मराठी बातम्या /बातम्या /religion /

Vastu Tips : मोहरीचा हा उपाय केल्यास होईल आर्थिक भरभराट; काही दिवसांतच बदलेल तुमचं नशीब

Vastu Tips : मोहरीचा हा उपाय केल्यास होईल आर्थिक भरभराट; काही दिवसांतच बदलेल तुमचं नशीब

मोहरीचे उपाय दूर करतील आर्थिक समस्या

मोहरीचे उपाय दूर करतील आर्थिक समस्या

प्रत्येकाची चांगले जीवन जगण्याची इच्छा असते. त्यासाठी लोक रात्रंदिवस मेहनत करतात. पण कधी कधी खूप प्रयत्न करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाही. परंतु काही उपाय केल्याने तुमचे आयुष्य बदलू शकते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 25 ऑगस्ट : सध्याच्या स्पर्धेच्या युकात प्रत्येक जण चांगले आयुष्य जगण्यासाठी मेहनत करत आहे. प्रत्येकाला आयुष्यात पैसा कमवायचा आहे आणि श्रीमंत व्हायचे आहे. प्रत्येकाची चांगले जीवन जगण्याची इच्छा असते. त्यासाठी लोक रात्रंदिवस मेहनत करतात. पण कधी कधी खूप प्रयत्न करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाही. खूप मेहनत करूनही लोकांना अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. परंतु काही उपाय केल्याने तुमचे आयुष्य बदलू शकते. आज आम्ही येथे मोहरीचा एक अतिशय फायदेशीर उपाय सांगणार आहोत. याचा उपायोग करून तुम्ही तुमची आर्थिक बाजू समृद्ध करू शकता. हा उपाय केल्याने तुमची आर्थिक भरभराट होऊ शकते.

मोहरीचे हे उपाय दूर करतील आर्थिक सर्व समस्या

आर्थिक भरभराटीसाठी करा हा उपाय

शास्त्रानुसार स्वयंपाकघरात असलेली मोहरी तुमचे भाग्य बदलू शकते. तुम्ही खूप मेहनत करत असाल आणि तरीही तुम्हाला अपेक्षित परिणाम आणि यश मिळत नसेल तर काही उपाय केल्याने तुमचे भाग्य बदलू शकते. तुम्हाला सर्व बाजूंनी आर्थिक समस्या येत असतील तर काळजी करू नका. केवळ एक उपाय करा. एक घागर पाण्याने भरा आणि त्यात मोहरीची पाने घाला आणि शनिवारनंतर त्या पाण्याने स्नान करा. असे केल्याने तुमचा वाईट काळ संपू शकतो. यासोबतच तुम्हाला गरिबी आणि इतर आजारांपासूनही मुक्ती मिळू शकते.

अद्भुत! अभिषेकावेळी देवी बंद करते आपले डोळे; विश्वास बसत नाही तर पाहा हा VIDEO

वाईट नजरेपासून राहाल सुरक्षित

तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला कुणाची वाईट नजर लागली असेल तर त्याची नजर काढण्यासाठी मोहरीचे सात दाने, मिठाचे सात छोटे खडे आणि सात अख्ख्या लाल मिरच्या घ्या. यानंतर नजर लागलेल्या व्यक्तीची या सर्व गोष्टीचा उपयोग करून सात वेळा नजर काढा आणि ते सर्व जाळून टाका. हा उपाय करताना कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. नजर काढण्यासाठी नेहमी डाव्या हाताचा उपयोग करा.

Famous Temples: तुटलेलं हाड जोडतो इथला हनुमान; प्रसिद्ध मंदिराविषयी माहीत आहे का?

अडथळे दूर करण्यासाठी करा हा उपाय

तुमचे कोणतेही काम होता होता बिघडत असेल तर त्यासाठी मोहरी खूप फायदेशीर उपाय ठरू शकते. रविवारी गरीबांना मोहरी आणि थोडी दक्षिणा दान करा. हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतील.

(हे लक्षात ठेवा की हे उपाय काही गृहितके, मान्यता आणि उपलब्ध माहितींवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याचे समर्थन करत नाही.)

First published:

Tags: Lifestyle, Religion, Vastu