मराठी बातम्या /बातम्या /religion /

गौरी-महालक्ष्मी, नावाप्रमाणेच प्रांतानुसार बदलतात नैवेद्याच्या पद्धती, असा होतो गौरीचा पाहुणचार

गौरी-महालक्ष्मी, नावाप्रमाणेच प्रांतानुसार बदलतात नैवेद्याच्या पद्धती, असा होतो गौरीचा पाहुणचार

वेगवेगळ्या ठिकाणी गौरी बसवण्याची पद्धत बदलते आणि तसेच गौरींना दाखवल्या जाणाऱ्या नैवेद्याचीही पद्धत बदलते. जाणून घ्या वेगवेगळ्या ठिकाणच्या गौरींना कसा दाखवला जातो नैवेद्य.

वेगवेगळ्या ठिकाणी गौरी बसवण्याची पद्धत बदलते आणि तसेच गौरींना दाखवल्या जाणाऱ्या नैवेद्याचीही पद्धत बदलते. जाणून घ्या वेगवेगळ्या ठिकाणच्या गौरींना कसा दाखवला जातो नैवेद्य.

वेगवेगळ्या ठिकाणी गौरी बसवण्याची पद्धत बदलते आणि तसेच गौरींना दाखवल्या जाणाऱ्या नैवेद्याचीही पद्धत बदलते. जाणून घ्या वेगवेगळ्या ठिकाणच्या गौरींना कसा दाखवला जातो नैवेद्य.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 2 सप्टेंबर : गौरी गणपतीचा सण सगळीकडेच खूप उत्साहात साजरा होत असतो. कुठे सणाला गौरी गणपतींचं सण म्हणाले जाते तर कुठे महालक्ष्मी असे म्हणाले जाते. जागेनुसार जशी सणाची नाव बदलतात. तशाच पद्धतीही बदलतात. वेगवेगळ्या ठिकाणी गौरी बसवण्याची पद्धत बदलते आणि तसेच गौरींना दाखवल्या जाणाऱ्या नैवेद्याचीही पद्धत बदलते. तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणच्या गौरींना कसा नैवेद्य दाखवला जातो हे जाणून घ्यायचे आहे? मग हा लेख नक्की वाचा.

विदर्भ

विदर्भात या सणाला महालक्ष्मींचा सण म्हंटले जाते. महालक्ष्मी आगमनाच्या दिवशी त्यांना भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. काही ठिकाणी या दिवसांमध्ये कांदा-लसूण खात नाहीत. त्यामुळे नैवेद्यातील सर्व पदार्थ कांदा-लसूण विरहीत बनवले जातात. दुसऱ्या दिवशी म्हणजेच महालक्ष्मीं पूजनाच्या दिवशी पूजा करून महालक्ष्मींना पंचपक्वांनाचा नैवेद्य दाखवला जातो. त्यासोबतच मोदक, करंज्या, सांजोऱ्या यांचा फुलोराबनविणे बनवला जातो. काही ठिकाणी हा फुलोरा महालक्ष्मीच्या वर बांधला जातो तर काही ठिकाणी तो महालक्षीमीनच्या साडीमध्ये कुठेतरी ठेवला वाजतो.

Vastu Tips : पारिजाताचे झाड लावल्याने मिळतात हे फायदे, दिशा मात्र चुकवू नका

महालक्ष्मींच्या नैवेद्यामध्ये विविध पदार्थ असतात. जसे की कोशिंबीर, चटण्या, मोदक, पुरणपोळी, उडदा-मुगाचे वडे, घोसाळ्याची, अळूची भजी, कढी, आंबील, नकुल्यांची खीर, पंचामृत, 16 भाज्यांपासून तयार केलेली भाजी, भात-वरण. त्याचबरोबर महालक्ष्मींसमोर सर्व फराळाचे पदार्थ जसे की, लाडू, करंजी, अनारसे हे पदार्थदेखील ठेवले जाते.

मराठवाडा

मराठवाडा, खान्देश किंवा पश्चिम महाराष्ट्रातही साधारणपणे याच पद्धतीचा नैवेद्य दाखवला जातो. भाज्यांमध्ये, गोडाच्या पदार्थांमध्ये थोडा फरक असतो. अनेक ठिकाणी विविध गोड पदार्थ, फळं गौरींसमोर मांडली जातात. मराठवाड्यात साखरेची पुरणपोळी जास्त प्रमाणात केली जाते तर विदर्भात पुरणपोळीसाठी गुळाचा वापर केला जातो. गौरी विसर्जनाच्या दिवशी दही भात, मुरडीचे कानोले यांचा नैवेद्य दाखवला जातो.

कोकण

MSN मध्ये दिलेल्या माहितीनुसार, कोकणात या सणाला गौरी गणपतीचा सण असेच म्हंटले जाते. कोकणातल्या गौरींना पहिल्या दिवशी तांदळाची भाकरी आणि भाजीचा नैवेद्य दाखवला जातो. तर दुसऱ्या दिवशी हळदीच्या पानातल्या पातोळ्या, भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो. कोकणात नैवेद्यासाठी विशेष महत्वाचे असतात ते म्हणजे उकडीचे मोदक.

नखांच्या आकारावरूनही समजतं स्वभाव आणि बरंच काही, या टिप्स वापरून ओळखा

कोकणातील काही कोळीवाड्यांमध्ये गौराईंना दुसऱ्या दिवशी तिखटाचाही नैवेद्य दाखवला जातो. पूर्वापार चालत आलेली ही परंपरा कोकणातील अनेक गावांमध्ये आजही जपली जाते. या तिखटाच्या नैवेद्यात मटण, चिकन, चिंबोऱ्या, मासे असे पदार्थ असतात. मात्र असा नैवेद्य केवळ काही ठिकाणीच जातो.

First published:

Tags: Lifestyle, Religion