मुंबई, 26 जानेवारी : आज 26 जानेवारीला वसंत पंचमीच्या निमित्ताने दिवसभर गजकेसरी राजयोग आहे. 27 जानेवारीच्या सायंकाळपर्यंत तो राहील. मीन राशीत गुरू आणि चंद्राच्या संयोगामुळे राजयोग तयार झाला आहे. 25 जानेवारी रोजी दुपारी, चंद्राने मीन राशीत प्रवेश केला आणि गुरु ग्रह आधीच तिथं उपस्थित होता. अशाप्रकारे हा राजयोग 25 जानेवारीच्या दुपारपासून 27 जानेवारीच्या संध्याकाळपर्यंत आहे. गजकेसरी राजयोग सर्व राशीच्या लोकांवर प्रभाव टाकेल, परंतु तीन राशीच्या लोकांना विशेष लाभ होईल. त्यांना चंद्र आणि गुरूचा आशीर्वाद मिळेल.
तीन दिवस गजकेसरी राजयोग -
तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार भार्गव सांगतात की, 25 जानेवारी रोजी दुपारी 02:30 पासून चंद्राने मीन राशीत प्रवेश केला आहे आणि 26 जानेवारी रोजी दिवसभर मीन राशीत राहील. दुसऱ्या दिवशी 27 जानेवारी रोजी संध्याकाळी 06:37 वाजता चंद्र मेष राशीत प्रवेश करेल. गुरू आधीच मीन राशीत आहे. अशाप्रकारे, मीन राशीमध्ये चंद्राची उपस्थिती 25 जानेवारी ते 27 जानेवारीपर्यंत आहे. मीन राशीत दोन्ही ग्रहांच्या युतीपासून तीन दिवस गजकेसरी राजयोग राहील.
गजकेसरी राजयोग 2023 तीन राशींना विशेष लाभदायक
वृषभ : वृषभ राशीच्या लोकांना गजकेसरी राजयोगाचा फायदा होईल. नोकरदारांना नवीन नोकरीची संधी मिळू शकते, तर बेरोजगारांनाही नोकरी मिळण्याची आनंदाची बातमी मिळू शकते.
गुरु आणि चंद्राच्या प्रभावाने तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. धन, धान्य आणि सुखात वाढ होईल. पद आणि प्रतिष्ठा देखील वाढेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. व्यवसाय करणाऱ्यांना लाभाची संधी मिळेल.
कर्क: तुमच्या राशीचा प्रमुख ग्रह चंद्र आहे. गजकेसरी राजयोगात गुरू आणि चंद्राचा सकारात्मक प्रभाव तुमच्या जीवनावर दिसू शकतो. नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल.
जे नोकरीच्या शोधात आहेत, त्यांचे काम होऊ शकते. कार्यक्षेत्रात एखादे पद मिळण्याचीही शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा सन्मान वाढेल.
हे वाचा - 'चमत्कार करणाऱ्यांनी जोशीमठ' आता थेट शंकराचार्यांचे धीरेंद्र शास्त्रींना चॅलेंज
कन्या : कन्या राशीच्या लोकांनाही गजकेसरी राजयोगाचा फायदा होऊ शकतो. व्यवसायाशी संबंधित लोकांना नवीन भागीदार मिळू शकतात, भागीदारीत तुमचा व्यवसाय प्रगती करू शकतो. लाभाच्या संधी मिळू शकतात. कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे.
तुमच्या राशीत अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे तुमची आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते. जीवन साथीदाराच्या विचारांचा आदर करा, त्यांच्या सल्ल्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.