मराठी बातम्या /बातम्या /religion /

Ganesh Chaturthi 2022 : बाप्पाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी अशाप्रकारे करा स्वागत, पूजा करताना टाळा या गोष्टी

Ganesh Chaturthi 2022 : बाप्पाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी अशाप्रकारे करा स्वागत, पूजा करताना टाळा या गोष्टी

गणपतीची पूजा करताना टाळा या गोष्टी

गणपतीची पूजा करताना टाळा या गोष्टी

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला उपवास करून गणेश चतुर्थीचा दिवस साजरा केला जातो. 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11.05 ते दुपारी 01.38 या वेळेत गणपतीचे पूजन करता येईल.

  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 23 ऑगस्ट : गणेश चतुर्थीचा सण भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला उपवास करून हा दिवस साजरा केला जातो. या दिवसापासून गणेशोत्सव सुरु होतो. 11 दिवसांच्या उत्सवात गणपतीचे घरोघरी स्वागत केले जाते. आज आम्ही तुम्हाला गणेश चतुर्थीचा मुहूर्त, तिथी आणि या दिवशी कोणत्या गोष्टी करणे प्रकर्षाने टाळावे. याबद्दल माहिती देणार आहोत.

गणेश चतुर्थी 2022 पूजा मुहूर्त

31 ऑगस्ट रोजी सकाळी 11.05 ते दुपारी 01.38 या वेळेत गणपतीचे पूजन करता येईल. या दिवशी रवीचा योग पहाटे 05:58 ते 12:12 पर्यंत आहे. शुभ कार्ये करण्यासाठी हा योग अनुकूल आहे.

Pitru Paksh 2022 : कधी पासून सुरु होतोय पितृपक्ष? कोणकोणत्या तारखांना होईल पिंडदान?

गणपतीची पूजा करताना टाळा या गोष्टी

- सर्वात प्रथम असते, गणपतीची मूर्ती. गणपतीची मूर्ती खरेदी करताना ती कुठे फुटलेली नाही ना याची खात्री करून घ्या. खंडित मूर्ती पूजेसाठी वापराने अशुभ मानले जाते.

- मूर्ती खरेदी करताना, उजव्या बाजूला वळलेली सोंड असलेला गणपती घ्यावा. उजव्या सोंडेच्या गणपतीची पूजा करणे शुभ मानले जाते.

- वास्तुनुसार घरात गणपतीची मूर्ती ईशान्य कोनात अशाप्रकारे ठेवावी, ज्यामुळे गणपतीची पाठ दिसणार नाही. त्याचबरोबर घरात गणपतीच्या दोन मूर्ती ठेऊ नये.

- टीव्ही नाईन हिंदीने दिलेल्या माहितीनुसार, गणपतीचे पूजन करताना लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते. त्याचबरोबर काळा किंवा निळया रंगाचे कपडे घालून कधीही गणपतीची पूजा करू नये.

- गणपतीचे पूजन करताना नेहमी बाप्पाच्या आवडीचे पदार्थ नैवेद्य म्हणून करावे. मात्र या पदार्थांमध्ये तुळशीची पाने अजिबात घालू नये. गणपतीच्या पूजेमध्ये तुळशीपत्र वर्ज्य मानले जाते.

Astro Tips: नशीब कधीही दगा नाही देणार, हे 5 ज्योतिषीय उपाय नियमित करून बघा

- गणेश चतुर्थीचे पूजन पूर्ण पवित्र्याने करावे. या दिवशी शरीर आणि मन दोन्ही स्वच्छ असावे. या दिवशी कोणाचाही राग किंवा मत्सर करू नये. कोणाविषयीही वाईट विचार मनात येऊ देऊ नये.

- गणेश चतुर्थीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्य पाळले पाहिजे आणि व्रताच्या दिवशी शारीरिक संबंध ठेऊ नये.

- गणपती चतुर्थीचे व्रत करताना केवळ सात्विक आहार आणि फळं खावी. तसेच तामसी पदार्थांपासून दूर राहावे.

- गणपतीचे वाहन मानल्या जाणाऱ्या उंदीरांना त्रास देऊ नये.

First published:

Tags: Ganesh chaturthi, Lifestyle, Religion