मराठी बातम्या /बातम्या /religion /

बेडरूममध्ये ठेवलेल्या या गोष्टी लग्नात आणतात विघ्न, तुम्हीदेखील ही चूक करत नाही ना?

बेडरूममध्ये ठेवलेल्या या गोष्टी लग्नात आणतात विघ्न, तुम्हीदेखील ही चूक करत नाही ना?

वास्तूनुसार गोष्टी व्यवस्थित ठेवल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. कुटुंबात आनंदाचे वातावरण तयार होते, त्यामुळे याविषयी वास्तुशास्त्राचे नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

वास्तूनुसार गोष्टी व्यवस्थित ठेवल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. कुटुंबात आनंदाचे वातावरण तयार होते, त्यामुळे याविषयी वास्तुशास्त्राचे नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

वास्तूनुसार गोष्टी व्यवस्थित ठेवल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. कुटुंबात आनंदाचे वातावरण तयार होते, त्यामुळे याविषयी वास्तुशास्त्राचे नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 18 ऑगस्ट : आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीचे स्वतःचे महत्त्व असते आणि त्याचा परिणाम जीवनाशीही निगडीत असतो. बऱ्याचदा आपण अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, ज्यामुळे आपल्या जीवनात दुःख आणि संकटे येतात. आजची चूक आपल्या भविष्यात अडथळा ठरू शकते. फेंगशुई शास्त्रामध्येही अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. घरात आणि खोलीत ठेवलेल्या वस्तूंचा आपल्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडत असतो. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार घरात कोणत्या वस्तू कशा ठेवाव्यात याबद्दल माहिती दिली आहे. अविवाहित तरुण-तरुणींची वास्तुशास्त्रानुसार बेडरूम कशी असावी, याविषयी पंडित इंद्रमणी घनश्याल यांनी माहिती दिली आहे. वास्तुशास्त्राचे नियम - जर घरामध्ये वस्तू योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेला ठेवल्या नाहीत तर त्या आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. चुकीच्या दिशेला ठेवलेल्या वस्तूंमुळे जीवनात नकारात्मकता येते. तर वास्तूनुसार गोष्टी व्यवस्थित ठेवल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. कुटुंबात आनंदाचे वातावरण तयार होते, त्यामुळे याविषयी वास्तुशास्त्राचे नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे. बेडरूममध्ये या गोष्टी ठेवू नका - फेंगशुई शास्त्रानुसार, अविवाहित तरुण-तरुणींच्या बेडरूमचे छत दोन भागात विभागलेले असू नये. यामुळे लग्नानंतर प्रेम जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. अविवाहित व्यक्तींनी दोन गाद्या असलेल्या पलंगावर झोपू नये. त्यामुळे होणाऱ्या दाम्पत्यातील अंतर वाढते. बेडरूममध्ये नद्या, तलाव, धबधबे यांची चित्रे शक्यतो लावू नयेत. त्यामुळे वैवाहिक जीवनात अडथळे निर्माण होऊ शकतात. पलंगाच्या समोर शौचालयाचे गेट असल्यास ते नेहमी बंद ठेवा. हे वाचा - श्रावणात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना या गोष्टींमध्ये चुकू नका; हे वार आहेत महत्त्वाचे तसेच पलंगाच्या समोर आरसा ठेवणे देखील अशुभ मानले जाते. यामुळे लव्ह लाईफमध्येही अडथळे निर्माण होऊ शकतात. पलंगाचा कोपरा खिडकी, दरवाजाला लागून नसावा कारण यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि तुमच्या आयुष्यात अडचणी येण्याची शक्यता असते. हे वाचा - श्रावणात तुम्हालाही अशी स्वप्ने पडतात का? शिव महादेवाचा आशीर्वाद मिळण्याचे असतात ते संकेत (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Lifestyle, Vastu

पुढील बातम्या