मराठी बातम्या /बातम्या /religion /आजचे राशीभविष्य : एखादी चांगली संधी मिळेल आणि दिवस चांगला ठरेल

आजचे राशीभविष्य : एखादी चांगली संधी मिळेल आणि दिवस चांगला ठरेल

 प्रत्येक राशीचं 28 जानेवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य

प्रत्येक राशीचं 28 जानेवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य

प्रत्येक राशीचं 28 जानेवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 28 जानेवारी: सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studiowww.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 28 जानेवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

    मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

    तुम्ही काही तरी नवं सुरू करण्याचा प्रयत्न करत असलात, तर आजचा दिवस त्यासाठी चांगला आहे; पण तुम्ही त्यासाठी पुरेसा गृहपाठ केला असल्याची खात्री करूनच सुरुवात करा. तुम्ही स्वतःचं जे काही मूल्यमापन करता, त्यापेक्षा तुमची क्षमता खूप जास्त आहे. घरात एखादी पवित्र जागा तयार करण्याचा प्रयत्न करा.

    LUCKY SIGN - A mirror image

    वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

    तुम्ही जी मूलभूत तत्त्वं पाळता त्यांना चिकटून राहण्याचा प्रयत्न करा. त्यातूनच तुम्ही प्रगती करू शकाल आणि मनाची स्पष्टता तुम्हाला येऊ शकेल. निर्णय घेणं काही काळासाठी पुढे ढकलू शकता. आज एखादी चांगली संधी मिळेल आणि दिवस चांगला ठरेल.

    LUCKY SIGN - A red candle

    मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

    तुम्ही कोणाशी कोलॅबोरेशन करायचा विचार करत असलात, तर ही योग्य वेळ आहे. व्यापक पातळीवर तुमच्या सर्व प्लॅन्सबद्दल एकाच वेळी सगळी माहिती सांगू नये. ऊर्जा तुमच्या बाजूने आहे. त्यामुळे विनाकारण अति ताण घेऊ नये.

    LUCKY SIGN - A gemstone

    कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

    तुम्ही दाबून ठेवलेल्या भावना अशा एखाद्या व्यक्तीला दिसू शकतील की जी व्यक्ती तुम्हाला अंतर्बाह्य ओळखते. तुम्ही भावनिकदृष्ट्या कोणावर तरी खूपच अवलंबून आहात. ते योग्य नाही. तुम्ही स्वतःला वेगळं केलं पाहिजे आणि स्वतंत्रपणे वाटचाल केली पाहिजे.

    LUCKY SIGN - A yellow stone

    सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

    तुम्ही ज्या व्यक्तीला काही काळ भेटलेला नाहीत, अशा व्यक्तीकडून तुमचं चांगलं स्वागत होण्याची शक्यता आहे. तुम्हाला ऐशोआरामाच्या गोष्टींमध्ये रमावंसं वाटेल. तुमच्यापैकी काही जण परदेशात सुट्ट्या घालवण्याचं नियोजन करत असावेत. सध्या खेळ चांगल्या थेरपीसारखं काम करतील.

    LUCKY SIGN - A candle

    कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

    तुमच्यापासून लांब जात असलेल्या एखाद्या व्यक्तीशी तुम्ही रिलेशनशिपमध्ये असलात, तर भावनांपासून सुटका करून घेण्यासाठी संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे. तुमचा एकमेकांविषयीचा जिव्हाळा एकमेवाद्वितीय आहे. रोख रकमेचे व्यवहार करत असलात, तर सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

    LUCKY SIGN - A buddha statue

    तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

    तुमच्यातले नेतृत्वगुण आता सुधारत आहेत. तुम्हाला बारीकसारीक तपशील आणि पर्फेक्शन यांची आवड आहे. तुम्ही त्या गुणांचा वापर कराल. कोणी तरी दूरवरून तुमचं कौतुक करील. घरून आलेल्या चांगल्या बातमीमुळे तुमच्यात उत्साह वाढेल.

    LUCKY SIGN - An indoor plant

    वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

    काही व्यक्तींनी तुमच्या कार्यपद्धतीवर पूर्वी आक्षेप घेतला होता; मात्र आता तो नाही. आर्थिक लाभ मिळणं कायम राहील. लवकरच तुम्ही नव्या प्रॉपर्टीसाठी सह्या कराल.

    LUCKY SIGN - A chamber

    धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

    तुम्ही नव्या बिझनेस आयडियाबद्दल विचार करत असलात, तर ती लवकरच तुम्हाला अनुकूल ठरेल. पार्टनरशिपचीही शिफारस केली जात आहे. घरी शांतता मिळणं हे एक आव्हान आहे. सध्या रिस्क घेणं टाळा.

    LUCKY SIGN - A climber

    मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

    आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे. तुम्ही ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवत आहात, ती व्यक्ती विश्वासार्ह नाही. तुमच्याबद्दलची माहिती त्या व्यक्तीच्या माध्यमातून दुसरीकडे जाण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमचं त्यांच्यावरचं अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करू शकता. तुम्ही लवकरच एखाद्या रोड ट्रिपवर जाऊ शकता. कोणतीही शारीरिक जखम होणार नाही, अशा पद्धतीने ड्रायव्हिंग करा.

    LUCKY SIGN - A butterfly

    कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

    आज तुम्ही तुमची प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी व्यापक प्लॅन्स कराल; मात्र ते पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे. प्रयत्न करा, रिलॅक्स व्हा आणि योग्य वेळेसाठी वाट पाहा. कुटुंबीयांकडून, जोडीदाराकडून मिळालेला सल्ला सध्या तरी समर्पक वाटणार नाही.

    LUCKY SIGN - Canvas

    मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

    जे प्रतिसादाची वाट पाहत आहेत, त्यांना प्रतिसाद देणं हे अवघड काम असू शकेल. तुमच्या भूतकाळातल्या कृतींबद्दल तुम्हाला सध्या बराच अपराधीपणा वाटत आहे. तुमच्यासोबत पार्टनरशिप केलेली व्यक्ती कदाचित काही तरी विचित्र वागण्याची शक्यता आहे.

    LUCKY SIGN - Two feathers

    First published:

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion