मराठी बातम्या /बातम्या /religion /मीन राशीच दिवसभरात एखादं रीफ्रेशिंग आउटिंग होऊ शकतं, कोणत्या राशी असतील आज खास ?

मीन राशीच दिवसभरात एखादं रीफ्रेशिंग आउटिंग होऊ शकतं, कोणत्या राशी असतील आज खास ?

 प्रत्येक राशीचं 30 जानेवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य

प्रत्येक राशीचं 30 जानेवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य

प्रत्येक राशीचं 30 जानेवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 30 जानेवारी: सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 30 जानेवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

  मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

  एक नवीन कनेक्शन तुमच्या समोर येण्याची शक्यता आहे आणि त्याचा तुमच्यावर खोल प्रभाव पडू शकतो. तुमच्या आईला तुमच्याशी काही महत्त्वाची चर्चा करायची असेल. तुम्ही ते टाळू नये. सध्या सुरू असलेला प्रोजेक्ट पूर्ण होईल.

  LUCKY SIGN – Colored Glass

  वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

  महत्त्वाचे निर्णय प्रलंबित असल्यास ते मार्गी लागू शकतील. मनातल्या भीतीचा सामना करण्यासाठी आणि ती दूर करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कमिटमेंट दिली असेल तर लवकरच ती पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करा.

  LUCKY SIGN – A Rose quartz

  मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

  तुम्हाला शांत वातावरणाची गरज आहे. तुमच्या सभोवतालचा गोंधळ तुम्हाला लक्ष केंद्रित करू देत नाही. मित्रांसोबतच्या भेटीचं नियोजन पुढे ढकललं जाऊ शकतं.

  LUCKY SIGN – An Email

  कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

  तुम्ही ज्या नवीन जागेत आहात तिथे तुम्हाला काही वेळानंतर आनंद मिळण्यास सुरुवात होईल. तुमच्या मनातल्या भावना व्यक्त करण्यात अडथळे येऊ शकतात. तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दृष्टिकोनाला धक्का लागू शकतो.

  LUCKY SIGN – A heritage site

  सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

  तुमचे विचार दडपल्यास नंतर बराच गोंधळ निर्माण होऊ शकतो. मनात स्पष्टता असणं चांगलं ठरेल. तुम्हाला लवकरच एखाद्या प्रोजेक्टचं नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. तुमच्या सभोवतालच्या स्पर्धात्मक घटकांसाठी सतत सावध राहा.

  LUCKY SIGN – A new restaurant

  कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

  एखाद्या संभाषणामुळे तुम्हाला गरज असलेला आत्मविश्वास मिळेल. तुमच्या योग्यतेच्या आधारे तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या एखाद्या गोष्टीत वाढ होईल. तुम्ही तुमच्या आतल्या वाईट विचारांच्या जितकं जास्त प्रभावाखाली जाल तितकेच तुम्ही चिंताग्रस्त व्हाल.

  LUCKY SIGN – A park

  तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

  तुम्हाला आज जाणीवपूर्वक आशावादी राहावं लागेल. रूटीनमुळे अनेकदा तुम्हाला दमायला होऊ शकेल. स्मार्ट वर्क कल्पना नवीन आंतरिक शक्ती म्हणून कार्य करू शकतात.

  LUCKY SIGN – A slogan

  वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

  कोणी तरी तुमच्या वाट्याचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करेल आणि त्याला त्याला यश मिळण्याची शक्यता आहे. तुमची ऊर्जा थोडी विखुरलेली दिसते आहे. जवळचा मित्र तुम्हाला समजून घेण्यास आणि मदत करण्यास सक्षम असेल.

  LUCKY SIGN – A glass jug

  स्वप्नात या रंगाचे फूल दिसणे आहेत शुभसंकेत ! घरात येईल पैसा, सुख समृद्धी

  धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

  अनेकांना तुमच्या पदावर येण्याची इच्छा असू शकते. तुम्ही तुमच्या सध्याच्या कामाचं आणि भविष्याचंही रक्षण केलं पाहिजे. हलकं अन्न खाल्ल्यानं पचनाच्या समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते.

  LUCKY SIGN – Marble Shelves

  मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

  एखादी गोष्ट शोधण्याचा प्रयत्न करत असाल तर इतरत्र शोध घेणं उपयुक्त ठरणार नाही. तुम्ही जे शोधत आहात ते कदाचित एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडे असेल. एका नवीन पॅशनमुळे कदाचित तुम्ही जास्त व्यग्र राहाल.

  LUCKY SIGN – A stone ring

  कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

  काही तरी अनुमान काढण्याचा आणि भविष्यासाठी स्वतःचं नियोजन तयार करण्याचा हा दिवस आहे. इन्स्टिंक्टिव्ह दृष्टिकोनाची गरज भासू शकते. तुम्हाला सल्ला देणारी एखादी ज्येष्ठ व्यक्ती उपयोगी ठरू शकते.

  LUCKY SIGN – Almonds

  मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

  तुमच्या आजूबाजूला असलेलं कोणी तरी तुमच्याबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करेल. पूर्वीची प्रिय व्यक्ती पुन्हा भेटण्याची शक्यता आहे. पुन्हा एकमेकांशी कनेक्ट होण्याचे योग आहेत. दिवसभरात एखादं रीफ्रेशिंग आउटिंग होऊ शकतं.

  LUCKY SIGN – An old pen

  First published:

  Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion