मराठी बातम्या /बातम्या /religion /

Ganesh Chaturthi 2022: उजव्या सोंडेच्या दक्षिणाभिमुख गणेशाची का केली जात नाही पूजा?

Ganesh Chaturthi 2022: उजव्या सोंडेच्या दक्षिणाभिमुख गणेशाची का केली जात नाही पूजा?

उजव्या दिशेला सोंड असलेली गणेशमूर्ती फार क्वचितच सापडेल. उजव्या दिशेला सोंड असलेल्या गणेशजींना दक्षिणाभिमुख गणेश म्हणतात, ज्याचे दुर्मिळ असण्याचे विशेष कारण आहे.

उजव्या दिशेला सोंड असलेली गणेशमूर्ती फार क्वचितच सापडेल. उजव्या दिशेला सोंड असलेल्या गणेशजींना दक्षिणाभिमुख गणेश म्हणतात, ज्याचे दुर्मिळ असण्याचे विशेष कारण आहे.

उजव्या दिशेला सोंड असलेली गणेशमूर्ती फार क्वचितच सापडेल. उजव्या दिशेला सोंड असलेल्या गणेशजींना दक्षिणाभिमुख गणेश म्हणतात, ज्याचे दुर्मिळ असण्याचे विशेष कारण आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 01 सप्टेंबर : हत्तीच्या मुखामुळे गणेशाला गजमुख आणि गजानन असेही म्हणतात. गणपतीच्या याच रूपाची पूजा प्रत्येक घरात आणि मंदिरात केली जाते. पण, गणेशाच्या मूर्ती आणि चित्रे पाहिल्यास त्यांची सोंड आपल्याला नेहमी डावीकडे आढळते. उजव्या दिशेला सोंड असलेली गणेशमूर्ती फार क्वचितच सापडेल, यामागे एक खास कारण आहे, त्याविषयी जाणून घेऊया.

उजव्या सोंडेचा दक्षिणाभिमुख गणेश -

उजव्या दिशेला सोंड असलेल्या गणेशजींना दक्षिणाभिमुख गणेश म्हणतात, ज्याचे दुर्मिळ असण्याचे विशेष कारण आहे. ज्योतिषाचार्य रामचंद्र जोशी यांच्या मते, दक्षिणाभिमुख गणेशजींची पूजा करणे फार कठीण आहे, कारण ते जागृत आणि क्रोधित रूप मानले जाते. त्यांची पूजा-अर्चा करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. असे मानले जाते की, त्यारुपातील गणेशाची पूजा नीट झाली नाही तर अशुभ घडतं, बाप्पा रागावतात. त्यामुळे सहसा दक्षिणाभिमुख गणेशाची पूजा केली जात नाही.

मिळतं वरदान -

दक्षिण दिशेला सोंड असलेल्या गणेशाची पूजा फार क्वचितच केली जात असली तरी, त्या रुपात जो कोणी त्यांची विधी व सुव्यवस्था राखून पूजा करतो, त्याच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात आणि त्याचे मृत्यूचे भयदेखील नाहीसे होते. पंडित जोशींच्या मते, दक्षिण दिशेला यमलोक असतो, तर शरीराची उजवी नाडी सूर्य नाडी आहे. अशा स्थितीत दक्षिणमुखी गणेशजींची पूजा केल्याने यमराजाच्या भयापासून मुक्ती मिळते आणि वय, ओज, तेज वाढते.

हे वाचा -  नखांच्या आकारावरूनही समजतं स्वभाव आणि बरंच काही, या टिप्स वापरून ओळखा

डाव्या सोंडेचा गणेश -

डाव्या सोंडेच्या गणेशाची पूजा सहसा जास्त केली जाते. याचं कारण म्हणजे त्या रुपातील साधेपणा. धार्मिक मान्यतेनुसार, डाव्या सोंडेचे गणेशजी पूजेत काही कमी-जास्त राहिले तरी तितके क्रोधित होत नाहीत. उजव्या सोंडेच्या गणपतीच्या पूर्ण उलटे या रुपातील गणेशाचे असते. यामुळेच डाव्या दिशेला सोंड असलेल्या गणेशाची अधिक पूजा केली जाते.

हे वाचा - येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Ganesh chaturthi, Religion