मराठी बातम्या /बातम्या /religion /

सततच्या वाईट स्वप्नांमुळे हैराण झालाय? या सोप्या उपायांनी मिळेल शांत झोप

सततच्या वाईट स्वप्नांमुळे हैराण झालाय? या सोप्या उपायांनी मिळेल शांत झोप

भीतीदायक स्वप्ने का पडतात

भीतीदायक स्वप्ने का पडतात

भीतीदायक स्वप्नांमुळे अनेकजण त्रस्त असतात. वाईट स्वप्नांमुळे रात्री जागरण होतेच शिवाय डोळे बंद केले की भीतीदायक गोष्टी दिसू लागतात. याविषयी पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात की,...

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

मुंबई, 08 डिसेंबर : रात्री झोपल्यानंतर स्वप्नं पडणे ही सर्वसामान्य बाब आहे. स्वप्ने कोणत्याही प्रकारची असू शकतात. काही स्वप्ने चांगली आणि मनाला आनंद देणारी असतात तर काही वाईट आणि भयावह असतात. काही लोकांना वारंवार वाईट स्वप्ने पडतात, ज्यामुळे त्यांना नीट झोप लागत नाही. भीतीदायक स्वप्नांमुळे अनेकजण त्रस्त असतात. वाईट स्वप्नांमुळे रात्री जागरण होतेच शिवाय डोळे बंद केले की भीतीदायक गोष्टी दिसू लागतात. याविषयी पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात की, वाईट स्वप्ने येण्याची अनेक कारणे असू शकतात. वाईट स्वप्नांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शास्त्रांमध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. आज आम्ही तुम्हाला या उपायांबद्दल सांगणार आहोत.

पिंपळाच्या मुळाचे उपाय -

ज्योतिषांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीला रात्री भीतीदायक आणि घाबरवणारी स्वप्ने पडत असतील तर त्याने झोपताना पिंपळाच्या झाडाचं छोटंस मुळ उशीखाली ठेवावे. यासोबत 'ओम नमो भगवते वासुदेवाय' हा जप 5 वेळा करावा. त्यामुळे वाईट आणि भयावह स्वप्ने दिसणे बंद होऊ शकते.

शिव मंत्राचा उपाय

जर तुम्हाला रात्री झोपेत अचानक एखादी गोष्ट दिसली जी खूप भीतीदायक आहे आणि त्यामुळे तुम्हाला झोप येत नसेल, तर तुम्ही महादेवाच्या या मंत्राचा जप करावा - "ओम नमः शिवाय".

अशाप्रकारे खालील मंत्राचा 11 वेळा जप करावा, यामुळे अशुभ, वाईट स्वप्ने दिसणार नाहीत

अशुभ स्वप्न दोष निवारण मंत्र

ऊँ नमः शिवं दुर्गा गणपतिं कार्तिकेयं दिनेश्वरम् ।

धर्म गंगां च तुलसीं राधां लक्ष्मीं सरस्वतीम ॥

नामान्येतानि भद्राणि जले स्नात्वा च यो जपेत ।

वांछितं च लभेत सोऽपि दुःस्वप्नः शुभवान् भवेत् ॥

निद्रादेवीचा मंत्र -

निद्रा देवीला झोपेची देवता म्हणतात, त्यामुळे झोपण्यापूर्वी निद्रा देवीच्या मंत्रांचा जप करावा. वाईट स्वप्नांमुळे झोप येत नसेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी निद्रा देवीच्या खालील मंत्राचा जप करा-

वाराणस्यां दक्षिणे तु कुक्कुटो नाम वै द्विज:.

तस्य स्मरणमात्रेण दु:स्वपन: सुखदो भवेत्..

हे वाचा - ॐ च्या शक्तीचे रहस्य अगाद! फक्त नामस्मरण करण्याचा असा होतो फायदा

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Lifestyle, Religion