मराठी बातम्या /बातम्या /religion /

अद्भुत! अभिषेकावेळी देवी बंद करते आपले डोळे; विश्वास बसत नाही तर पाहा हा VIDEO

अद्भुत! अभिषेकावेळी देवी बंद करते आपले डोळे; विश्वास बसत नाही तर पाहा हा VIDEO

अभिषेकावेळी डोळे बंद करणाऱ्या देवीचा व्हिडीओ व्हायरल.

अभिषेकावेळी डोळे बंद करणाऱ्या देवीचा व्हिडीओ व्हायरल.

भद्रकाली देवीच्या मंदिरातील हा चमत्कारिक व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Telangana, India
  • Published by:  Priya Lad

हैदराबाद, 23 ऑगस्ट :  भारतात बरीच मंदिरं आहेत. त्यापैकी काही मंदिरांमध्ये काही ना काही चमत्कार पाहायला मिळतात. अशाच एका मंदिराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. भद्रकाली देवीच्या मंदिरातील हा व्हिडीओ आहे. जिथं अभिषेकावेळी देवी स्वतःच आपले डोळे बंद करून घेते असा दावा केला जातो आहे. व्हिडीओ पाहून तुमचाही तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

तेलंगणातील भद्रकाली देवीचं हे मंदिर. जिथं देवीवर हळदीचा अभिषेक केला जातो आहे.  व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला देवीच्या डोक्यावरून हळद सोडली जाते. जशी हळद देवीवर पडते आणि ती तिच्या चेहऱ्यापर्यंत पोहोचते तसे देवीचे डोळे बंद होताना दिसतात. व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत.

हे वाचा - हे शिव मंदिर वैज्ञानिकांसाठीही कोडं, कधीच विझत नाही अग्निकुंडातील अखंड ज्वाळा!

बहुतेकांनी याबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांचा स्वतःच्या डोळ्यांवरही विश्वास बसत नाही आहे. हे कसं शक्य आहे, असाच प्रश्न बहुतेक जण विचारत आहे.

तर काही लोकांनी याबाबत आपली मतं व्यक्त केली आहे. ही मूर्तीच अशी बनवण्यात आली आहे की त्यावर हळद पडताच तिचे डोळे बंद झाल्यासारखे वाटतात असं काहींनी म्हटलं आहे. तर काहींनी यासाठी एखादी टेक्निक वापरली असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी देवीचे डोळे बंद होत नाही आहेत तर हळद जेव्हा देवीच्या डोळ्यांवर जाते तेव्हा तिचे डोळे हळदीमुळे झाकले जातात आणि देवीने डोळे बंद केल्यासारखं वाटतं, असं म्हटलं आहे.

हे वाचा - Famous Temples: तुटलेलं हाड जोडतो इथला हनुमान; प्रसिद्ध मंदिराविषयी माहीत आहे का?

तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

First published:

Tags: Religion, Viral, Viral videos