मराठी बातम्या /बातम्या /religion /

Ganesh Chaturthi 2022: म्हणून शुभ प्रसंगी स्वस्तिक चिन्ह काढतात, गणपतीशी त्याचा आहे असा संबंध

Ganesh Chaturthi 2022: म्हणून शुभ प्रसंगी स्वस्तिक चिन्ह काढतात, गणपतीशी त्याचा आहे असा संबंध

हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गणपतीची पूजा आणि स्वस्तिक चिन्हाने केली जाते. स्वस्तिक हे देवतांचे प्रतिक असल्याने वास्तू दोष दूर करण्यासाठीही लाभदायक आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 25 ऑगस्ट : हिंदू धर्मात स्वस्तिक चिन्हाला विशेष महत्त्व आहे. स्वस्तिक हे 'सु' आणि 'अस्ति' मिळून बनते. 'सु' म्हणजे 'शुभ' आणि 'अस्ति' म्हणजे शुभ मानणे, म्हणून स्वस्तिक चिन्ह शुभ असल्याचे सूचित करते. हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गणपतीची पूजा आणि स्वस्तिक चिन्हाने केली जाते. पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात की, स्वस्तिकचा संबंधही गणेशाशी आहे. स्वस्तिक चिन्हाने सर्व प्रकारचे वास्तू दोष देखील दूर (Ganesh Chaturthi 2022) होतात.

गणेशाचे स्वस्तिक रूप -

हिंदू धर्मानुसार, स्वस्तिक हे पहिले पूज्य देवता गणेशाचे अवतार आहे. स्वस्तिकाच्या डाव्या भागाला गणपतीचे स्थान मानले जाते कारण 'गम' हा येथील बीजमंत्र आहे. स्वस्तिक चिन्हातील चार बिंदूंमध्ये गौरी, पृथ्वी, कूर्म आणि देवांचा वास असतो, म्हणून असे म्हटले जाते की ज्या ठिकाणी स्वस्तिक बनवले जाते, तेथे गणेशाचा वास असतो आणि कार्याची सुरुवात शुभ असते.

वास्तू दोषही दूर होतात -

स्वस्तिक हे देवतांचे प्रतिक असल्याने वास्तू दोष दूर करण्यासाठीही लाभदायक आहे. सर्व प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर 7 गुरुवारी ईशान्य कोपऱ्यात कोरडी हळद लावून स्वस्तिक चिन्ह काढून पूजा करावी. त्याचप्रमाणे तुमच्या कामाच्या ठिकाणी उत्तर दिशेला हळदीचे स्वस्तिक चिन्ह बनवणे शुभ असते.

हे वाचा - Ganesh Chaturthi 2022: गणपतीची प्रतिष्ठापना करताना या गोष्टी चुकवू नका, दिशा आहे महत्त्वाची

घरात सुख-समृद्धी राहील -

वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक चिन्ह बनवल्याने घरात सुख-समृद्धी येते. यामुळे घरात गणेशाची कृपा राहते, त्यामुळे सकारात्मक वातावरण राहते. त्याचप्रमाणे वास्तुदोषांमुळे झोपेतही त्रास होतो. अशा स्थितीत झोपण्यापूर्वी तर्जनी बोटाने स्वस्तिक चिन्ह केल्याने चांगली झोप लागते.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Ganesh chaturthi, Religion