मराठी बातम्या /बातम्या /religion /

नशिबाची साथ हवी असेल तर ही कामे न चुकता करा, अनेक अडचणी होतील आपोआप दूर

नशिबाची साथ हवी असेल तर ही कामे न चुकता करा, अनेक अडचणी होतील आपोआप दूर

दू धर्मग्रंथांमध्ये असे सांगितले आहे की, रात्री झोपण्यापूर्वी काही ठराविक कामे करू नये. याशिवाय अशा काही गोष्टी आहेत, ज्या रात्री झोपण्यापूर्वी केल्या तर व्यक्तीचे नशीब बदलू शकते.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 22 सप्टेंबर : हिंदू धर्मात देवी-देवतांची पूजा करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. प्रत्‍येक व्‍यक्‍ती सकाळी उठताच सर्वप्रथम आपल्‍या इष्‍ट देवाचे नाव घेते आणि आजचा दिवस चांगला जावो आणि कामात यश मिळो, अशी प्रार्थना करतो. काही लोक रात्री झोपतानाही आपल्या इष्टदेवाचे स्मरण करतात. ज्योतिष शास्त्रात असे मानले जाते की, रात्री झोपण्यापूर्वी देवतांचे नाव घेतले तर ते प्रसन्न होऊन भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. कोणत्याही देवी किंवा देवतेचे नाव घेण्याचे काही नियम ज्योतिषशास्त्रात सांगितले आहेत, ज्याबद्दल भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा सांगत आहेत. हिंदू धर्मग्रंथांमध्ये असे सांगितले आहे की, रात्री झोपण्यापूर्वी काही ठराविक कामे करू नये. याशिवाय अशा काही गोष्टी आहेत, ज्या रात्री झोपण्यापूर्वी केल्या तर व्यक्तीचे नशीब बदलू शकते. रात्री झोपण्यापूर्वी अशा कोणकोणत्या गोष्टी करू शकता, ज्यामुळे माणसाचे नशीब बदलू शकते. हे काम रात्री झोपण्यापूर्वी करावे - हिंदू धर्मग्रंथांमध्ये रात्री झोपताना काही गोष्टी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उदाहरणार्थ, झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी सोबत ठेवावे आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी घराबाहेर असलेल्या झाडात टाकावे. असे मानले जाते की असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तसेच व्यक्तीच्या विवेकामध्ये सकारात्मकता वाढते. हे वाचा -  कोणतंही रत्न धारण करण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी, फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं हिंदू धर्मग्रंथांमध्ये असे मानले जाते की, घराच्या सुख-समृद्धीचा संबंध घराच्या स्वयंपाकघराशी असतो, त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी घराचे स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ केले पाहिजे. स्वयंपाकघरात कोणत्याही प्रकारची खरखटी भांडी ठेवू नका. असे केल्याने देवी लक्ष्मीचा कोप होतो, असे मानले जाते. हिंदू धर्मात रात्रीच्या वेळी घर झाडून घेण्यासही मनाई आहे. असे मानले जाते की रात्री किंवा सूर्यास्तानंतर घर झाडून घेतल्याने दरिद्रता येते आणि घरातील सुख-समृद्धी नष्ट होते. हे वाचा - येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Lifestyle, Religion

पुढील बातम्या