मराठी बातम्या /बातम्या /religion /

ड्रॅगनचा फोटो/मूर्ती घरात ठेवल्याने बदलेल नशीब; रंगाशी संबंधित या गोष्टी लक्षात ठेवा

ड्रॅगनचा फोटो/मूर्ती घरात ठेवल्याने बदलेल नशीब; रंगाशी संबंधित या गोष्टी लक्षात ठेवा

Feng Shui Dragon: ड्रॅगन योग्य ठिकाणी ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. फेंगशुई शास्त्रानुसार ड्रॅगनला घरात मोकळ्या जागेवर ठेवणे शुभ असते. त्याविषयी अधिक जाणून घेऊया.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 08 ऑगस्ट : फेंगशुई शास्त्रामध्ये ड्रॅगनला शक्ती, श्रेष्ठता, देवत्व, महानता आणि शौर्याचे प्रतीक मानले जाते. फेंगशुईनुसार घरात सोनेरी ड्रॅगन ठेवणे शुभ असते. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा संपते आणि कुटुंबात सुख-समृद्धी नांदते. फेंगशुई शास्त्रामध्ये ड्रॅगनला घरी ठेवण्याचे योग्य नियम आणि दिशा सांगण्यात आली आहे. यासोबतच ड्रॅगनच्या रंगाशी संबंधित महत्त्वाचीही माहिती देण्यात आली आहे. पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्याकडून घरात ड्रॅगन ठेवण्याविषयी जाणून (Feng Shui Dragon) घेऊया. घरात ड्रॅगन कुठे ठेवायचा? फेंगशुईनुसार, ड्रॅगन योग्य ठिकाणी ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. फेंगशुई शास्त्रानुसार ड्रॅगनला घरात मोकळ्या जागेवर ठेवणे शुभ असते. यामुळे घरामध्ये सकारात्मक उर्जा संचारते. परंतु, घराबाहेर त्याचे तोंड करू नये, यामुळे धनहानी होऊ शकते. ड्रॅगनला स्टडी रूममध्ये ठेवल्याने मुलांना अभ्यासाची आवड निर्माण होते. अभ्यासाच्या खोलीत तो ईशान्य किंवा वायव्य दिशेला ठेवावा. त्याचप्रमाणे, व्यवसायात नफा नसल्यास आपण तो आपल्या कार्यालयात किंवा कामाच्या ठिकाणीही ठेवू शकता. यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा होईल. हे वाचा - श्रावणात तुम्हालाही अशी स्वप्ने पडतात का? शिव महादेवाचा आशीर्वाद मिळण्याचे असतात ते संकेत अशा ठिकाणी ड्रॅगन ठेवू नये - फेंगशुई शास्त्रानुसार दिवाणासमोर ड्रॅगन ठेवू नये. तसेच तो आपल्या बेडरूममध्ये किंवा कोणत्याही उंच ठिकाणी ठेवू नये. त्यामुळे घरात तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते. फेंगशुईनुसार, हिरवा रंगाचा ड्रॅगन आरोग्यासाठी चांगला मानला जातो, तर सोनेरी ड्रॅगन समृद्धीसाठी चांगला मानला जातो. जर कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे आरोग्य चांगले नसेल तर घरात हिरव्या रंगाच्या ड्रॅगनची जोडी घरात ठेवावी. यामुळे आरोग्यासोबतच आर्थिक लाभही होईल. हे वाचा - श्रावणात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना या गोष्टींमध्ये चुकू नका; हे वार आहेत महत्त्वाचे (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Religion, Vastu

पुढील बातम्या