मराठी बातम्या /बातम्या /religion /

Ganesh Chaturthi 2022: गणेश चालिसा म्हणण्याचे आहे विशेष महत्त्व; आरतीपूर्वी 10 दिवस करा हा जप

Ganesh Chaturthi 2022: गणेश चालिसा म्हणण्याचे आहे विशेष महत्त्व; आरतीपूर्वी 10 दिवस करा हा जप

गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाच्या पूजेच्या वेळी गणेश चालीसाचे पठण आणि गणेशाची आरती करण्याची परंपरा आहे. विघ्नहर्ता गणपती त्यामुळे प्रसन्न होऊन भक्तांना आशीर्वाद देतो अशी धारणा आहे.

गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाच्या पूजेच्या वेळी गणेश चालीसाचे पठण आणि गणेशाची आरती करण्याची परंपरा आहे. विघ्नहर्ता गणपती त्यामुळे प्रसन्न होऊन भक्तांना आशीर्वाद देतो अशी धारणा आहे.

गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाच्या पूजेच्या वेळी गणेश चालीसाचे पठण आणि गणेशाची आरती करण्याची परंपरा आहे. विघ्नहर्ता गणपती त्यामुळे प्रसन्न होऊन भक्तांना आशीर्वाद देतो अशी धारणा आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 31 ऑगस्ट : आज गणेश चतुर्थी आहे. आजपासून दहा दिवसीय गणेश उत्सवाला सुरुवात झाली आहे. गणेश चतुर्थीचा उत्सव दरवर्षी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक आपल्या घरी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. विघ्नहर्ता गणेशजींना संकटे दूर करून जीवनात आनंद आणण्यासाठी प्रार्थना केली जाते. काही दिवस गणेशाची मनोभावे पूजा केल्याव त्याला आनंदाने विसर्जित केले जाते आणि पुढच्या वर्षी पुन्हा येण्याची प्रार्थना केली जाते. बाप्पाचे आगमन चतुर्थीला होते आणि विसर्जन चतुर्दशीला (Ganesh Chaturthi 2022) होते.

गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाच्या पूजेच्या वेळी गणेश चालीसाचे पठण आणि गणेशाची आरती करण्याची परंपरा आहे. गणपतीची पूजा करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्याला फुले, अक्षत, दुर्वा, मोदक इत्यादी अर्पण करणे आणि चालीसा पाठ करणे. नंतर पंचारती दिव्यांनी आरती करावी, असे तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्ण कुमार भार्गव यांनी सांगितले.

गणेश चालीसा

दोहा

जय गणपति सदगुणसदन, कविवर बदन कृपाल।

विघ्न हरण मंगल करण, जय जय गिरिजालाल॥

चौपाई

जय जय जय गणपति गणराजू। मंगल भरण करण शुभ काजू॥

जय गजबदन सदन सुखदाता। विश्व विनायक बुद्घि विधाता॥

वक्र तुण्ड शुचि शुण्ड सुहावन। तिलक त्रिपुण्ड भाल मन भावन॥

राजत मणि मुक्तन उर माला। स्वर्ण मुकुट शिर नयन विशाला॥

पुस्तक पाणि कुठार त्रिशूलं। मोदक भोग सुगन्धित फूलं॥

सुन्दर पीताम्बर तन साजित। चरण पादुका मुनि मन राजित॥

धनि शिवसुवन षडानन भ्राता। गौरी ललन विश्व-विख्याता॥

ऋद्घि-सिद्घि तव चंवर सुधारे। मूषक वाहन सोहत द्घारे॥

कहौ जन्म शुभ-कथा तुम्हारी। अति शुचि पावन मंगलकारी॥

एक समय गिरिराज कुमारी। पुत्र हेतु तप कीन्हो भारी॥

भयो यज्ञ जब पूर्ण अनूपा। तब पहुंच्यो तुम धरि द्घिज रुपा॥

अतिथि जानि कै गौरि सुखारी। बहुविधि सेवा करी तुम्हारी॥

अति प्रसन्न है तुम वर दीन्हा। मातु पुत्र हित जो तप कीन्हा॥

मिलहि पुत्र तुहि, बुद्धि विशाला। बिना गर्भ धारण, यहि काला॥

गणनायक, गुण ज्ञान निधाना। पूजित प्रथम, रुप भगवाना॥

अस कहि अन्तर्धान रुप है। पलना पर बालक स्वरुप है॥

बनि शिशु, रुदन जबहिं तुम ठाना। लखि मुख सुख नहिं गौरि समाना॥

सकल मगन, सुखमंगल गावहिं। नभ ते सुरन, सुमन वर्षावहिं॥

शम्भु, उमा, बहु दान लुटावहिं। सुर मुनिजन, सुत देखन आवहिं॥

लखि अति आनन्द मंगल साजा। देखन भी आये शनि राजा॥

निज अवगुण गुनि शनि मन माहीं। बालक, देखन चाहत नाहीं॥

गिरिजा कछु मन भेद बढ़ायो। उत्सव मोर, न शनि तुहि भायो॥

कहन लगे शनि, मन सकुचाई। का करिहौ, शिशु मोहि दिखाई॥

नहिं विश्वास, उमा उर भयऊ। शनि सों बालक देखन कहाऊ॥

पडतहिं, शनि दृग कोण प्रकाशा। बालक सिर उड़ि गयो अकाशा॥

गिरिजा गिरीं विकल हुए धरणी। सो दुख दशा गयो नहीं वरणी॥

हाहाकार मच्यो कैलाशा। शनि कीन्हो लखि सुत को नाशा॥

तुरत गरुड़ चढ़ि विष्णु सिधायो। काटि चक्र सो गज शिर लाये॥

बालक के धड़ ऊपर धारयो। प्राण, मंत्र पढ़ि शंकर डारयो॥

नाम गणेश शम्भु तब कीन्हे। प्रथम पूज्य बुद्घि निधि, वन दीन्हे॥

बुद्धि परीक्षा जब शिव कीन्हा। पृथ्वी कर प्रदक्षिणा लीन्हा॥

चले षडानन, भरमि भुलाई। रचे बैठ तुम बुद्घि उपाई॥

धनि गणेश कहि शिव हिय हरषे। नभ ते सुरन सुमन बहु बरसे॥

चरण मातु-पितु के धर लीन्हें। तिनके सात प्रदक्षिण कीन्हें॥

तुम्हरी महिमा बुद्ध‍ि बड़ाई। शेष सहसमुख सके न गाई॥

मैं मतिहीन मलीन दुखारी। करहुं कौन विधि विनय तुम्हारी॥

भजत रामसुन्दर प्रभुदासा। जग प्रयाग, ककरा, दुर्वासा॥

अब प्रभु दया दीन पर कीजै। अपनी भक्ति शक्ति कछु दीजै॥

श्री गणेश यह चालीसा। पाठ करै कर ध्यान॥

नित नव मंगल गृह बसै। लहे जगत सन्मान॥

दोहा

सम्वत अपन सहस्त्र दश, ऋषि पंचमी दिनेश।

पूरण चालीसा भयो, मंगल मूर्ति गणेश॥

हे वाचा - Gauri Ganpati Muhurt 2022 : गणपती प्रतिष्ठापना, ज्येष्ठा गौरी आवाहन आणि विसर्जन, 'हे' आहेत अचूक शुभ मुहूर्त

श्री गणेश आरती

सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची|

नुरवी; पुरवी प्रेम, कृपा जयाची |

सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची|

कंठी झळके माळ, मुक्ताफळांची॥१॥

जय देव, जय देव जय मंगलमूर्ती|

दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥धृ॥

रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा|

चंदनाची उटी , कुमकुम केशरा|

हिरेजडित मुकुट, शोभतो बरा |

रुणझुणती नूपुरे, चरणी घागरिया|

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥२॥

हे वाचा - Ganesh Chaturthi 2022: रंकालाही राजा बनवणारा गणपतीचा हा एकाक्षरी मंत्र; विघ्न हरतो भक्तांची

लंबोदर पीतांबर, फणिवरबंधना |

सरळ सोंड, वक्रतुंड त्रिनयना|

दास रामाचा, वाट पाहे सदना|

संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना|

जय देव जय देव, जय मंगलमूर्ती|

दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥३॥

गण​पति बप्पा मोरया...मंगलमूर्ति मोरया...गण​पति बप्पा मोरया।

First published:

Tags: Ganesh chaturthi, Religion