मराठी बातम्या /बातम्या /religion /आज या राशीला आर्थिक बाबतींत काही अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे!

आज या राशीला आर्थिक बाबतींत काही अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे!

प्रत्येक राशीचं 30 डिसेंबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

प्रत्येक राशीचं 30 डिसेंबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

प्रत्येक राशीचं 30 डिसेंबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 30 डिसेंबर: सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studiowww.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 30 डिसेंबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

  मेष (Aries) (21 मार्च ते 19 एप्रिल)

  तुम्ही पूर्वी केलेल्या कामांचे परिणाम आता पाहायला मिळतील. तुमची महत्त्वाची कामं प्राधान्यक्रमाने आज पूर्ण करा. एखाद्या प्रवासाची योजना आखली असेल तर ती पुढे ढकलली जाऊ शकते.

  LUCKY SIGN - A black crystal

  वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

  एखाद्या चैतन्यमयी व्यक्तीची नवी ऊर्जा, उत्साह तुमचाही मूड चांगला करील. आनंदी, उत्साही वातावरण निर्माण होईल. काही महिन्यांपूर्वी भेटलेली व्यक्ती पुन्हा भेटेल आणि तुमच्या उपयोगी पडेल. तुमच्या चांगल्या नेटवर्कचा वापर करून तुमच्या कामाची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न करा.

  LUCKY SIGN - A clay box

  मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

  एखाद्या नवशिक्या व्यक्तीचं नशीब कसं असतं, तसा अनुभव तुम्हाला येईल; मात्र यातून काही तरी चांगली सुरुवात होईल. लोकांकडून जास्त अपेक्षा ठेवल्यानं निराशा होऊ शकते. कर्ज घेतलं असेल किंवा एखाद्याकडून उसने पैसे घेतले असतील, तर त्या बाबतीत थोडासा त्रास सहन करावा लागू शकतो.

  LUCKY SIGN - A spring

  कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

  तुम्ही दुसऱ्याच्या कामात गोंधळ घातलात, तर त्याचे परिणाम तुम्हालाही भोगावे लागतील. जवळचा मित्र काही महत्त्वाच्या गोष्टी तुमच्याशी शेअर करील. एखाद्या कार्यक्रमात किंवा समारंभात सहभागी होण्याची संधी मिळेल.

  LUCKY SIGN - Basketball court

  सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

  आजचा दिवस हा मित्रमैत्रिणींसाठी, त्यांचा आनंद साजरा करण्यासाठी आहे. तुम्ही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली असेल, तर त्याचा तुम्हाला चांगला लाभ मिळेल. एखादं न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असेल, तर त्या बाबतीत सकारात्मक गोष्टी घडतील.

  LUCKY SIGN - A cardboard box

  कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

  चांगल्या गोष्टींना वेळ लागतो याची तुम्हाला जाणीव झाली असेलच. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, आता तुम्ही पूर्वी केलेल्या कामाचे फायदे मिळतील. एखादा संकटात सापडलेला जवळचा मित्र योग्य सल्ल्यासाठी तुमच्याकडे मदत मागू शकतो.

  LUCKY SIGN - A clear quartz

   

  तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

  बऱ्याच गोंधळानंतर आजचा दिवस शांत आणि सुविहितपणे पार पडेल. तुमचे नातेवाईक तुमच्या घरी मुक्कामासाठी येतील. त्यांच्या आदरातिथ्यामुळे तुम्हाला थकवा जाणवेल; पण तुमच्या कामाबद्दल चांगली बातमी मिळाल्याने तुम्ही त्याच वेळी उत्साहीही व्हाल.

  LUCKY SIGN - A syringe

  वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

  तुमच्या आयुष्यात नव्याने आलेल्या एखाद्या व्यक्तीशी तुमचं चांगलं जुळेल. त्या व्यक्तीच्या सहवासात तुमच्या चेहऱ्यावर सतत हास्य खुलेल. तुमच्या मनात बऱ्याच काळापासून एखादी गोष्ट घोळत असेल. आता ती गोष्ट बोलण्यासाठी आणि व्यक्त करण्यासाठी तुम्हाला बळ मिळेल.

  LUCKY SIGN - A kite

  धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

  दीर्घ काळानंतर तुम्ही तुमचं लक्ष केंद्रित करू शकाल. मन एकाग्र होईल. ज्या संशोधनात तुम्ही गुंतला आहात त्यात काही तरी ठोस निष्कर्ष मिळतील. तुमची शैक्षणिक वाटचाल प्रगतिपथावर असेल.

  LUCKY SIGN - A pillow

  मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

  नुकत्याच झालेल्या प्रशंसेमुळे आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहानं भारलेला असेल. आगामी काळात तुमच्या कामाला नवीन अर्थ, दिशा मिळेल. तुमच्या जवळच्या व्यक्तीवरच्या विश्वासाबाबत काही मुद्दे असू शकतात. पैसे विचारपूर्वक खर्च करा.

  LUCKY SIGN - A pharmacy

  कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

  तुम्ही आधी जे काम करत होतात, त्याकडे पुन्हा वळण्यासाठी तुम्हाला सेल्फ ड्राइव्ह पुशची म्हणजेच स्वत:ला त्याकडे ढकलण्याची गरज आहे. एखादा जवळचा मित्र तुम्ही त्याच्याबरोबर सहलीला यावं अशी अपेक्षा व्यक्त करील; मात्र सध्या पुढाकार घेऊ नये. तुम्हाला अधिक निधी उभा करण्याकरिता मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता भासेल.

  LUCKY SIGN - A wooden plank

  मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

  सध्या तुम्हाला आर्थिक बाबतींत काही अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे; मात्र हे तात्पुरतं असेल. लवकरच पैशांचे प्रश्न सुटतील. आर्थिक बाबी सुरळीत होतील. तुम्हाला छान वेशभूषा करून कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावंसं वाटेल.

  LUCKY SIGN - A rainbow crystal

  First published:

  Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion