मराठी बातम्या /बातम्या /religion /कसा असेल 6 मार्चचा दिवस? एखादी चांगली ऑफर तुमचा दिवस चांगला बनवेल

कसा असेल 6 मार्चचा दिवस? एखादी चांगली ऑफर तुमचा दिवस चांगला बनवेल

6 मार्च 2023 या दिवसासाठीचं भविष्य

6 मार्च 2023 या दिवसासाठीचं भविष्य

प्रत्येक राशीचं 6 मार्च 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 6 मार्च: सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 6 मार्च 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

    मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

    आपण काहीतरी नवीन सुरू करण्याचा प्रयत्न करत असल्यास त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. ही बाब एखादा नवीन उपक्रम, प्रकल्प किंवा असाइनमेंट असू शकते. पण, त्यासाठी तुम्ही चांगली पूर्वतयारी केल्याची खात्री करा. तुम्ही स्वत:चं मूल्यमापन करता त्यापेक्षा तुमची क्षमता खूप जास्त आहे. घरात पवित्र जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करा.

    LUCKY SIGN – A Mirror Image

    वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

    आज मूलभूत गोष्टींना चिकटून राहणं खूप उपयुक्त ठरेल. तुम्ही ज्या मूलतत्वांचं पालन करत आहात त्यावर तुम्ही ठाम राहून प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही प्रगती करू शकाल आणि विचारांची स्पष्टता मिळवू शकाल. काही काळ निर्णय पुढे ढकलले जाऊ शकतात. एखादी चांगली ऑफर तुमचा दिवस चांगला बनवेल.

    LUCKY SIGN – A Silver candle

    मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

    जर तुम्ही एखाद्यासोबत भागीदारी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी योग्य वेळ आहे. पण, तुम्हाला बारीकसारीक गोष्टींचं पुनरावलोकन करावं लागेल. सर्व बाबी आणि प्रत्येक योजना मोठ्या फोरमवरील प्रत्येक व्यक्तीशी शेअर करू नये. तुम्ही विनाकारण जास्त ताण घेऊ नये.

    LUCKY SIGN – A Gemstone

    घर बांधताना लक्षात ठेवा वास्तुचे हे नियम, स्वर्गासारखे सुंदर होईल तुमचे जीवन

    कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

    तुमच्या मनातील भावनांचा ठाव घेणाऱ्या व्यक्तीला तुमच्या मनात दडलेल्या भावना दिसू शकतात. तुम्ही इतर कोणावर तरी भावनिकदृष्ट्या खूप अवलंबून आहात. हे तुमच्यासाठी योग्य नाही. तुम्ही स्वतंत्रपणे वाटचाल केली पाहिजे.

    LUCKY SIGN – A yellow stone

    सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

    ज्या व्यक्तीला तुम्ही बऱ्याच काळापासून भेटलेले नाहीत अशा व्यक्तीकडून तुमचं मनापासून स्वागत होण्याची शक्यता आहे. तुम्हाला लक्झरी वस्तूंमध्ये गुंतल्यासारखे वाटेल. कारण, एनर्जी तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जात आहे. तुमच्यापैकी काही जण परदेशात सुट्टी घालवण्याचे नियोजन करतील.

    LUCKY SIGN – A Candle

    कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

    जर तुम्ही तुमच्यापासून दूर जात असलेल्या एखाद्या व्यक्तीशी नात्यात असाल तर कदाचित तुम्ही लवकर भावनांपासून मुक्त होऊ शकणार नाही. तुमची एकमेकांबद्दलची आवड अगदी अनोखी आहे. आपण रोख व्यवहार करत असल्यास सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. कारण, त्याचं बारकाईने निरीक्षण केलं जाऊ शकतं.

    LUCKY SIGN from above – A buddha statue

    तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

    तुमच्यातील नेतृत्व गुणाचा विकास होत आहे आणि त्याबद्दल तुमचा सत्कारही होऊ शकतो. तपशील आणि परिपूर्णता शोधण्याचं कौशल्य तुमच्याकडं असल्यानं, तुम्ही त्याचा वापर करण्याची शक्यता आहे. कोणीतरी दुरूनच तुमची प्रशंसा करत आहे.

    LUCKY SIGN – An indoor plant

    वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

    तुमच्या कार्य पद्धतीवर या पूर्वी काही लोकांनी आक्षेप घेतला होता. त्यात स्वत:साठी बदल केला पाहिजे. तुम्ही जे दाखवायचा प्रयत्न करता आहात आणि लोकांना जे समजतंय यामध्ये काही परस्परसंबंध आहे. आर्थिक लाभ होत राहतील.

    LUCKY SIGN – A Chamber

    धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

    मर्यादित वेळेत तुम्ही तुमच्या मानसिक क्षमतेनं आणि चपळाईनं जो प्रभाव निर्माण केला आहे, तो वाखाणण्याजोगा आहे. जर तुम्ही नवीन बिझनेस आयडियाचा विचार करत असाल, तर लवकरच त्याबाबत गोष्टी तुमच्या बाजूने घडतील. त्यात भागीदारी करण्यासदेखील हरकत नाही.

    LUCKY SIGN – A Climber

    मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

    लपवून ठेवलेली माहिती आणि कोणतंही आव्हान हाताळण्याचा तुमचा उत्साह, असं काहीस संमिश्र वातावरण आज असेल. तुमचा खूप विश्वास असलेली जवळची व्यक्ती शेअर्ड सोर्स असेल. तुम्ही प्रयत्न करून त्यांच्यावरील तुमचं अवलंबित्व कमी करू शकता. तुम्ही लवकरच एखाद्या रोड ट्रिपला जाण्याची शक्यता आहे.

    LUCKY SIGN – A Butterfly

    कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

    आज, तुम्ही तुमची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी सविस्तर योजना आखण्याचा विचार कराल पण तरीदेखील ते पुढे ढकललं जाऊ शकतं. फक्त प्रयत्न करा आणि निवांत राहा. योग्य वेळेची वाट बघा. कुटुंबाकडून किंवा जोडीदाराकडून मिळणारा कोणताही सल्ला सध्या तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार नाही.

    LUCKY SIGN – Canvas

    Shanisathi upay :काळ्या मिरीच्या या उपायाने शनिदेवाच्या त्रासापासून मिळेल मुक्ती, नशीब होईल बलवान

    मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

    तुमच्या भूतकाळातील कृतींबद्दल तुम्हाला सध्या खूप अपराधी वाटू शकतं. त्यावेळी जी व्यक्ती तुमच्यासोबत सहभागी होती ती देखील तुम्हाला त्याची आठवण करून देत आहे. या सर्व गोष्टी सुरळीत करण्यासाठी लवकरच तुम्ही संधी मिळेल.

    LUCKY SIGN – Two feathers

    First published:
    top videos

      Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion