मराठी बातम्या /बातम्या /religion /कुंडलीतील कमजोर ग्रहांमुळे हे आजार लागतील मागे; पहा ग्रहानुसार होणारे आजार

कुंडलीतील कमजोर ग्रहांमुळे हे आजार लागतील मागे; पहा ग्रहानुसार होणारे आजार

तूळ - 
शुक्राचे पंचम स्थानातील भ्रमण घरासाठी उंची वस्तूंची खरेदी तसेच संततीसाठी शुभयोग दाखवीत आहे. चतुर्थात सोबत असलेले रवि बुध वास्तू योग शक्यता निर्माण करतील. हालचाली कराव्या लागतील. मातृ-पितृ भेट होईल. गुरू नोकरी आणि व्यवसायासाठी शुभदायक असून मातुल घराण्या कडून शुभ वर्तमान देईल. जोडीदार निवडताना काळजी घ्या. नीट चौकशी करा. तसेच वैवाहिक जीवनात गैर समज होऊ देऊ नका. दशमातील चंद्र भ्रमण सुखद अनुभव देईल. सप्ताह उत्तम.

तूळ - शुक्राचे पंचम स्थानातील भ्रमण घरासाठी उंची वस्तूंची खरेदी तसेच संततीसाठी शुभयोग दाखवीत आहे. चतुर्थात सोबत असलेले रवि बुध वास्तू योग शक्यता निर्माण करतील. हालचाली कराव्या लागतील. मातृ-पितृ भेट होईल. गुरू नोकरी आणि व्यवसायासाठी शुभदायक असून मातुल घराण्या कडून शुभ वर्तमान देईल. जोडीदार निवडताना काळजी घ्या. नीट चौकशी करा. तसेच वैवाहिक जीवनात गैर समज होऊ देऊ नका. दशमातील चंद्र भ्रमण सुखद अनुभव देईल. सप्ताह उत्तम.

कोणता ग्रह कोणत्या रोगाचे कारण आहे, याविषयी भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 08 फेब्रुवारी : प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर आपली राशी बदलत असतो. प्रत्येक ग्रह जन्मकुंडलीत असलेल्या ग्रहांच्या स्थितीनुसार आपल्या राशीला शुभ किंवा अशुभ फळ देतो. ज्योतिष शास्त्रात ग्रहांचा संबंध रोगांशी देखील सांगितला आहे. असे मानले जाते की, प्रत्येक ग्रह एक किंवा दुसऱ्या रोगाचे कारण आहे. व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहांच्या शुभ स्थितीमुळे आर्थिक लाभासोबत आरोग्यही प्राप्त होते. याउलट जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहांची स्थिती अशुभ असेल तर त्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक आजारांचा त्रास होतो. कोणता ग्रह कोणत्या रोगाचे कारण आहे, याविषयी भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.

सूर्यामुळे होणारे रोग -

ज्योतिषशास्त्रात सूर्य हा सर्वोच्च ग्रह आणि ग्रहांचा राजा मानला जातो. याशिवाय ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्म्याचा कारक ग्रह मानले जाते. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य ग्रह कमजोर असेल तर त्या व्यक्तीला पोटाचे आजार, डोळ्यांचे आजार, हृदयाचे आजार आणि रक्ताशी संबंधित आजार होऊ शकतात.

चंद्रामुळे होणारे रोग

ज्योतिषशास्त्रात चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्र कमजोर स्थितीत असेल तर अशा व्यक्तीला मानसिक तणाव, किडनी, मधुमेह, लघवीचे विकार, दात, कावीळ, नैराश्य आणि हृदयाशी संबंधित समस्या होऊ शकतात.

मंगळामुळे होणारे रोग

ज्योतिषशास्त्रात मंगळ हा रक्ताशी संबंधित ग्रह मानला जातो. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ अशुभ असेल तर त्या व्यक्तीला रक्ताशी संबंधित आजारांचा धोका राहतो. याशिवाय विषजनित आजार, रक्तदाब, घशाशी संबंधित आजार, गाठी, कर्करोग, मूळव्याध, अल्सर असे आजार होण्याची शक्यता असते.

बुधामुळे होणारे रोग

ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला वाणीचा कारक ग्रह मानले गेले आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर स्थितीत असेल तर त्या व्यक्तीला छातीशी संबंधित आजार, खाज सुटणे, टायफॉइड, न्यूमोनिया, कावीळ, त्वचाविकार इ. होण्याची शक्यता वाढते.

गुरूमुळे होणारे रोग

राशीच्या कुंडलीत गुरू कमजोर असल्यामुळे व्यक्तीला लठ्ठपणा आणि पोटाशी संबंधित आजार होऊ लागतात. याशिवाय यकृत, किडनी आदींशी संबंधित आजार, मधुमेह, कावीळ, स्मरणशक्ती कमी होणे असे आजार होण्याची शक्यताही वाढते.

शुक्रामुळे होणारे रोग

ज्योतिष शास्त्रामध्ये शुक्र ग्रहाला संपत्ती आणि ऐषोरामाचा कारक मानले जाते. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र ग्रह अशुभ स्थितीत असेल तर त्या व्यक्तीला लैंगिक आजारांना सामोरे जावे लागते. याशिवाय कावीळ आणि त्वचेशी संबंधित आजारही होऊ शकतात.

शनिमुळे होणारे रोग

एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनि ग्रह कमजोर स्थितीत असेल तर शारीरिक थकवा, दुखापत इत्यादीची भीती नेहमीच असते. याशिवाय त्या व्यक्तीला केस, शारीरिक कमजोरी, शरीर दुखणे, पोटदुखी, गुडघेदुखी, पाय दुखणे, दात आणि त्वचेशी संबंधित आजार असू शकतात.

राहूमुळे होणारे आजार

जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहु अशुभ किंवा कमजोर असेल तर त्या व्यक्तीला मानसिक वेदना, मूळव्याध, मानसिक विकार यांसारखे आजार होऊ शकतात.

केतूमुळे होणारे रोग

जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत केतू ग्रह अशक्त किंवा अशुभ स्थितीत असेल तर त्या व्यक्तीला हाडांशी संबंधित आजार, पाय दुखण्याच्या तक्रारी, मज्जातंतू कमकुवत होणे, अपघाती आजार, सांधे, साखर, स्वप्नाच्या समस्या, हर्नियासारखे आजार होऊ शकतात.

हे वाचा - या 2 दिवशी घरात अगरबत्ती न लावलेलीच बरी! भोगावे लागतील हे अशुभ परिणाम

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Rashichark