मराठी बातम्या /बातम्या /religion /

Furniture Vastu Tips: घराचं फर्निचर पुन्हा-पुन्हा बनत नसतं; त्यासाठी कोणतं लाकूड असतं शुभ-अशुभ?

Furniture Vastu Tips: घराचं फर्निचर पुन्हा-पुन्हा बनत नसतं; त्यासाठी कोणतं लाकूड असतं शुभ-अशुभ?

फर्निचर वास्तु टिप्स

फर्निचर वास्तु टिप्स

अशुभ लाकडाच्या वापराने घरामध्ये दुःख, दारिद्र्य आणि अकाली मृत्यू यांसारख्या भयंकर घटना घडू शकतात. तर शुभ लाकूड वापरल्यानं कुटुंबात सर्व प्रकारचे सुख आणि समृद्धी येते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

मुंबई, 09 डिसेंबर : नवीन घरात राहायला गेल्यानंतर फर्निचरचं काम करून घेणं प्राथमिक गोष्ट असते, परंतु फार कमी लोकांना माहीत असेल की, फर्निचरसाठी वापरण्यात येणारे लाकूड देखील शुभ आणि अशुभ ठरतं. अशुभ लाकडाच्या वापराने घरामध्ये दुःख, दारिद्र्य आणि अकाली मृत्यू यांसारख्या भयंकर समस्या येऊ शकतात. तर शुभ लाकूड वापरल्यानं कुटुंबात सर्व प्रकारचे सुख आणि समृद्धी येते. आज आम्ही तुम्हाला अशाच शुभ आणि अशुभ लाकडांबद्दल सांगणार आहोत.

अशुभ लाकूड -

पंडित रामचंद्र जोशी यांच्या माहितीनुसार, फर्निचर बनवताना सर्वात आधी हे लक्षात ठेवले पाहिजे की जुन्या घरात वापरलेले लाकूड पुन्हा वापरले जाऊ नये. असे केल्याने वास्तुशास्त्रानुसार घराच्या मालकाचा मृत्यू होऊ शकतो. याशिवाय पिंपळ, कदंब, कडुनिंब, बहेडा, आंबा, पाकड, गुलार, सेहुद, चिंच, शिरीष, कोविदार, बाभूळ आणि सेमल वृक्षाचे लाकूड फर्निचरसाठी वापरणे देखील अशुभ मानले जाते. त्याचा घरावर अशुभ परिणाम होतो.

घर बांधण्यासाठी शुभ लाकूड

पंडित जोशी यांच्या मते, चंदन, सखू, अशोक, महुआ, आसन, देवदारू, शीशम, श्रीपर्णी, तिंदुकी, जॅकफ्रूट, खदिर, अर्जुन, शाल आणि शमी ही लाकडे घरासाठी शुभ मानली जातात. त्यांच्या वापराने घरात सर्व प्रकारची सुख-शांती नांदते असे मानले जाते. यामध्ये केवळ शीशम, श्रीपर्णी, तिंदुकी धव, जॅकफ्रूट, पाइन, पद्म आणि अर्जुन यांचे लाकूड वापरण्याची परंपरा आहे. यामध्ये इतर कोणतेही लाकूड मिसळू नये. शक्यतो इतर लाकूडही एकट्यानेच वापरावे कारण घरात एकच लाकडी फर्निचर जास्त शुभ मानले जाते.

या लाकडाचा पलंग -

वास्तुशास्त्रात श्रीपर्णी, आसन, शीशम, साग, पद्यक, चंदन आणि शिरीष यांचे लाकूड पलंगासाठी शुभ मानले जाते. यामध्ये श्रीपर्णी ही संपत्ती, रोग दूर करण्यासाठी आसन, वृद्धी वाढवण्यासाठी शिशम, सागवान हितकारक, दीर्घायुष्य वाढवण्यासाठी पद्मक, शत्रूंचा नाश आणि सुख देणारे चंदन आणि शिरीष हे सर्व प्रकारे शुभ मानले जातात.

हे वाचा - ॐ च्या शक्तीचे रहस्य अगाद! फक्त नामस्मरण करण्याचा असा होतो फायदा

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Lifestyle, Vastu