- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- टेक्नोलाॅजी
- अॅस्ट्रोलॉजी
- #CryptoKiSamajh
आपल्या हातून अशा गोष्टी खाली पडणं मानलं जातं अशुभ; संकटांची मालिकाच होते सुरू

अशा अनेक गोष्टी वास्तुशास्त्रात सांगण्यात आल्या आहेत. त्यांचे जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम होतात. हातातून काही गोष्टी खाली पडणे अशुभ मानलं जातं, त्याविषयी जाणून घेऊया.
- News18 Lokmat
- Last Updated: Aug 5, 2022 01:37 AM IST
मुंबई, 05 ऑगस्ट : आयुष्यात अनेकदा अशा काही घटना घडतात, ज्या आपल्याला भविष्याचे संकेत देत असतात. हातातून काही वस्तू पडणे अशुभ मानले जाते, असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे. अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या हातातून पडण्याने जीवनात वाईट संकटे सुरू होऊ शकतात. अशा अनेक गोष्टी वास्तुशास्त्रात सांगण्यात आल्या आहेत. त्यांचे जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम होतात. पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्याकडून जाणून घेऊया अशा वस्तूंविषयी, ज्या हातातून पडणे अशुभ मानले (Inauspicious Signs) जाते.
मीठ -
अचानक आपल्या हातातून मीठ पडलं, तर येत्या काही दिवसांत पैशांची कमतरता भासण्याची शक्यता असते. वास्तुशास्त्रानुसार एखाद्याच्या हातातून मीठ पडले तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात आर्थिक समस्या येऊ लागतात. शुक्र आणि चंद्राचाही मिठाशी संबंध आहे, त्यामुळे मीठ पडण्याचा आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम होतो.
दूध सांडणे -
हातातून दूध सांडणे देखील अशुभ मानले जाते. असं म्हटलं जातं की हातातून दूध पडलं तर कुटुंबात तणाव निर्माण होतो. वास्तुशास्त्रानुसार, दूध सांडणे म्हणजे घरात संकटे येण्याची शक्यता आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होऊ लागतात.
धान्य सांडणे -
वास्तुशास्त्रानुसार तांदूळ किंवा गहू यांसारखे धान्य आपल्या हातून सांडले तर ते देखील अशुभ मानले जाते. हातातून धान्य सांडणे हा अन्नपूर्णा मातेचा अपमान मानला जातो आणि धान्य सांडल्याने माणसाच्या जीवनात अन्नाची कमतरता येऊ शकते. संबंधित व्यक्तीला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
मिरपूड पडणे -
काळी मिरी आरोग्याशी निगडीत मानली जाते आणि काळी मिरी पडणे म्हणजे येत्या काही दिवसांत तुमच्या किंवा जवळच्या व्यक्तीला आरोग्याचा त्रास होऊ शकतो.
पूजेची थाळी -
पूजेचे ताट पडणे देखील शास्त्रात अशुभ मानले गेले आहे. याचा अर्थ देवाने तुमची पूजा स्वीकारली नाही. त्यामुळे कुटुंबावर मोठे संकट येऊ शकते. अशा वेळी संकट दूर करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी.
हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर
सिंदूर पडणे -
सिंदूर पडणे हे देखील चांगले लक्षण नाही. असे म्हणतात की सिंदूर पडणे हे काही संकट येण्याचे लक्षण आहे. त्यामुळे व्यवसायातही आर्थिक नुकसान होण्याचा धोका आहे.
हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)