स्वप्नात चिमणी-पोपटासारखे हे 7 पक्षी दिसणं असतं शुभ, अचानक बदलतं नशीब

स्वप्नात चिमणी-पोपटासारखे हे 7 पक्षी दिसणं असतं शुभ, अचानक बदलतं नशीब

झोपेत दिसणारी काही स्वप्ने शुभ तर काही अशुभ गोष्टीचे संकेत असतात. अनेकदा आपल्याला स्वप्नात विविध प्रकारचे पक्षी दिसतात. यापैकी काही पक्षी स्वप्नात दिसणे खूप शुभ मानले जाते.

  • Share this:

मुंबई, 18 ऑगस्ट : माणसाला झोपेत अनेक प्रकारची स्वप्ने दिसतात. स्वप्नशास्त्रानुसार कोणतेही स्वप्न विनाकारण नसते, स्वप्नात दिसणार्‍या गोष्टी भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत मानल्या जातात. झोपेत दिसणारी काही स्वप्ने शुभ तर काही अशुभ गोष्टीचे संकेत असतात. अनेकदा आपल्याला स्वप्नात विविध प्रकारचे पक्षी दिसतात. यापैकी काही पक्षी स्वप्नात दिसणे खूप शुभ मानले जाते. हे पक्षी स्वप्नात पाहणे म्हणजे आगामी काळात आपल्याला नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि आपल्या प्रत्येक कामात यश मिळेल, असा त्याचा अर्थ असतो. याविषयी दिल्लीचे आचार्य गुरमीत सिंहजी यांच्याकडून जाणून घेऊया, स्वप्नात कोणते पक्षी पाहणे चांगले मानले (Swapna Shastra) जाते.

स्वप्नात हे 7 पक्षी दिसणे शुभ मानलं जातं -

मोर- स्वप्नात मोर दिसला तर समजून घ्या की जीवनात सुख-समृद्धी येणार आहे आणि तुम्हाला काही मोठी गोष्ट मिळणार आहे. मात्र, स्वप्नात फक्त पांढरा मोर दिसणे शुभ मानले जाते. जर आपण शनिदेवाला मोरावर बसलेले पाहिले असेल तर ते खूप शुभ आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला लवकरच भरपूर पैसे मिळणार आहेत.

पोपट- स्वप्नात पोपट दिसणे हे शुभवर्तमानाचे लक्षण मानले जाते. स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात पोपटाची जोडी दिसली तर याचा अर्थ घरात नवीन पाहुणे येणार आहेत. पोपटाची जोडी पाहिल्याने वैवाहिक जीवनातही प्रेम वाढते.

नीलकंठ- नीलकंठ पक्षी स्वप्नात पाहणे शुभ असते. स्वप्नात नीलकंठ पक्षी दिसणे हे एक अतिशय शुभ लक्षण आहे. हे लक्षण आहे की, तुम्हाला लवकरच तुमचा जीवनसाथी मिळणार आहे.

हंस- स्वप्नात राजहंस दिसणे, पाण्यात तरंगणारा हंस पाहणे, दोन हंसांची जोडी पाहणे किंवा हंस धान्य खाताना दिसणे शुभ आहे. अशी स्वप्ने म्हणजे तुमच्या घरी काही शुभ कार्य किंवा आर्थिक लाभ होणार असल्याचे लक्षण आहेत. हंसाचे स्वप्न सुख आणि समृद्धीची शुभ चिन्हे देतात. पण, स्वप्नात काळा हंस किंवा मृत हंस दिसणे फारच अशुभ आहे.

हे वाचा - श्रावणात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना या गोष्टींमध्ये चुकू नका; हे वार आहेत महत्त्वाचे

सारस - स्वप्नात सारस पक्षी पाहणे धनप्राप्तीशी संबंधित आहे. जर तुम्ही तुमच्या स्वप्नात सारस पक्षी पाहिला असेल तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला व्यवसायात नफा होईल, नोकरीत प्रगती होईल किंवा तुम्हाला कुठूनतरी अचानक धन मिळू शकेल. आकाशात उडणारे सारस पाहणे, धान्य खाणारा सारस पाहणे आणि जोड्यांमध्ये सारस पाहणे खूप शुभ आहे. परंतु, मासा पकडत असलेला सारस किंवा मृत सारस दिसणे अशुभ आहे.

चिमण्या - स्वप्नात चिमण्या किंवा चिमण्यांचा किलबिलाट होताना दिसणे शुभ मानले जात नाही. मात्र, नुसत्या चिमण्या पाहणे शुभ असते. स्वप्नात चिमण्या किंवा बुलबुल सारखे पक्षी दिसले तर घरात आनंदाचे आगमन होणार असल्याचे लक्षण आहे.

घुबड- स्वप्नात घुबड दिसणे खूप शुभ असते. स्वप्नात घुबड दिसल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. असे स्वप्न पैसे मिळण्याचे लक्षण मानले जाते.

हे वाचा - श्रावणात तुम्हालाही अशी स्वप्ने पडतात का? शिव महादेवाचा आशीर्वाद मिळण्याचे असतात ते संकेत

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

Published by: News18 Desk
First published: August 18, 2022, 10:30 PM IST

ताज्या बातम्या