चांगले आणि वाईट असे अनुभव येऊ शकतात. आरोग्य सुधारेल. दुसऱ्या बाजूला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही खर्चाला मर्यादा घालायला हवी. मित्र किंवा भावांकडून मदत मिळण्याची शक्यता कमी आहे.

कन्या

गुरु ग्रहाचा अस्त झाल्याने कन्या राशीच्या लोकांना त्यांच्या जोडीदाराच्या आणि आईच्या तब्येतीच्या समस्या उद्भवू शकतात. घरात वादाची स्थिती निर्माण होऊ शकते. विवाहीत लोकांच्या आयुष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. घरात आणि बाहेर कोणत्याही वादापासून दूर रहा. खर्चात वाढ होऊ शकते. आपले म्हणणे इतरांसमोर स्पष्टपणे मांडा.

मिथुन

मिथुन राशी गुरु ग्रहाच्या सातव्या आणि दहाव्या स्थानाची स्वामी आहे. दहाव्या स्थानी गुरुचा अस्त होत आहे. यामुळे या राशीच्या लोकांना प्रगतीत अडथळे येऊ शकतात. तुमच्या कार्यक्षेत्रात आणखी कष्ट करावे लागेल. यावेळी तुमचे हितशत्रू तुम्हाला अडचणीत आणू शखतात. याशिवाय गुरुचा अस्त झाल्याने तुमच्या वैवाहिक आयुष्यातही समस्या जाणवू शकतात.

मकर

गुरु ग्रहाच्या अस्तामुळे मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात जोडीदारासोबत काही समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. लहान बहीण भावांसोबतचे नाते बिघडू शकते. आर्थिक मुद्द्यांवर वाद घालू नका. तुम्हाला आत्मविश्वास कमी झाल्यासारखे जाणवेल. तसंच मानसिक तणावाची स्थिती असेल. कोर्ट कचेरीपासून स्वत:ला दूर ठेवा.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांना संततीकडून अडचणींचा सामना करावा लागेल. मुलांच्या वागण्यात अचानक बदल होऊ शकतो किंवा त्यांची प्रकृती बिघडू शकतो. तुम्ही भावना व्यक्त करण्यात अपयशी ठरू शकता. कुटुंबात तुमचं वागणं थोडं कठोर ठरू शकते. त्यामुळे कुटुंबातील लोकांसोबत तुमचे नातेसंबंध बिघडू शकतात. स्पर्धा परीक्षेची तयारी कऱणाऱ्या विद्यार्थ्यांना अपयशाचा सामना करावा लागू शकतो.

First published:
top videos

    Tags: Astrology and horoscope