मुंबई, 10 जानेवारी : भगवान गणेशाची अनेक मंदिरे भारतात आहेत. प्रत्येक मंदिर आपल्या अनोख्या वैशिष्ट्यांमुळे देशातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. गणपतीचे असे एक मंदिरदेखील आहे, जिथे बाप्पा आपल्या 5 पत्नी, तसेच दोन मुले आणि नातवंडांसह विराजमान आहेत. असे मानले जाते की गणपतीचे हे एकमेव मंदिर आहे, जेथे ते संपूर्ण कुटुंबासह आहेत. जाणून घ्या या मंदिराच्या खास गोष्टी.
गणपती बाप्पा कुटुंबासह विराजमान
इंदूर शहराच्या पश्चिम भागात विद्याधाम येथे प्रसिद्ध गणेश मंदिर आहे. या मंदिरात भगवान गणेश त्यांच्या पाच पत्नी (रिद्धी, सिद्धी, तुष्टी, पुष्टी, श्री), 2 मुलगे (लाभ, शुभ) आणि 2 नातू (आमोद, प्रमोद) यांच्यासह विराजमान आहेत.
कधी बांधले गेले मंदिर
असे मानले जाते की, 1995 मध्ये जेव्हा विद्याधाम बांधले गेले तेव्हा या ठिकाणी असलेल्या 14 मंदिरांमध्ये गणेशाचे एक मंदिर बांधले गेले होते. या जागेची स्थापना महामंडलेश्वर गिरजानंद सरस्वती यांच्या हस्ते झाली होती.
गणेशोत्सवात विशेष कार्यक्रम
गणेशोत्सवादरम्यान या मंदिरात रोज काही ना काही विधी केले जातात. यामध्ये 108 गणपती अथर्वशीर्षाच्या पठणाबरोबरच 1100 लाडू अर्पण करणे सर्वात विशेष मानले जाते.
असे सांगतात की, भगवान गणेशाच्या पाच पत्नी रिद्धी-सिद्धी, पुष्टी, पुष्टी आणि श्री. बहुतेक मंदिरांमध्ये वक्रतुंड गजानन रिद्धी-सिद्धींसोबतच दिसतात. त्यांच्या इतर तीन बायकांबद्दलही भक्तांना कमी माहिती आहे. शास्त्रात त्यांचा उल्लेख आहे. याशिवाय दोन मुलगे लाभ-शुभ आणि नातू आमोद, प्रमोद हेही येथे बसले आहेत. हे स्थान प्रामुख्याने श्री विद्या राजराजेश्वरी माँ परंबा ललिता महात्रिपुरसुंदरी यांना समर्पित आहे. येथे महात्रिपुरसुंदरी देवीची आठ फूट उंचीची मूर्ती आहे. या मूर्तीमध्ये देवी सिंहावर नसून महादेवाच्या नाभीतून निघालेल्या कमळावर विराजमान आहे.
प्रत्येक क्षणात आनंद
येथे असलेल्या सर्व मंदिरांमध्ये सूर्योदयापासून रात्री विश्राम आरतीपर्यंत दर तासाला भोग दिले जातात. येथे दिवसातून दोनदा सजावट केली जाते. दक्षिण भारतीय शैलीत बांधलेल्या या मंदिरात शिव कुटुंब आणि गणेश कुटुंब आहे.
विद्याधामवर वसलेले आहे हे मंदिर
भगवान परशुराम, हनुमान, शालिग्राम, नवग्रह, शीतला माता आणि भैरवजींची मंदिरेही आहेत. मंदिरात वर्षभर कार्यक्रम होतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Famous temples, Lifestyle, Religion