मराठी बातम्या /बातम्या /religion /

ऐन दिवाळीतलं सूर्यग्रहण 'या' चार राशींसाठी ठरेल प्रतिकूल

ऐन दिवाळीतलं सूर्यग्रहण 'या' चार राशींसाठी ठरेल प्रतिकूल

नवरात्रोत्सव, दसऱ्यानंतर दिवाळी साजरी होणार आहे. यंदा 24 ऑक्टोबरला दिवाळी आहे. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजा होईल. या दिवशी सूर्यग्रहण आहे,

नवरात्रोत्सव, दसऱ्यानंतर दिवाळी साजरी होणार आहे. यंदा 24 ऑक्टोबरला दिवाळी आहे. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजा होईल. या दिवशी सूर्यग्रहण आहे,

नवरात्रोत्सव, दसऱ्यानंतर दिवाळी साजरी होणार आहे. यंदा 24 ऑक्टोबरला दिवाळी आहे. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजा होईल. या दिवशी सूर्यग्रहण आहे,

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 26 सप्टेंबर : खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या वैशिष्ट्यपूर्ण घटना मानल्या जातात. या दोन्ही ग्रहणांना ज्योतिषशास्त्रातदेखील विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. नवरात्रोत्सवापासून सणासुदीला प्रारंभ झाला आहे. लवकरच दसरा आणि दिवाळीसारखे महत्त्वाचे सणदेखील येणार आहेत. हा कालावधी शुभ मानला जातो; पण यंदा ऐन दिवाळीत सूर्यग्रहण आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हा योग विशेष आहे. या कालावधीत सूर्य तूळ राशीत असेल. तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि ही सूर्यची रास आहे. त्यामुळे या ग्रहणाचे सर्व राशींवर अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम दिसून येतील.

त्यामुळे चार राशींसाठी हे ग्रहण काहीसं अशुभ फलदायी ठरू शकतं, असं ज्योतिष शास्त्राचे जाणकार सांगतात. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

नवरात्रोत्सव, दसऱ्यानंतर दिवाळी साजरी होणार आहे. यंदा 24 ऑक्टोबरला दिवाळी आहे. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजा होईल. या दिवशी सूर्यग्रहण आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हे ग्रहण बारापैकी चार राशींसाठी प्रतिकूल ठरू शकते. या ग्रहणाचा सुतक काळ 12 तास अगोदर सुरू होईल.

सूर्यग्रहण 25 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजून 29 मिनिटांनी सुरू होईल. त्यामुळे ग्रहणाचा सुतक काळ 24 ऑक्टोबर अर्थात दिवाळीच्या रात्री 2 वाजून 30 मिनिटांपासून सुरू होईल. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे ग्रहणाचा सुतक काळ भारतातल्या नागरिकांनी पाळायची गरज नाही.

वृषभ : या राशीच्या व्यक्तींना व्यापारात तोटा सहन करावा लागू शकतो. दुकानात विक्रीसाठी ठेवलेला माल खराब होऊ शकतो. त्यामुळे जास्त माल खरेदी करणं टाळावं. ग्रहणादरम्यान गुंतवणूक करू नये. आरोग्याची काळजी घ्यावी. आरोग्यविषयक समस्या निर्माण होतील, असे पदार्थ वर्ज्य करावेत.

मिथुन : ग्रहणादरम्यान एखाद्या महत्वाच्या कामात अडथळे येऊ शकतात. वैवाहिक संबंध बिघडू शकतात. कुटुंबात वादविवाद वाढतील. अनावश्यक खर्च वाढल्याने कुटुंबाचं आर्थिक नियोजन बिघडू शकतं. व्यापारविषयक एखादा सौदा अचानक रद्द होऊ शकतो.

कन्या : सूर्यग्रहणादरम्यान या राशीच्या व्यक्तींची कामं किंवा व्यापार मंदावू शकतो. या कालावधीत कोणतंही शुभ कार्य टाळावं. अन्यथा नुकसान होऊ शकतं. अर्थविषयक निर्णय टाळावेत, नाही तर भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. कोणाला उधार दिलेले पैसे बुडतील.

तूळ : हे सूर्यग्रहण या राशीच्या व्यक्तींसाठी अशुभ ठरेल. एखादी दुर्घटना घडण्याचे योग आहेत. त्यामुळे वाहन चालवताना सतर्क राहा. या व्यक्ती शनीच्या अडीचकीत आहेत. त्यामुळे मनात कोणत्या ना कोणत्या गोष्टींचं भय राहील. मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)

First published:

Tags: Viral news