मराठी बातम्या /बातम्या /religion /

Ganesh Chaturthi 2022 : बाप्पाला घरी आणताय? जाणून घ्या बाप्पासाठी काय करावे आणि काय करणे टाळावे

Ganesh Chaturthi 2022 : बाप्पाला घरी आणताय? जाणून घ्या बाप्पासाठी काय करावे आणि काय करणे टाळावे

बाप्पासाठी काय करावे आणि काय करणे टाळावे

बाप्पासाठी काय करावे आणि काय करणे टाळावे

श्रीगणेशाची पूजा केल्याने सौभाग्य आणि समृद्धी मिळते असे मानले जाते. गणपतीला आद्य देवता असेदेखील संबोधले जाते, म्हणून कोणत्याही नवीन उपक्रमापूर्वी लोक त्यांचे आशीर्वाद घेतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 28 ऑगस्ट : सध्या सर्वत्र गणेश चतुर्थीची तयारी जोरदार सुरु आहे. 10 दिवस चालणारा हा उत्सव थाटामाटात आणि उत्साहाने साजरा होतो. यावर्षी तो 31 ऑगस्ट रोजी गणपती बाप्पा येणार आहेत. विघ्नहर्ता किंवा विनायक म्हणून ओळखल्या जाणार्‍या गणेशाच्या स्वागताची तयारी जोरात सुरू आहे. श्रीगणेशाची उपासना केल्याने सौभाग्य आणि समृद्धी मिळते असे मानले जाते. गणपतीला आद्य देवता म्हणूनही ओळखले जाते. म्हणून कोणत्याही नवीन उपक्रमापूर्वी लोक त्यांचे आशीर्वाद घेतात.

मोठ्या प्रमाणावर साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात, भक्त गणपतीची मूर्ती घरी आणतात आणि विधी करतात. त्यांना त्यांच्या आवडीचे लाडू आणि मोदक अर्पण करतात.

जर तुम्ही यावर्षी गणपती घरी आणत असाल तर गणपती स्थापना करताना या या गोष्टींची विशेष काळजी घ्या

- गणपतीची मूर्ती घरी आणण्यापूर्वी तुम्ही तुमचे घर स्वच्छ करा आणि तुम्हीदेखील स्वच्छ व्हा.

- कलश घेऊन त्यात पाणी भरून वर नारळ ठेवून पानांनी सजवा.

- जिथे तुम्ही मूर्ती ठेवणार आहात ते ‘आसन’ सजवा.

- चंदनाचा टिळा लावा आणि फुलांच्या माळा, दुर्वा आणि लाल फुलांनी बाप्पाच्या मूर्तीची पूजा करा.

- प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मंत्रांचे पठण करा, तुपाचा दिवा/निरंजन लावा आणि गणपतीला मोदक अर्पण करा आणि नंतर आरती करा.

यंदाच्या गणेश चतुर्थीला सिद्धिविनायकाला द्या भेट, जाणून घ्या मंदिराची सर्व माहिती

बाप्पाला खुश करण्यासाठी या गोष्टी करा

- 1.5 दिवस, 3 दिवस, 7 दिवस किंवा 10 दिवस भक्त गणपती घरी आणू शकतात.

- गणपतीला पाहुणे मानले जात असल्याने अन्न, पाणी, प्रसाद यापासून सर्व काही प्रथम त्यांना अर्पण करावे.

- बाप्पासाठी सात्त्विक अन्न तयार करून आधी मूर्तीला अर्पण करा आणि नंतर आपण खावे.

- तुमची गणेशमूर्ती मातीची असल्याची खात्री करा आणि कोणताही कृत्रिम धातूचा रंग वापरला जात नाही याचीदेखील खात्री करा.

- जर तुमच्या घराजवळ पाणवठे नसेल तर तुमच्या घरातील गणेशाची मूर्ती ड्रम किंवा बादलीत विसर्जित करा.

Ganesh Chaturthi 2022: गणपतीची प्रतिष्ठापना करताना या गोष्टी चुकवू नका, दिशा आहे महत्त्वाची

बाप्पा घरी आल्यानंतर या गोष्टी करणे टाळा

- गणपती स्थापनेनंतर भक्तांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी लसूण आणि कांदा टाळावा.

- घरामध्ये गणपतीला कधीही दुर्लक्षित ठेवू नये. त्याच्यासोबत कुटुंबातील एक तरी सदस्य असावा.

- गणपतीला प्रथम आरती, पूजा आणि नैवेद्य दाखवल्याशिवाय त्यांचे विसर्जन करू नका.

- गणपती स्थापनेला उशीर न करता मुहूर्त पाळा.

- 10 दिवस चालणाऱ्या उत्सवात मांस आणि मद्य सेवन करणे टाळा.

First published:

Tags: Culture and tradition, Ganesh chaturthi, Lifestyle, Religion