नोकरी-धंद्यातील संकटे बाहेरच संपतील; व्याघ्ररत्न धारण करण्याचे आहेत खास फायदे

नोकरी-धंद्यातील संकटे बाहेरच संपतील; व्याघ्ररत्न धारण करण्याचे आहेत खास फायदे

नोकरी आणि व्यवसायात येणाऱ्या अडचणींसाठी ज्योतिष तज्ज्ञ व्याघ्ररत्न घालण्याची शिफारस करतात. व्याघ्ररत्न हे सर्वात प्रभावशाली रत्नांपैकी एक मानले जाते. त्याविषयी अधिक जाणून घेऊया.

  • Share this:

मुंबई, 02 ऑगस्ट : ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत कोणताही ग्रह कमजोर असेल, ज्यामुळे त्या व्यक्तीला समस्या येत असतील तर अशा व्यक्तीला त्याच्या राशी आणि कुंडलीनुसार रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो. असे मानले जाते की, रत्न धारण केल्याने व्यक्तीच्या जीवनातील समस्या कमी होतात. तसेच अशुभ ग्रह नक्षत्रांच्या त्रासांपासूनही सुटका (Gemstones) मिळते.

कोणते रत्न धारण करावे, ज्यामुळे व्यक्तीला नोकरी आणि व्यवसायात येणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळते. त्याविषयी ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा या लेखात माहिती देत आहेत.

कोणते रत्न परिधान करावे -

नोकरी आणि व्यवसायात येणाऱ्या अडचणींसाठी ज्योतिष तज्ज्ञ व्याघ्ररत्न घालण्याची शिफारस करतात. व्याघ्ररत्न हे सर्वात प्रभावशाली रत्नांपैकी एक मानले जाते. अर्थात, नऊ रत्नांमध्ये या रत्नाचा समावेश करण्यात आलेला नाही, परंतु नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत या रत्नाचे परिणाम आश्चर्यकारक आहेत.

व्याघ्ररत्न कसे आहे -

व्याघ्ररत्नावर पिवळे आणि काळे पट्टे असतात. व्यवसाय आणि करिअरसाठी हे रत्न परिधान करणे शुभ मानले जाते.

हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर

रत्न कधी घालावे -

ग्रहाच्या प्रभावामुळे एखादी व्यक्ती कर्जात बुडालेली असेल आणि नोकरी किंवा व्यवसायात सतत नुकसान होत असेल तर त्या व्यक्तीने व्याघ्ररत्न धारण करावे. कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला तर्जनी किंवा अनामिकामध्ये व्याघ्ररत्न धारण करणे शुभ मानले जाते.

हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा

व्याघ्ररत्न धारण केल्याचे फायदे -

ज्योतिषशास्त्रानुसार, व्याघ्ररत्न करिअरमध्ये खूप लवकर आणि सकारात्मक परिणाम देणारे मानले जाते. या रत्नाचे वैशिष्ट्य म्हणजे ते व्यावसायिकांना अनेक फायदे देते. हे रत्न धारण करताच त्याचा परिणाम लगेच दिसून येतो. मान्यतेनुसार, ज्या लोकांसाठी हे रत्न सूट होते त्यांचे निद्रिस्त भाग्य जागृत होते. व्याघ्ररत्न धारण केल्याने व्यक्ती सन्मान आणि प्रगतीची नवीन उंची गाठते.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

Published by: News18 Desk
First published: August 2, 2022, 8:06 PM IST

ताज्या बातम्या