मराठी बातम्या /बातम्या /religion /

Ganesh Chaturthi 2022: गणपतीचा जन्म कसा झाला? जन्माशी संबंधित या पौराणिक कथा

Ganesh Chaturthi 2022: गणपतीचा जन्म कसा झाला? जन्माशी संबंधित या पौराणिक कथा

भगवान गणेशाला एकदंत, लंबोदर, विघ्नहर्ता, विनायक अशा अनेक नावांनी ओळखले जाते. आज श्रीगणेशाच्या जन्माबाबत असलेल्या पौराणिक कथांविषयी पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्याकडून जाणून (Ganesh Chaturthi 2022) घेऊया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 31 ऑगस्ट : आज संपूर्ण भारतात गणेश चतुर्थी साजरी केली जात आहे. भगवान शिव आणि देवी पार्वतीचा पुत्र गणेशाचा जन्मोत्सव म्हणून गणेश चतुर्थी साजरी केली जाते. हिंदू परंपरेनुसार, कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणेशाची नेहमी प्रार्थना, आवाहन केले जाते. भगवान गणेश हे बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्य यांचे प्रतीक मानले जातात. भगवान गणेशाला एकदंत, लंबोदर, विघ्नहर्ता, विनायक अशा अनेक नावांनी ओळखले जाते. आज श्रीगणेशाच्या जन्माबाबत असलेल्या पौराणिक कथांविषयी पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्याकडून जाणून (Ganesh Chaturthi 2022) घेऊया.

पहिली कथा -

वराह पुराणानुसार भगवान शंकराने गणेशाला पंचमहाभूतांचे रूप दिले होते. गणेशजींना एक विशेष आणि अतिशय सुंदर रूप मिळाले होते. देवी-देवतांना गणेशाचे वेगळेपण कळल्यावर गणेश आकर्षणाचे केंद्र तर बनणार नाही ना, अशी भीती त्यांना वाटू लागली. तेव्हा शिवाने गणेशाचे पोट मोठे आणि हत्तीचे तोंड केले होते. अशा प्रकारे गणेशाचा जन्म झाला, अशी एक कथा आहे.

दुसरी कथा -

शिवपुराणानुसार देवी पार्वतीने आपल्या अंगावरील हळदीचा एक पुतळा तयार केला होता. त्यांनी नंतर पुतळ्यात प्राण आणले. अशा प्रकारे गणेशाचा जन्म झाला. यानंतर माता पार्वतीने गणेशाला घराच्या दारातून कोणालाही आत येऊ देऊ नये, अशी आज्ञा केली. गणेशजी दारात उभे असतानाच शिवाचे आगमन झाले. गणेशाने शिवाला ओळखले नाही आणि गणेशाने शंकराला आत जाण्यास नकार दिला. यावर शिवाने क्रोधित होऊन गणेशाचे डोके त्रिशूलाने धडा वेगळे केले.

हे वाचा - येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान

बाहेर गोंधळ झाल्यानंतर पार्वती बाहेर आली आणि आक्रोश करू लागली आणि गणेशाला पुन्हा जिवंत करण्यास सांगितले. तेव्हा शिवाने गरुडाला उत्तर दिशेला जाण्याची आज्ञा दिली आणि सांगितले की, जी आई आपल्या मुलाकडे पाठ करून झोपली आहे, त्या बाळाचे डोके आणा. तेव्हा गरुडाने हत्तीच्या बाळाचे डोके आणले. भगवान शिवांनी ते मुलाच्या शरीराला जोडले. त्यात त्यांनी प्राण आणले. अशा प्रकारे गणेशाला हत्तीचे शीर मिळाले.

हे वाचा - श्रावणात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना या गोष्टींमध्ये चुकू नका; हे वार आहेत महत्त्वाचे

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Ganesh chaturthi, Religion