मुंबई, 09 डिसेंबर : जेवण चव वाढवण्यापासून ते आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या हिरव्या मिरचीला ज्योतिषशास्त्रातही खूप महत्त्व असल्याचे सांगितले आहे. हिरव्या मिरचीचा उपयोग फक्त दृष्ट काढण्यासाठीच होतो, असे नाही. त्यापेक्षाही घरातील वास्तुदोषांमध्ये हिरव्या मिरचीचा वापर प्रभावी ठरतो. ज्योतिष शास्त्रामध्ये हिरव्या मिरचीचे अनेक उपाय सांगितले आहेत, ज्याचा वापर करून आपण आयुष्यात येणारे अनेक अडथळे दूर करू शकतो.
हिरव्या मिरचीच्या उपायांनी तुम्ही अनेक समस्यांपासून कशी सुटका मिळवू शकता, याविषयी ज्योतिषी आचार्य आणि हस्तरेखाशास्त्रज्ञ विनोद सोनी पोद्दार सांगत आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार, हिरवी मिरची बुध ग्रहाचे प्रतिक मानली जाते, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या जीवनातील अनेक अडचणी दूर करू शकता.
दृष्ट काढण्यासाठी उपाय -
ज्योतिष शास्त्रानुसार दृष्ट लागणे, हा मनुष्यावर एक प्रकारचा नकारात्मक प्रभाव असतो. त्यामुळे माणसाच्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. ज्या व्यक्तीला दृष्ट लागली आहे, त्याची दृष्ट काढण्यासाठी 7 मिरच्या घ्या आणि त्या 7 वेळा वरून खाली आणि 7 वेळा खालून वरती उतरवा आणि त्यानंतर रस्त्याच्या कडेला फेकून द्या. यामुळे त्या व्यक्तीला लागलेली दृष्ट निघून जाईल.
आर्थिक संकट दूर होईल -
तुम्ही पैसे चांगले मिळवत असाल, पण तुमची बचत मात्र होत नसेल तर यासाठी 3 हिरव्या मिरच्या तुमच्या पर्स/ पाकिटामध्ये ठेवा. त्या सुकल्यावर नवीन 3 हिरव्या मिरच्या ठेवत राहा, असे केल्याने तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही.
नोकरीत येणाऱ्या अडचणी -
जर तुम्हाला ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी अनेक समस्या येत असतील किंवा तुमचे सहकारी तुम्हाला त्रास देत असतील तर 7 हिरव्या मिरच्या तुमच्या डेस्कवर किंवा ड्रॉवरमध्ये ठेवा. या हिरव्या मिरच्या कुणालाही दिसू नये हे लक्षात ठेवा. लाभ मिळेल.
वास्तु दोष दूर करा -
तुमच्या छोट्या-मोठ्या कामांमध्येही अडचणी येत असतील. पूर्ण झालेली कामे खराब होत असतील आणि तुमच्या घरातून कोणतीही मौल्यवान वस्तू चोरीला गेली किंवा हरवली असेल तर यासाठी हिरव्या मिरचीचा वापर केला जाऊ शकतो. सकाळी एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात हिरवी मिरची बुडवून ठेवा. रात्री बाहेर फेकून द्या. हा प्रयोग काही दिवस नियमित केल्यास तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होतात.
हे वाचा - ॐ च्या शक्तीचे रहस्य अगाद! फक्त नामस्मरण करण्याचा असा होतो फायदा
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips