मराठी बातम्या /बातम्या /religion /विवाहासाठी जोडीदाराचा शोध घेणाऱ्यांना योग्य प्रस्ताव येण्याची शक्यता आहे

विवाहासाठी जोडीदाराचा शोध घेणाऱ्यांना योग्य प्रस्ताव येण्याची शक्यता आहे

प्रत्येक राशीचं 31 मार्च 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

प्रत्येक राशीचं 31 मार्च 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

प्रत्येक राशीचं 31 मार्च 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 31 मार्च: सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 31 मार्च 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

आरोग्याबाबतचा नवा अनुभव आकर्षक वाटू शकेल. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही करत असलेल्या नियोजनाची फळं आता दिसू लागतील. विवाहासाठी जोडीदाराचा शोध घेणाऱ्यांना योग्य प्रस्ताव येण्याची शक्यता आहे

LUCKY SIGN - Turquoise apparel

वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

तुमच्यासमोर काही गोष्टी स्पष्ट झाल्याने आता तुम्ही तुमच्या समजांमधून/गृहीतकांमधून बाहेर पडायला तयार आहात. यापुढचं आव्हान कठीण दिसत आहे; पण ते अशक्य नाही. तुमच्याकडून एखाद्याने पैसे उधार घेतले असतील तर त्यातले काही पैसे ते परत देण्याची शक्यता आहे.

LUCKY SIGN - Iced beverage

मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

तुमच्या प्रत्यक्षात असलेल्या प्लॅनमुळे तुम्हाला अपेक्षित असलेल्या परिणामांपेक्षा वेगळे परिणाम बघायला मिळू शकतात. तुम्ही एखाद्याला तुमच्या बोलण्याने दुखावलं असेल, तर त्यांची माफी मागणं योग्य ठरेल. आध्यात्मिक प्रवासाचं नियोजन करण्यासाठीचा काळ.

LUCKY SIGN - A ruby stone

कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

तुम्ही ही चिकाटी अत्यंत कठीण प्रयत्नांनी आत्मसात केली आहे. सध्या तुम्हाला आलेली निराशा कदाचित कमी होऊ शकते. कामाची नवी संधी लवकरच तुमचा दरवाजा ठोठावणार आहे.

LUCKY SIGN - Marigold

सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

जास्त प्रॅक्टिकल म्हणजे व्यावहारिक विचार करणं तुमच्या व्यक्तिमत्त्वातली वाईट बाजूही बाहेर आणतं. एखादं कायदेशीर प्रकरण सुरू असेल तर त्यात तुमच्यासाठी सकारात्मक घडामोड घडू शकते; मात्र एखादा करार किंवा कागदपत्रावर सही करताना भरपूर काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

LUCKY SIGN - A charm bracelet

कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

तुम्ही स्वत:ला जसे दाखवत आहात, तसं तुम्हाला कदाचित समजून घेतलं जाणार नाही. एखादा सकारात्मक प्रभाव तुमची मनःस्थिती आणि सवय बदलू शकते. कोणत्याही प्रकारची आरोग्याची समस्या निर्माण होऊ नये यासाठी तुम्हाला आधी तुमच्या स्वत:कडे लक्ष देणं आवश्यक आहे.

LUCKY SIGN - A water bottle

तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

तुमच्या जवळच्या व्यक्तीशी असलेल्या नात्यात तुम्हाला सुधारणा करावी लागेल. कदाचित काही तरी विसंवाद होऊ शकतो आणि त्यातून गैरसमज निर्माण होऊ शकतात, परिस्थिती थोडी अवघड होऊ शकते. विखारी व्यक्तींना टाळणं किंवा त्यांच्यापासून दूर राहणं हाच उत्तम उपाय आहे.

LUCKY SIGN - A green stone

वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

एखाद्या बाहेरच्या व्यक्तीने तुमच्या गोष्टींत केलेल्या ढवढवळीमुळे तुमचा वेळ वाया जाऊ शकतो. कदाचित भागीदारीची एखादी नवी कल्पना निर्माण होऊ शकते. तुमच्या कामाचा विस्तार आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या शहरांमध्ये करण्याचा विचार तुम्ही करू शकता.

LUCKY SIGN - A squirrel

धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

तुमच्याबद्दल एखाद्याच्या मनात दीर्घ काळापासून असलेली भावना आज कदाचित ते व्यक्त करू शकतील. कोणताही निर्णय घेण्याआधी त्यांच्या या भावनेचा आदर करा. कोणत्याही कारणावरून एखादी टॅक्सशी संबंधित समस्या उद्भवू शकते.

LUCKY SIGN - A yellow sapphire

मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

कोणाच्याही बोलण्याचा प्रभाव तुमच्यावर पडू देऊ नका आणि त्यातून कोणताही समज निर्माण करून घेऊ नका. तुमचा नवीन व्यवसाय असेल किंवा स्टार्ट अप असेल तर तुम्ही ज्याचा विचार केला नसेल अशा आव्हानांचा सामना कदाचित तुम्हाला करावा लागू शकतो. मेडिटेशन करा.

LUCKY SIGN - A mirage

कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

तुमचा वाईट काळ आता संपला आहे आणि तुम्ही आता एका नवीन आयुष्याच्या, नवीन धाडसाच्या दिशेने वाटचाल करत आहात. हे तुम्हाला खूप आनंद देणारं आहे. आर्थिक नियोजनाबाबत पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे. इतर सर्व गोष्टींचं नियोजन करता येऊ शकतं.

LUCKY SIGN - A slush

मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

दीर्घ काळ तुम्ही ज्यासाठी काम करत होतात, त्याबद्दल आता अखेर तुमची दखल घेतली जाणार आहे. कामाच्या ठिकाणी छोटासा वाद होऊ शकतो. घरातसुद्ध काही काळ प्रलंबित असलेला एखादा प्रश्न पुन्हा डोकं वर काढू शकतो.

LUCKY SIGN - A brass statue

First published:
top videos

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion