करिअर, नशीब चमकण्यासाठी डॉल्फिन माशाची मूर्ती ठरते शुभ; संचारते सकारात्मक ऊर्जा

करिअर, नशीब चमकण्यासाठी डॉल्फिन माशाची मूर्ती ठरते शुभ; संचारते सकारात्मक ऊर्जा

फेंगशुईनुसार डॉल्फिन माशाची मूर्ती घराच्या ड्रॉईंग रूममध्ये किंवा झोपण्याच्या खोलीत ठेवणे शुभ असते. अशी मूर्ती घरात ठेवल्याने उत्पन्न वाढते. घरातील वातावरण प्रसन्न राहील. मासे हे सुख आणि शांतीचे प्रतीकही मानले जातात.

  • Share this:

मुंबई, 07 ऑगस्ट : कोणत्याही व्यक्तीची इच्छा असते की, आपली आर्थिक उन्नती व्हावी. आपल्या घरात लक्ष्मीचा वास असावा. घरात राहणाऱ्या लोकांचे आरोग्य चांगले राहावे, घरात आर्थिक सुबत्ता असावी. समाजात घरातील लोकांची प्रतिष्ठा वाढावी. वास्तुशास्त्र आणि फेंगशुईमध्ये अनेक प्रकारचे उपाय सांगण्यात आले आहेत. फेंगशुईमध्ये घराच्या प्रगतीसाठी, आर्थिक स्थितीत वाढ आणि घरात शांतता यासाठी माशांनाही विशेष महत्त्व दिले गेले आहे. घरात मासे ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा संचारते, असे मानले जाते. घरात डॉल्फिन माशाचा पुतळा ठेवल्याने घरातील वातावरण हसते-खेळते राहते. पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्याकडून जाणून घेऊया डॉल्फिन माशाचा पुतळा घरी ठेवण्याचे काय फायदे (Feng Shui Vastu Shastra) आहेत.

डॉल्फिन माशाची मूर्ती घरी ठेवण्याचे फायदे -

फेंगशुईनुसार डॉल्फिन माशाची मूर्ती घराच्या ड्रॉईंग रूममध्ये किंवा झोपण्याच्या खोलीत ठेवणे शुभ असते. अशी मूर्ती घरात ठेवल्याने उत्पन्न वाढते. घरातील वातावरण प्रसन्न राहील. मासे हे सुख आणि शांतीचे प्रतीकही मानले जातात. मत्स्यालयामध्ये आठ काळे आणि एक सोनेरी मासा फेंगशुईमध्ये विशेषतः शुभ मानला गेला आहे. दिवाणखान्यात उत्तर दिशेला डॉल्फिन माशाची मूर्ती ठेवावी. व्यवसायात दीर्घकाळ मंदी असेल तर अशा लोकांनी आपल्या व्यावसायिक आस्थापनात शक्य असल्यास डॉल्फिन मासे पाळावेत किंवा छोटी मूर्ती ठेवावी. त्यामुळे नोकरी आणि व्यवसायात वाढ होते. मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत उत्तर दिशेला डॉल्फिनची मूर्ती ठेवल्याने ते त्यांच्या अभ्यासात गुंतून राहतात.

हे वाचा - श्रावणात तुम्हालाही अशी स्वप्ने पडतात का? शिव महादेवाचा आशीर्वाद मिळण्याचे असतात ते संकेत

मत्स्यालयात मृत मासे ठेवू नये -

फेंगशुईच्या मते, मासे मरतात तेव्हा ते त्वरित मत्स्यालयातून काढून टाकले पाहिजे. गोल्ड फिशपेक्षा काळे मासे जास्त मरतात असे दिसून येते. फेंगशुईनुसार असे मानले जाते की, जेव्हा काळा मासा मरण पावतो, तेव्हा त्याचे बलिदान तुमच्या मार्गावर येणारे दुर्दैवी घटना टाळण्यासाठी होते.

हे वाचा - श्रावणात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना या गोष्टींमध्ये चुकू नका; हे वार आहेत महत्त्वाचे

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

Published by: News18 Desk
First published: August 7, 2022, 6:30 AM IST

ताज्या बातम्या