मराठी बातम्या /बातम्या /religion /या राशीच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यता आहे !

या राशीच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यता आहे !

प्रत्येक राशीचं 28 डिसेंबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

प्रत्येक राशीचं 28 डिसेंबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

प्रत्येक राशीचं 28 डिसेंबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 29 डिसेंबर: सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 28 डिसेंबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

  मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

  सरप्रायझेस मिळण्याचं आणि सेलिब्रेशन करण्याचे योग असतील. नवीन युती आणि गुंतवणूक होण्याचे संकेत आहेत. वाटाघाटीदरम्यान शांत आणि कमी आक्रमक राहा. गंभीर विश्लेषण करण्यासाठी आपला वेळ घालवा.

  LUCKY SIGN - A Mannequin

  वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

  जर तुम्ही भूतकाळात कोणत्याही प्रकारच्या भावनिक त्रासाला सामोरे गेले असाल तर, तुम्हाला असं वाटू शकतं की तुम्ही त्याबाबत अलीकडच्या काळात संतुलन साधलं आहे. काही जुन्या प्रथा अडथळा ठरण्याची शक्यता आहे.

  LUCKY SIGN - A Role Model

  मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

  अचानक बदललेल्या प्लॅनमुळे तुमचा दिवस पूर्णपणे बदलू शकतो. तुम्हाला एखाद्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं जाऊ शकतं. त्या ठिकाणी एखाद्या नवीन व्यक्तीशी तुमची ओळख होऊ शकते. ही ओळख दीर्घकाळासाठी उपयुक्त ठरेल. आऊटडोअर अॅक्टिव्हिटीदरम्यान सतर्क रहा.

  LUCKY SIGN - A Silver String

  कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

  एखादी नवीन गोष्ट सुरू करण्यापूर्वी तुम्हाला थोडी काळजी वाटेल. पण, सकारात्मक फोर्सेस तुमच्यासोबत असल्याचं दिसत आहे. एखादा निर्णय घेण्याबाबत तुमच्या मनात संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये स्पष्टता येण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागू शकतो.

  LUCKY SIGN - A Rose Plant

  सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

  स्वतःच्या अटींवर गोष्टी पूर्ण करण्यासाठी हा दिवस योग्य आहे. त्यामुळे तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. तुम्ही सहजपणे इतरांना मागे टाकू शकाल आणि तुमची स्तुती होईल. आज तुम्ही जे काम करत आहात त्यासाठी तुम्हाला कदाचित लवकरच बक्षिसं मिळतील.

  LUCKY SIGN - A Sunrise

  तुम्हालाही मृत व्यक्ती नेहमी स्वप्नात दिसतात का? सावधान; हे असू शकतात यामागचे संकेत

  कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

  दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला काहीतरी नवीन करून पाहण्याची प्रेरणा मिळू शकते. तुम्हाला तुमच्या नित्यक्रमाचे फायदे जाणवण्याची शक्यता आहे. समस्यांचं तत्काळ निराकरण करण्यासाठी स्वतःला थोडी स्पेस द्या तसंच स्वत: साठी वेळ काढा.

  LUCKY SIGN - A Tall Building

  तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

  काळाच्या ओघात तुम्ही बर्‍यापैकी समजूतदार झाले आहात. त्यामुळे आता तुमच्याकडे परिस्थिती समजून घेण्याची आणि विश्लेषण करण्याची क्षमता आली आहे. तुमच्याकडून काहीतरी चांगलं होणं अपेक्षित आहे. तुमच्यावर अवलंबून असलेली एखादी जवळची व्यक्ती संकटात असू शकते.

  LUCKY SIGN - A Tan Wallet

  वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

  तुम्ही ज्याच्याशी कमिटेड आहात त्याच्यासाठी वेळेवर उपस्थित असणं तुमच्यासाठी प्राथमिक काम आहे. तुम्ही असं न केल्यास तुमच्या दोघांमध्ये नाराजी निर्माण होऊ शकते. तुम्ही प्रॉपर्टी डीलिंग करत असाल तर तुम्ही चांगल्या वेळेची वाट पाहू शकता.

  LUCKY SIGN - An Emerald

  धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

  अनेक संधी मिळण्याची शक्यता असल्यानं आजचा दिवस फार चांगला आहे. या संधी सध्या लहान वाटू शकतात पण, त्या मनोरंजक ठरतील. प्रलंबित निर्णयांबद्दल तुम्ही आत्ताच विचार केला पाहिजे. मेसेज आणि कॉल्सना रिप्लाय देणं ही चांगली बाब ठरू शकते.

  LUCKY SIGN - A Golden Embroidery

  मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

  विशेष लक्ष न देता नियमित दिवस घालवण्यासाठी एनर्जी चांगली दिसत आहे. पुढील प्लॅनिंग करण्यासाठी तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. एखादा मित्र अचानकपणे भेटण्याची शक्यता आहे. त्याच्या भेटीनं तुम्ही आनंदित व्हाल. पालकांच्या आरोग्याबाबत चिंता वाटू शकते.

  LUCKY SIGN - A Honey Bee

  कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

  तुम्हाला कदाचित खूप स्वप्नवत वाटत असेल. कदाचित तुम्हाला एखाद्याची खूप आठवण येत असेल. पण, तुम्ही वास्तविकतेकडे जाणं गरजेचं आहे. कामाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुमच्या जीवनाला नवी दिशा मिळेल अशी एखादी मनोरंजक संधी मिळू शकते.

  LUCKY SIGN - A Jute Bag

  मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

  जर तुम्ही तुमच्या मनातील भावना उघड केल्या तर तुम्हाला त्रास होण्याची भीती आहे. पण, जर तुम्ही तसं केलं नाही तर त्यामुळे . तुम्ही तुमच्या भावना लिहून ते संबंधित व्यक्तीपर्यंत पाठवू शकता. तुमची गुपितं माहिती असणाऱ्या अतिशय जवळच्या मित्रावर तुम्ही अवलंबून राहू शकता. अवलंबून राहण्यासाठी हा मित्र एकदम योग्य व्यक्ती आहे.

  LUCKY SIGN - A Lake

  First published:

  Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion