मराठी बातम्या /बातम्या /religion /या राशीच्या जातकांनी आज काळजीपूर्वक संवाद साधला पाहिजे !

या राशीच्या जातकांनी आज काळजीपूर्वक संवाद साधला पाहिजे !

प्रत्येक राशीचं 8 जानेवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

प्रत्येक राशीचं 8 जानेवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

प्रत्येक राशीचं 8 जानेवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 8 जानेवारी:  सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 8 जानेवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

  मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

  तुमच्या सभोवतालची ऊर्जा तुम्हाला थोडी गोंधळात टाकणारी वाटू शकते. त्यामुळे तुम्हाला जे काही साध्य करायचं आहे त्याला अनुकूल कृती होण्याबाबत शंका आहे. एखाद्याचं लक्ष वेधण्यासाठी तुम्हाला नवीन मार्ग शोधावे लागतील. सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तींनी चुकीचा अर्थ लागू नये म्हणून काळजीपूर्वक संवाद साधला पाहिजे. नवीन कौशल्ये शिकण्याची तीव्र इच्छा निर्माण होऊ शकते. तुम्ही याचं बारकाईनं पालन केल्यास व्यवसायाच्या नवीन कल्पना सुचू शकतात.

  LUCKY SIGN - A Blurred Photo

  वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

  तुमच्यापैकी ज्यांच्यावर इतरांचं वर्चस्व आहे ते आता स्वतंत्र होण्यासाठी नवीन धोरणाचा विचार करू शकतात. व्यक्त होण्याची सवय कधीकधी भावनांवर वरचढ ठरू शकते. पण, समोरच्या व्यक्तीला तुमच्या मनातील विचार कळवणंदेखील महत्त्वाचं आहे. तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल, तर चांगली संधी मिळू शकेल. नातेसंबंधांमध्ये अनावश्यक आक्रमकता येऊ शकते. तुम्हाला त्यात अडकावसं वाटेल.

  LUCKY SIGN - A cardboard

  मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

  तुम्ही संधी किंवा तुमच्या आवडीचा पाठपुरावा करण्याचा विचार करत असाल तर आता त्या दृष्टीनं खरोखर प्रयत्न करणं आवश्यक आहे. येत्या काही दिवसांत आपलं काम पूर्ण करण्यासाठी अधिक विश्वासार्ह आणि टाइम-टेस्टेड टेक्निकचा पर्याय मिळू शकतो. तुमचा आत्मविश्वास आणि मैत्रीची भावना वाढू शकते. गेल्या काही दिवसांपासून जाणवणारी खाजेची समस्या किंवा चिडचिड आता जाणवणार नाही. तुमच्या मित्राकडून विचार करण्यायोग्य एखादी सूचना मिळू शकते.

  LUCKY SIGN - A Solo Performance

  कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

  नवीन विचारांचा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. पण, ते सर्व दिशाहीन असू शकतात. इंडस्‍ट्रीतील एखाद्या वरिष्ठ व्यक्तीशी तुमची भेट होण्याची शक्यता आहे. त्या व्यक्तीचा सल्‍ला तुम्हाला उपयोगी पडेल. रोमँटिक रिलेशनशीपमध्ये असाल तर तुम्हाला त्यातून खरोखर काय अपेक्षित आहे हे व्यक्त करावं लागेल. तुमच्या जोडीदाराला तुमच्याबाबत काही पूर्वग्रह आहेत ज्यांचं निराकरण करणं गरजेचं आहे. तुमच्यापैकी काहींची भावनिक कोंडी होत असेल तर वाद होऊ शकतो.

  LUCKY SIGN - Antique Article

  सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

  ऑफिसमध्ये इतरांना तुमच्या फर्स्ट इंप्रेशनचा अंदाज लावणं शक्य होईल. तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या काही लोकांना त्रासदायक वाटाल. तुमचा हेतू सकारात्मक असला तरी संवादाच्या पद्धतीत बदल करणं गरजेचं आहे. अधिकारपदावर असल्‍यास, तुम्‍हाला लवकरच लाभ मिळू शकतो. गेल्या काही महिन्यांपासून संकटात असलेल्या व्यवसायात सुधारणा दिसू शकते. रिअल इस्टेटशी संबंधित व्यवहार करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो.

  LUCKY SIGN - A Roller Coaster

  कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

  भूतकाळातील काही ठाम समजुतींमुळे तुमचा नवीन दृष्टिकोन प्रतिबंधित होऊ शकतो. भविष्यातील रणनीतीची पुन्हा आखणी करण्यासाठी तुम्ही बाह्यस्रोतांचा वापर करू शकता. तत्काळ निराकरण झालं पाहिजे अशा गोष्टींबाबत स्पष्टता जाणवत नसेल तर इतरांचा सल्ला घेणं योग्य ठरेल. चांगल्या आर्थिक प्रगतीमुळे तुम्ही पूर्वीच्या स्थितीत येऊ शकाल. सहलीची योजना आखत असल्यास ती आत्ताच आखली पाहिजे. तुम्हाला तुमचा मानसिक बॅलन्स काहीसा डळमळीत झाल्याचं वाटेल.

  LUCKY SIGN - An Old Rug

  तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

  तुमच्या कौशल्याला आता सर्वत्र मान्यता मिळू शकते आणि त्याची प्रशंसा केली जाऊ शकते. लवकरच तुमची कंटाळवाणी दिनचर्या नाहीशी होऊन काही आठवड्यांत तुम्ही कामामध्ये व्यस्त होऊ शकता. तुम्‍ही तुमच्‍या आवडीशी मिळतीजुळती नवीन संधी शोधत असाल तर जवळची व्यक्ती एखादी कल्पना सुचवू शकते. व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. हा बदल चांगल्यासाठी आणि स्वत:च्या जाणीवेमुळे झालेला असेल.

  LUCKY SIGN - A Red Flower

  वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

  भूतकाळात केलेल्या काही निवडींचे देखील सकारात्मक परिणाम मिळाले आहेत, हे तुम्ही कधीनाकधी मान्य कराल. एखाद्या विशिष्ट दिशेनं मार्गाक्रमण करणंदेखील काही वेळा नशिबाचा भाग असतो. तुम्‍हाला तुमच्‍या निवडीबद्दल विश्‍वास वाटेल आणि त्यासाठी इतरांची सहमती मिळू शकते. ऑफिसमध्ये काही कालावधीसाठी गोंधळ निर्माण होऊ शकतो. तुमच्यातील वाईट उर्जा तुम्हाला अनेकदा विचलित करण्याची शक्यता आहे. पण, तुम्ही त्याच्याकडे जास्त लक्ष देणं टाळलं पाहिजे. सरळमार्गी आयुष्य जगण्याची ही वेळ आहे.

  LUCKY SIGN - Your Favorite Dessert

  धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

  तुमच्या नात्यासाठी तुम्ही भूतकाळात उचललेली छोटी पावलं संकटाच्या काळात तारणहार सिद्ध होतील. काम पूर्ण होण्याची शक्यता आहे पण काहीसं गोंधळात टाकणारं वाटेल. एकाहून अधिक डेटलाइन्ससाठी काम केल्यानं तुमची दमछाक होऊ शकते. जर तुम्ही एखाद्या कायदेशीर प्रकरणात गुंतलेले असाल तर तुमच्याकडील पुरावे सुरक्षित राहतील याची खात्री करा. तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमची गोपनीय माहिती इतरांना देऊ शकतात.

  LUCKY SIGN - A Sage Plant

  मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

  तुम्‍ही आखत असलेल्या योजनेत उसळी मारण्‍यासाठी ही वेळ चांगली असू शकते. बिझनेस आयडियामध्ये सुरुवातीला चांगले परिणाम मिळू शकतील. पार्टनरशीपमुळे तुमच्या अनेक अडचणी दूर होतील. कठोर परिश्रमाच्या काळात पार्टनरशीप मोठा आधार वाटू शकते. औपचारिकपणे मिळालेला लग्नाचा प्रस्ताव चांगला ठरू शकतो. तुमच्या मनातील विचार स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत अचानक केलेला प्लॅन फायद्याचा ठरू शकतो.

  LUCKY SIGN - Blueberries

  कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

  उच्च शिक्षणाचं नियोजन करताना तुम्हाला कदाचित काही अडचणींचा सामना करावा लागला असेल. पण, आता प्रगतीसाठी वेळ अनुकूल आहे. तुम्हाला अनुदान किंवा मदत मिळण्याची शक्यता आहे. घरापासून लांब राहत असल्यास तुम्हाला होमसिक वाटू शकतं. पण, ही भावना तात्पुरती असेल. व्यायामात नियमितपणा येईल. एखाद्या प्रिय व्यक्तीच्या विचित्र वर्तनामुळे तुमची चिडचिड होऊन उदास वाटू शकतं.

  LUCKY SIGN - A Yellow Clay Pot

  मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

  एखाद्या कौटुंबिक मित्राकडून कामाच्या मार्गाबाबत सूचना मिळू शकते. सध्या अनेक गोष्टींमुळे तुम्ही विचलित होऊ शकता. पण, नेमून दिलेल्या कामावर लक्ष केंद्रित केल्यानं तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळू शकतो. परिसरातील काही नवीन लोक तुमच्याबद्दल मत बनवू शकतात, ज्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो. एक छोटीशी सहल तुम्हाला दिलासा देणारी ठरेल. एखाद्या आध्यात्मिक चर्चेतून तुम्हाला नवीन दृष्टीकोन मिळण्यास मदत होऊ शकते.

  LUCKY SIGN - A Silk Cloth

  First published:

  Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion