मराठी बातम्या /बातम्या /religion /

Ganesh Chaturthi 2022: गणेश चतुर्थीच्या दिवशी या 8 मंत्रांचा करा जप; शुभ फळ, मनोकामना होतील पूर्ण

Ganesh Chaturthi 2022: गणेश चतुर्थीच्या दिवशी या 8 मंत्रांचा करा जप; शुभ फळ, मनोकामना होतील पूर्ण

गणपती बाप्पाच्या पूजेत त्यांच्या आवडत्या गोष्टी अर्पण कराव्यात आणि काही मंत्राचा जप करावा. हे जप करताना योग्य उच्चाराने करावेत.
मंत्रांचा जप केल्याने गणेशजी भक्तांना शुभफळ देतात.

गणपती बाप्पाच्या पूजेत त्यांच्या आवडत्या गोष्टी अर्पण कराव्यात आणि काही मंत्राचा जप करावा. हे जप करताना योग्य उच्चाराने करावेत. मंत्रांचा जप केल्याने गणेशजी भक्तांना शुभफळ देतात.

गणपती बाप्पाच्या पूजेत त्यांच्या आवडत्या गोष्टी अर्पण कराव्यात आणि काही मंत्राचा जप करावा. हे जप करताना योग्य उच्चाराने करावेत. मंत्रांचा जप केल्याने गणेशजी भक्तांना शुभफळ देतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 31 ऑगस्ट : सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पांचे आज घरी आगमन होत आहे. दरवर्षी गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना केली जाते आणि त्यानंतर 10 दिवस अतिशय उत्साह, आनंद आणि जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जातो. गणपतीच्या स्थापनेसाठी सर्वत्र लगबग सुरू झाली आहे.गणपतीची पूजा किंवा स्थापना करताना काही श्लोक, स्तोत्र आणि आरत्या म्हटल्या जातात. या दिवशी नोकरीमध्ये प्रगती, सुख-समृद्धी, संकटे, ग्रह दोष दूर करण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी गणेशाच्या काही मंत्रांचा जप करावा. या मंत्रांचा जप केल्याने आपल्याला यश, सुख आणि सौभाग्य (Ganesh Chaturthi 2022) मिळेल.

तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्ण कुमार भार्गव सांगतात की, गणेशजी आपल्या भक्तांच्या मनोकामना लगेच पूर्ण करतात, यासाठी गणेशजींच्या पूजेत त्यांच्या आवडत्या गोष्टी अर्पण कराव्यात आणि काही मंत्राचा जप करावा. हे जप करताना योग्य उच्चाराने करावेत.

मंत्रांचा जप केल्याने गणेशजी भक्तांना शुभफळ देतात, जिथे गणपती असतो तिथे अशुभ असूच शकत नाही. गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण मनोभावे खालील गणेश मंत्राचा जप करा. याचा आपल्या जीवनात परिणाम दिसून येईल.

1. गणेश मनोकामना पूर्ती मंत्र

ॐ गं गणपतये नमः

2. ग्रह दोष निवारण गणेश मंत्र

गणपूज्यो वक्रतुण्ड एकदंष्ट्री त्रियम्बक:।

नीलग्रीवो लम्बोदरो विकटो विघ्रराजक:।।

धूम्रवर्णों भालचन्द्रो दशमस्तु विनायक:।

गणपर्तिहस्तिमुखो द्वादशारे यजेद्गणम।।

3. कार्यसफल मंत्र

त्रयीमयायाखिलबुद्धिदात्रे बुद्धिप्रदीपाय सुराधिपाय।

नित्याय सत्याय च नित्यबुद्धि नित्यं निरीहाय नमोस्तु नित्यम्।

4. गणपतीला प्रसन्न करण्याचा मंत्र

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।

निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

5. गणेश गायत्री मंत्र

ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो बुदि्ध प्रचोदयात्।

हे वाचा - Ganesh Chaturthi 2022: रंकालाही राजा बनवणारा गणपतीचा हा एकाक्षरी मंत्र; विघ्न हरतो भक्तांची

6. गणपति षडाक्षर मंत्र (आर्थिक प्रगतीसाठी):

ओम वक्रतुंडाय हुम्

7. नोकरी व्यवसायासाठी गणेश मंत्र

ओम श्रीं गं सौभ्याय गणपतये वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा।

हे वाचा - Gauri Ganpati Muhurt 2022 : गणपती प्रतिष्ठापना, ज्येष्ठा गौरी आवाहन आणि विसर्जन, 'हे' आहेत अचूक शुभ मुहूर्त

8. सुख समृद्धीसाठी गणेश मंत्र

ऊं हस्ति पिशाचिनी लिखे स्वाहा

मंत्रोच्चार करताना कठोर नियमांचे पालन करावे लागते. शब्दांची शुद्धता आणि मनाची आणि शरीराची पवित्रता सांभाळावी लागते. जर तुम्हाला मंत्रांचा उच्चार करता येत नसेल तर तुम्ही योग्य ज्योतिषी किंवा पुजारी यांची मदत घेऊ शकता.

First published:

Tags: Culture and tradition, Ganesh chaturthi, Religion