मराठी बातम्या /बातम्या /religion /Gudi Padwa 2023 : यंदा कसा असेल पाऊस? पंचांगकर्ते दातेंनी सांगितलं भाकीत, पाहा Video

Gudi Padwa 2023 : यंदा कसा असेल पाऊस? पंचांगकर्ते दातेंनी सांगितलं भाकीत, पाहा Video

X
नव्या

नव्या वर्षात पाऊस किती पडणार याकडंही सर्वांचं लक्ष असतं. त्याबद्दल पंचांगात काय भाकित करण्यात आलंय, याची सर्वांना उत्सुकता असते

नव्या वर्षात पाऊस किती पडणार याकडंही सर्वांचं लक्ष असतं. त्याबद्दल पंचांगात काय भाकित करण्यात आलंय, याची सर्वांना उत्सुकता असते

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur, India

    सोलापूर, 20 मार्च : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा सण यावर्षी बुधवारी (22 मार्च) आहे. हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणूनही हा दिवस ओळखला जातो. अनेक शुभकार्याची सुरूवात या दिवशी करण्यात येते. तोरण आणि ध्वज उभारुन तसंच गुढी उभारत नव्या वर्षाचे स्वागत केले जाते. नव्या वर्षाचं स्वागत करताना या वर्षात काय दडलंय? याचीही सर्वांना उत्सुकता असते. त्याबाबत सोलापूर येथील दाते पंचांगाचे सर्वेसर्वा मोहन दाते यांनी माहिती दिली आहे.

    कसा असेल पाऊस?

    यंदा गुढी उभारण्याची वेळ ही सूर्योदयापासून सुरू होणार असून सुर्यास्ताच्यापूर्वी जितक्या लवकर होईल तितकी गुढी उतरवण्यात यावी. त्याचबरोबर पंचांगाची पूजा करुन पंचांग स्थानी असलेल्या गणपतीकडं आशिर्वाद मागून पूजा संपन्न करावी, असं दाते यांनी सांगितलं.

    यंदाच्या नववर्षात अधिक श्रावण महिना आला आहे. हिंदू धर्मात श्रावण हा पवित्र सण मानला जातो. मुळातच पवित्र असलेला श्रावण हा अधिक महिन्यामुळे आणखी शुभ ठरणार आहे. त्याचबरोबर यंदा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण आल्यानं ती तिथी देखील विशेष असल्याचं त्यांनी सांगितलं.

    Gudi Padwa 2023 : गुढी कशी उभारावी? पाहा संपूर्ण पद्धत आणि मुहूर्त, Video

    नव्या वर्षात पाऊस किती पडणार याकडंही सर्वांचं लक्ष असतं. त्याबद्दल पंचांगात काय भाकित करण्यात आलंय, याची सर्वांना उत्सुकता असते. पंचांगकर्त्यांनी याबाबत दिलासादायक परिस्थिती असल्याचं भाकित व्यक्त केलंय. या वर्षी पाऊस सरासरीइतका होईल, असा अंदाज दाते यांनी व्यक्त केला.

    गेली दोन वर्ष कोरोनामुळे गुढीपाडवा साजरा करण्यावर अनेक निर्बंध होते. यंदा तसे निर्बंध नसल्यानं सर्वांनी उत्साहानं पाडवा साजरा करावा. साधरणत: सर्वजण एक जानेवारी रोजी नवर्षाच्या शुभेच्छा एकमेकांना दिल्या जातात. पण, मागील काही वर्षांपासून गुढीपाडव्यालाही या शुभेच्छा देण्याचं प्रमाण वाढलं आहे, असं त्यांनी सांगितलं.

    गुढीपाडव्याला इतर राज्यात काय म्हणतात? असं आहे गुढी उभारण्याचे औचित्य

    QR कोडवरही उपलब्ध

    दाते पंचांग आता नव्या तंत्रज्ञानाशी सुसंगत अशा क्यू आर कोडवरही वाचता येणार आहे. मराठी आणि कन्नड या दोन भाषांमध्ये हे पंचांग तयार करण्यात आले असून राज्याती सर्व बुक स्टॉलवर उपलब्ध असेल. साधरणपणे दरवर्षा चार लाख दाते पंचांगाची विक्री होते, अशी माहिती मोहन दाते यांनी दिली.

    First published:
    top videos

      Tags: Gudi Padwa 2023, Local18, Religion, Solapur