देवी लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर कधीच नाही राहणार; म्हणून अशी कामं करायची नसतात

देवी लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर कधीच नाही राहणार; म्हणून अशी कामं करायची नसतात

काही कृत्यांमुळे देवी लक्ष्मी क्रोधित होते आणि यामुळे घरात दरिद्रता येऊ लागते. त्यामुळे या गोष्टी करणे टाळावे. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे देवी लक्ष्मी क्रोधित होते त्याविषयी आचार्य गुरमीत सिंहजी यांच्याकडून जाणून घेऊया.

  • Share this:

मुंबई 16 ऑगस्ट : पैसा, संपत्ती, सुख-समृद्धी या प्रत्येक व्यक्तीच्या आकांक्षा असतात. माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहावी अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. यासाठी अनेकजण देवी लक्ष्मीची विशेष पूजा करतात, देवीला प्रसन्न करून तिचा आशीर्वाद मिळवण्याची सगळ्यांची इच्छा असते. पण जाणूनबुजून किंवा नकळत अशा काही चुका होतात, ज्यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर क्रोधित होते आणि अशा घरात लक्ष्मी राहत नाही. अशी काही कामे आहेत जी देवी लक्ष्मीला आवडत नाहीत, असे मानले जाते.

काही कृत्यांमुळे देवी लक्ष्मी क्रोधित होते आणि यामुळे घरात दरिद्रता येऊ लागते. त्यामुळे या गोष्टी करणे टाळावे. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे देवी लक्ष्मी क्रोधित होते त्याविषयी आचार्य गुरमीत सिंहजी यांच्याकडून जाणून घेऊया.

उधार देणे-घेणे -

गरज असेल तेव्हा एकमेकांना मदत करणे ही चांगली गोष्ट आहे. पण, देवी लक्ष्मी कर्ज घेणाऱ्यांवर आणि त्यांना देणार्‍यांवर क्रोधित होते आणि ती अशा लोकांच्या घरात कधीच राहत नाही, असे मानले जाते. विशेषत: शुक्रवारी उधारी देणे-घेणे अशुभ मानले जाते. शुक्रवारी दिलेले पैसे लवकर परत मिळत नाहीत, असे मानले जाते. तसेच, जर तुम्ही या दिवशी कोणाकडून पैसे घेतले असतील तर तुम्हाला ते फेडण्यात अडचणी येऊ शकतात.

डाव्या हाताने पाणी पिणे -

डाव्या हाताने पाणी प्यायल्याने घरात धनाची कमतरता भासते आणि देवी लक्ष्मीचा कोप होतो. नारद पुराणात असेही सांगितले आहे की, डाव्या हाताने पाणी पिणे हे वरुण देवतेचा अपमान मानले जाते.

स्त्रियांचा अनादर -

ज्या घरात स्त्रीचा अनादर किंवा अपमान होत असेल त्या घरात माता लक्ष्मी वास करत नाही. कारण महिला हे देवीचे रूप आहे, म्हणून त्यांचा आदर केला पाहिजे. स्त्रीचा अनादर करणाऱ्या व्यक्तीवर माता लक्ष्मीचा कोप होतो. मग माणूस कितीही श्रीमंत असला तरी त्याला गरीब व्हायला वेळ लागत नाही.

हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर

कचरा उत्तर दिशेला ठेवू नका -

उत्तर दिशेला धनाची देवता कुबेर आणि माता लक्ष्मीचे स्थान मानले जाते. तसेच या जागेला मातृस्थान म्हणतात. त्यामुळे अडगळ आणि कचरा उत्तर दिशेला ठेवल्याने सुख, समृद्धी आणि संपत्तीची हानी होते, असे मानले जाते.

हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

Published by: News18 Desk
First published: August 16, 2022, 7:30 AM IST

ताज्या बातम्या