मराठी बातम्या /बातम्या /religion /

बायकोचं दुसऱ्या पुरुषासोबत लफडं; दिवाळीदिवशीच करा हे उपाय, कायमचा खेळ खल्लास

बायकोचं दुसऱ्या पुरुषासोबत लफडं; दिवाळीदिवशीच करा हे उपाय, कायमचा खेळ खल्लास

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

तुमच्या पत्नीचे परपुरुषासोबत संबंध असतील तर तिला त्याच्यापासून दूर करण्याचे हे उपाय दिवाळीत नक्की करून पाहा.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 21 ऑक्टोबर : अलीकडच्या काळात कौटुंबिक कलहाचं प्रमाण वाढलं आहे. पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होणं, त्यांच्यात मतभेद असणं, आर्थिक समस्या आदी प्रमुख कारणं यामागे दिसून येतात. याशिवाय पती किंवा पत्नीचं प्रेमप्रकरण किंवा अनैतिक संबंधांमुळेदेखील कुटुंबात कलह निर्माण होऊन नातं संपुष्टात येताना दिसतं. या समस्या दूर करण्यासाठी अनेक जण नानाविध उपाय करतात. धर्मशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात या समस्येवर उपाय सांगितले गेले आहेत. हे उपाय करून नातं टिकवणं आणि नात्यातल्या समस्या दूर करणं शक्य आहे.

बऱ्याचदा आपल्या जोडीदाराच्या अफेअर्समुळे अनेक व्यक्ती चिंताग्रस्त असतात. यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होतो. तसंच या प्रकारामुळे कौटुंबिक कलहदेखील वाढतात. ज्योतिष शास्त्रानुसार, दिवाळीत काही उपाय केल्यास नात्याशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात. पत्नीचे परपुरुषाशी संबंध असतील तर हे उपाय केल्यास ही समस्या दूर होऊ शकते.

हे वाचा - समोरच्या व्यक्तीचे नाक पाहुन त्याचा स्वभाव येतो ओळखता; कळतात गुण-दोष

दिवाळी हा प्रामुख्याने दिव्यांचा सण असतो. वैवाहिक जीवनात शांतता नांदावी आणि पती-पत्नीच्या नात्यात गोडवा निर्माण व्हावा, यासाठी दिवाळीत रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वी घराच्या दारासमोर किंवा अंगणात दिवा लावावा. दिवा लावल्यानंतर मागे वळून पाहू नये. या उपायामुळे पती-पत्नीतले नातेसंबंध सुधारतात.

पत्नीचे परपुरुषाशी प्रेमसंबंध किंवा अनैतिक संबंध असतील तर दिवाळीच्या दिवशी लाल रंगाचं कापड घेऊन त्यात गोमती चक्र बांधून ठेवावं. गोमती चक्र हा असा स्टोन आहे, जो घरात ठेवल्याने घरातली नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसंच घरात सुख, शांती, समृद्धी नांदते.

दिवाळीच्या पूजेवेळी दिवा लावताना त्यात एक लवंग टाकावी. तसंच दिवाळीच्या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन पत्नीला पूजा करण्यास आणि लवंग असलेला तेलाचा दिवा लावण्यास सांगावं. यामुळे पत्नीच्या मनातले संशय, शंका दूर होतात आणि कुटुंबात शांततेचं वातावरण कायम राहतं.

हे वाचा - शास्त्रानुसार 'या' तिथींना शारीरिक संबंध ठेवणं अशुभ; नात्यावर होतो वाईट परिणाम

पत्नीचे परपुरुषाशी प्रेमसंबंध किंवा अनैतिक संबंध असतील आणि त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण झाला असेल, तर दिवाळीच्या दिवशी अशोकाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा. या झाडाची पूजा करावी. दिवाळीच्या दिवशी अशोकाच्या झाडाचं मूळ आणून घरात लावावं. यामुळे पती किंवा पत्नीच्या मनातल्या नकारात्मक गोष्टी दूर होतील. या उपायाचा सकारात्मक परिणाम तुम्हाला लगेच दिसून येईल.

(सूचना - हा लेख सर्वसामान्य ज्योतिषशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Astrology and horoscope, Diwali, Lifestyle, Relationship, Vastu