Dakshinavarti Shankh : दक्षिणमुखी शंख घरात ठेवण्याचे आहेत अनेक फायदे; मिळतो पैसा, सुख-शांती

Dakshinavarti Shankh : दक्षिणमुखी शंख घरात ठेवण्याचे आहेत अनेक फायदे; मिळतो पैसा, सुख-शांती

Dakshinavarti Shankh : देवी लक्ष्मी, माता दुर्गा आणि भगवान विष्णू यांच्या हातात दक्षिणमुखी शंख आहे. ज्याचे तोंड दक्षिणेकडे उघडते त्याला दक्षिणावर्ती शंख म्हणतात. असा शंख घरात, देव्हाऱ्यात ठेवण्याचे फायदे जाणून घेऊया.

  • Share this:

मुंबई, 13 ऑगस्ट : हिंदू धर्मात शंखाला विशेष महत्त्व आहे. देवतांच्या पूजेत शंखाला विशेष स्थान आहे. शास्त्रामध्ये दक्षिणाभिमुख शंख हे भगवान नारायणाचे रूप मानले गेले आहे. हा देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आवडता शंख आहे. देवी लक्ष्मी, माता दुर्गा आणि भगवान विष्णू यांच्या हातात दक्षिणमुखी शंख आहे. ज्याचे तोंड दक्षिणेकडे उघडते त्याला दक्षिणावर्ती शंख म्हणतात. म्हणून देवी लक्ष्मी, भगवान विष्णू आणि माता दुर्गा दक्षिण दिशेला वास करतात, असे मानले जाते. पंडित इंद्रमणी घनश्याल यांनी दिलेल्या माहितीनुसार घरामध्ये दक्षिणाभिमुख शंख ठेवणे शुभ मानले जाते. त्यामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण (Dakshinavarti Shankh) होते.

शंखाचा प्रकार -

भारतात दक्षिणाभिमुख शंखांचे दोन प्रकार आढळतात. पहिला नर दक्षिणमुखी शंख आणि दुसरा मादा दक्षिणमुखी शंख. ज्या शंखाचा थर जाड आणि जड असतो, त्याला नर दक्षिणावर्त शंख म्हणतात. त्याच वेळी, शंख जो पातळ आणि स्पर्शाने हलका असतो त्याला मादा दक्षिणावर्त शंख म्हणतात. दक्षिणावर्ती शंख घरात ठेवणे शुभ मानले जाते. त्याची नियमित पूजा केल्याने भगवान विष्णू, देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो.

हे वाचा - तुम्हालाही आहे हाय कोलेस्ट्रॉलची चिंता? 'या' 5 तेलांचा स्वयंपाकात करा समावेश

दक्षिणावर्ती शंखचे फायदे -

हिंदू धर्मग्रंथानुसार ज्या घरामध्ये दक्षिण दिशेला शंख स्थापित केला जातो, त्या घरात देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहते. घरामध्ये सदैव धन-समृद्धीचा वास असतो. वास्तुशास्त्रानुसार जर आपण दक्षिणामुखी शंखाची पूर्ण विधीपूर्वक पूजा करून लाल कपड्यात गुंडाळून घरात ठेवल्यास घरात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही. तसेच घरातील सर्व वास्तुदोष दूर होतील. दक्षिणावर्ती शंख घराच्या देव्हाऱ्यात दक्षिण दिशेला ठेवल्यास नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाहीत. घरात सुख-समृद्धी राहते.

हे वाचा - बेसन वापरून असं करा फेशिअल; घरच्या घरी निखळ-सुंदर होईल चेहऱ्याची त्वचा

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

Published by: News18 Desk
First published: August 13, 2022, 8:03 AM IST

ताज्या बातम्या