मराठी बातम्या /बातम्या /religion /आजही या मंदिरात आहे प्रभु श्रीरामांनी भंग केलेल्या शिवधनुष्याचा तुकडा

आजही या मंदिरात आहे प्रभु श्रीरामांनी भंग केलेल्या शिवधनुष्याचा तुकडा

Ram Navami 2023 : जाणून घेऊया 'पिनाक धनुष्याची' (शिवधनुष्य) ची कहाणी.

Ram Navami 2023 : जाणून घेऊया 'पिनाक धनुष्याची' (शिवधनुष्य) ची कहाणी.

Ram Navami 2023 : जाणून घेऊया 'पिनाक धनुष्याची' (शिवधनुष्य) ची कहाणी.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 25 मार्च: रामनवमी येण्यास आता अवघे काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला रघुनंदन श्रीरामांच्या अलौकिक आयुष्यातील त्या महत्त्वाच्या भागाबद्दल सांगणार आहोत, ज्या क्षणी त्यांचे नाते माता सीतेशी जोडले गेले होते. आम्ही सीता स्वयंवराबद्दल सांगत आहोत.

या स्वयंवरात प्रभु रामाने महादेवाचे धनुष्य तोडले आणि सीता स्वयंवरात आपला विजय नोंदवला. पण तुम्हाला माहिती आहे का की जेव्हा श्रीरामांनी धनुष्य तोडले तेव्हा त्याचे तीन भाग झाले, त्यातील एक भाग नेपाळमधील या ठिकाणी पडला. चला तर मग जाणून घेऊया 'पिनाक धनुष्याची' (शिवधनुष्य) ची कहाणी.

प्रभु राम सीता स्वयंवरात कसे पोहोचले

पौराणिक कथेनुसार, भगवान राम आणि त्यांचे बंधु लक्ष्मण हे महर्षी विश्वामित्रांसह जनकपूर (नेपाळ) मिथिला शहरात पोहोचले होते. त्याच वेळी राजा जनकजींनी माता जानकीचा स्वयंवर ठेवला होता. तेव्हा राजा जनकाने विश्वामित्रांना सीता स्वयंवराकडे येण्याचे आमंत्रण दिले. तेव्हा मुनी विश्वामित्र अयोध्येच्या दोन्ही राजपुत्रांना घेऊन राजा जनकाच्या दरबारात पोहोचले. अनेक मोठे आणि पराक्रमी राजे तिथे बसलेले होते.

अशा प्रकारे श्रीरामांनी तोडले महादेवाचे धनुष्य

राजा जनकजींनी या स्वयंवरात एक अट घातली होती की जो कोणी महादेवाच्या धनुष्याला प्रत्यंचा चढवेल त्याच्याशी सीतेचा विवाह होईल. पण तिथे उपस्थित असलेल्या एकाही राजाला ते धनुष्य हलवताही आले नाही. मग भगवान श्रीरामांनी शिवाच्या धनुष्यावर प्रत्यंचा चढवली आणि जनकनंदिनीला आपली अर्धांगिनी बनवले. असे म्हणतात की, धनुष्यावर प्रत्यंचा चढवताना प्रभु श्रीरामांच्या हातून ते शिवधनुष्य तुटले, त्याचा एक भाग नेपाळच्या या भागात पडला. या धनुष्याचा तुकडा पडल्यामुळे या ठिकाणाला धनुषा असे नाव पडले, ज्याला आता धनुषा धाम असेही म्हणतात.

जाणून घ्या धनुषा धामबद्दल

धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा श्रीरामांनी शिवधनुष्य तोडले. तेव्हा धनुष्याचा एक तुकडा आकाशात उडाला, दुसरा तुकडा पाताळात आणि तिसरा तुकडा पृथ्वीवर पडला. जो भाग पृथ्वीवर पडला, तोच भाग पुढे धनुषधाम झाला. आजही धनुषा धाममध्ये भगवान शंकराच्या पिनाक धनुष्याच्या अवशेषांची विधीपूर्वक पूजा केली जाते. माघातील मकर संक्रांतीच्या दिवशी धनुषा धाम येथे यात्रेचीही आयोजन केले जाते. या मंदिरावर लोकांची नितांत श्रद्धा आहे. येथे शिवधनुष्यासह भगवान राम आणि माता सीता यांची पूजा केली जाते. असे म्हणतात की येथे मागितलेली प्रत्येक कामना पूर्ण होते.

राम नवमीचे महत्त्व

रामभक्त वर्षभर या शुभ दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. आजही मर्यादा पुरुषोत्तम राम यांच्या जीवनाचे सार प्रत्येक घराघरात रामायणाच्या माध्यमातून सांगितले जाते. असे मानले जाते की, कौशल्यानंदन हे भगवान विष्णूंचा अवतार होते. रामनवमीच्या दिवशी रामजींसह माता सीता, लक्ष्मणजी आणि बजरंगबली यांची पूजा करण्याची रीत आहे. यावर्षी रामनवमी 30 मार्च 2023 रोजी साजरी होणार आहे.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion