मुंबई, 27 मे: सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 27 मे 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.
दिवसाचा सारांश: आजचं 'ओरॅकल स्पीक्स' सर्व 12 राशींसाठी लव्ह लाइफ, करिअर, नातेसंबंध या बाबतीत आज काय होऊ शकते, याची झलक देतं आहे.
मेष (Aries) (21 मार्च ते 19 एप्रिल)
तुमचं लव्ह लाइफ भावनिक, रोमांचक दिसतेय. सुधारणेचा स्वीकार करून नव्यानं प्रेमाला सुरुवात करा. तुमच्यातील खंबीरपणा व जोश तुमच्या मित्रांना आवडेल. त्यांच्यासोबत एका आनंददायक सहलीचा प्लॅन करून तुमचं सामाजिक वर्तुळ वाढू द्या. खूप घाई न करता स्वतःच्या भावनांवर विश्वास ठेवण्यास शिका. इतर लोकांसोबत मनमोकळं राहताना तुमची स्वातंत्र्याची गरज नियंत्रणात ठेवा. तुमचं आर्थिक भविष्य उज्ज्वल दिसत आहे. गुंतवणूक किंवा आर्थिक विस्ताराच्या संधींमधून नफा मिळेल. तुमची आक्रमकता, दृढता तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. तुमच्या करिअरमध्ये आश्चर्यकारक प्रगती होण्याची शक्यता आहे. मनाचा समतोल राहावा, यासाठी योग किंवा ध्यान यावर लक्ष केंद्रित करा. नियमित व्यायाम करा. अपघाताची शक्यता असल्यानं सावध रहा. तुमच्या शरीराच्या गरजांकडे लक्ष द्या.
LUCKY Sign – Orchids
LUCKY Color – Baby Pink
LUCKY Number - 6
वृषभ (Taurus) (20 एप्रिल ते 20 मे)
एकनिष्ठ व दीर्घकाळ टिकणाऱ्या नातेसंबंधांमध्ये प्रेम अधिकच फुलत असतं. त्यामुळे लव्ह लाइफमध्ये मोकळ्या मनानं स्वत:ला व्यक्त करून प्रेमाच नातं आणखी मजबूत बनवा. तुमच्या निष्ठेमुळे तुम्ही एक विश्वासार्ह मित्र म्हणून ओळखले जाल. तुमच्या प्रियजनांना भेटण्याचं नियोजन करून नातेसंबंध आणखी घट्ट करा. स्वतःच्या हट्टी प्रवृत्तींवर मात करा. कुटुंबातील सदस्यांवर विश्वास ठेवून त्यांना प्रगती करण्यासाठी दिलेली संधी फायद्याची ठरेल. स्थिरता तसेच दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्ट्यांना प्राधान्य द्या. कारण बचत आणि गुंतवणूक सध्या फायदेशीर आहे. घाईघाईनं खरेदी करणं टाळा. तुमच्यामध्ये असणारी व्यावहारिकता, परिश्रम करण्याचा गुण हा करिअरला यशाकडे घेऊन जाईल. नोकरीच्या ठिकाणी उद्दिष्ट गाठण्यासाठी वचनबद्धता कायम ठेऊन संयम राखा. शांतता व विश्रांती शोधण्यासाठी स्वत:ला निसर्गाच्या सानिध्यात किंवा एखाद्या क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीमध्ये गुंतून घ्या. स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासोबतच निरोगी आहाराला प्राधान्य देणं फायद्याचं ठरेल. आरोग्याच्या दृष्टीनं मान व घसा यांच्याकडे लक्ष द्या.
LUCKY Sign – Sunglasses
LUCKY Color – Red
LUCKY Number - 2
मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)
लव्ह लाइफ मध्ये तुमच्या संवाद कौशल्यामुळे प्रेम आणखी फुलेल. अर्थपूर्ण संभाषणांमध्ये व्यस्त राहून स्वतःचे विचार व्यक्त करा. तुमचं अष्टपैलू व्यक्तिमत्व तुम्हाला एक चांगला मित्र बनवते. तुमच्या बुद्धिमत्तेची प्रशंसा करणाऱ्या लोकांसोबत संपर्क साधा. प्रियजनांना पाठिंबा देतानाच त्यांच्यासोबत स्वतःच्या समस्यांबाबत मनमोकळेपणानं बोला. इतरांवर विश्वास ठेवण्यास शिकल्यानं तुमचे संबंध दृढ होतील. आर्थिक बाबींकडे लक्ष देत घाईघाईनं होणारे खर्च कमी करा. उत्पन्न वाढवण्यासाठी नाविन्यपूर्ण मार्ग शोधा. अनुकूल वातावरणासोबतच तुमची बुद्धिमत्ता तुम्हाला यशाच्या दिशेनं घेऊन जाईल. नवीन आव्हाने स्वीकारून इतर व्यावसायिक निवडी एक्सप्लोर करा. तुमचं मन गुंतवून ठेवण्यासाठी इतरांसोबत संभाषणांमध्ये व्यस्त रहा, किंवा नवीन कौशल्ये शिकण्यास प्राधान्य द्या. मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. मानसिक आरोग्य सुधारणार्या ॲक्टिव्हिटीमध्ये व्यस्त राहण्यासोबतच थोडी विश्रांती घ्या.
LUCKY Sign – Abstract Art
LUCKY Color – Yellow
LUCKY Number – 25
कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)
लव्ह लाइफ मध्ये तुमच्या जोडीदारासोबत नातं भावनिकदृष्ट्या अधिक दृढ होईल. तुमच्या प्रियजनांची काळजी घेऊन आपुलकीनं त्यांच्यासोबत संवाद साधा. तुमच्या स्वभावामुळे तुमची विश्वासार्ह मित्र म्हणून ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमच्या जवळच्या मित्रांची भेट घेऊन आयुष्यभरासाठी एक चांगली आठवण निर्माण करण्याची संधी मिळेल. इतरांवर विश्वास ठेऊन मोकळेपणानं वागणं फायद्याचं ठरेल. नात्यातील रागलोभ सोडून द्या, नातं अधिक मजबूत होईल. आर्थिकदृष्ट्या काळजी घेऊन अनावश्यक जोखीम टाळा. खर्चाचं बजेट तयार करून बचत सुरू करण्यास ही योग्य वेळ आहे. तुमची चिकाटी आणि अंतर्दृष्टी तुम्हाला यशस्वी होण्यास मदत करेल. करिअरसंबंधी महत्त्वपूर्ण निर्णय घेताना, स्वतःच्या मनावर विश्वास ठेवा. विश्रांतीसाठी तुमचं घर सर्वांत उत्तम ठिकाण ठरेल. मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करून स्वत:ची काळजी घेण्यास सर्वोच्च प्राधान्य द्या. आरामदायी ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी व्हा.
LUCKY Sign – Buddha Statue
LUCKY Color – Turmeric Yellow
LUCKY Number - 10
सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)
तुमची लव्ह लाइफ प्रेमानं आणि उत्साहानं भरलेली आहे. तुमच्या भावना व्यक्त करून स्वतःचा प्रभाव पाडण्याची उत्तम संधी आहे. मित्रांमध्ये तुम्हाला एक लीडर म्हणून ओळखलं जात असल्यानं स्वतः पुढाकार घेऊन एखादा मेळावा आयोजित करा, व एक अविस्मरणीय अनुभव स्वतःसह इतरांना द्या. एखाद्या गोष्टीकडे लक्ष देण्याची तुमच्यामध्ये असणारी हातोटी व प्रियजनांवरील तुमचा विश्वास यामध्ये संतुलन साधणं फायद्याचं ठरेल. तुमच्या व्यतिरिक्त इतरांनासुद्धा संधी द्या. आर्थिक उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करून दीर्घकालीन स्थिरतेसाठी योजना बनवाल. खर्च टाळून विचार करून गुंतवणूक करा. आत्मविश्वास, कल्पनाशक्ती तुम्हाला नोकरीमध्ये यशाच्या दिशेनं नेईल. नेतृत्व करण्याची आलेली संधी स्वीकारून स्वतःच्या क्षमता सिद्ध करा. एखाद्या ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा छंदामध्ये स्वतःला व्यस्त ठेवून मुक्तपणे व्यक्त होण्याची ही संधी आहे. स्वत:ची काळजी घेण्यास प्राधान्य देऊन आत्मविश्वास वाढवणाऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये व्यस्त रहा. आरोग्याच्या दृष्टीनं हृदयाची काळजी घ्या.
LUCKY Sign– A Tumble Stone
LUCKY Color – Tangerine
LUCKY Number - 55
कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)
तुमची व्यावहारिकता, एखाद्या गोष्टीसाठी समर्पण करण्याची सवय तुमची लव्ह लाइफ अधिक दृढ करण्यास उपयुक्त ठरेल. सुसंवादी, संघटित भागीदारी तयार करण्यावर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला एक विश्वासार्ह मित्र बनवण्यासाठी तुमची एखाद्या गोष्टीकडे लक्ष देण्याची क्षमता व निष्ठा उपयुक्त ठरेल. एकमेकांना मदत करता येईल, अशा एखाद्या कार्य़क्रमाचं नियोजन करा. तुमच्या प्रियजनांच्या हेतूंवर विश्वास ठेवणं फायद्याचं ठरेल. तुमच्यामध्ये असणारी कमतरता इतरांना सांगून त्यावर चर्चा करण्यासाठी योग्य वेळ आहे. आर्थिक स्थिरता, बजेट यावर लक्ष केंद्रित करा. अनावश्यक खर्च टाळून दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेसाठी योजना करा. व्यवसायामध्ये असणारी तुमची दक्षता, कार्यक्षमता तुम्हाला व्यावसायिक यशाकडे घेऊन जाईल. शांतता मिळेल, अशा ॲक्टिव्हिटीमध्ये व्यस्त रहा. आरोग्याच्या दृष्टीनं पचनसंस्थेकडे लक्ष देऊन निरोगी दिनचर्या ठेवण्यासाठी प्रयत्न करा. तणाव कमी करण्यासाठी विश्रांतीला प्राधान्य द्या.
LUCKY Sign – Money Plant
LUCKY Color – Green
LUCKY Number – 44
तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)
लव्ह लाइफ मध्ये सामंजस्य दाखवणं योग्य ठरेल. दीर्घकालीन आनंदासाठी नातेसंबंधात निष्पक्ष भावना व तडजोड करण्याची तयारी ठेवा. तुमचा मुत्सद्दी स्वभाव तुम्हाला एक प्रिय मित्र बनवतो. त्यामुळे अशा कार्यक्रमाचं आयोजन करा जिथे तुमचे मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील, व वादांचं निराकरण होईल. सुसंवाद साधण्याची इच्छा व चिंता यामध्ये संतुलन ठेवा. नातं मजबूत करण्यासाठी मोकळेपणाने संवाद साधा. आर्थिक भागीदारी आणि सहकार्यांवर लक्ष केंद्रित करा. तुमच्या मूल्यांशी जुळणार्या, स्थिरता देणार्या संधी शोधा. इतरांना वाटणारं तुमचं आकर्षण, व मुत्सद्देगिरी ही तुमच्या करिअरमध्ये यश मिळवून देणारी संपत्ती आहे. कामाच्या ठिकाणी सुसंवाद साधून टीमसोबत प्रोजक्ट स्वीकारा. ध्यान करणं, कलात्मकता वाढवणं, अशा शांतता आणि सौहार्द वाढवणाऱ्या ॲक्टिव्हिटींमध्ये स्वतःला व्यस्त ठेवा. काम व विश्रांती यामध्ये संतुलन ठेवत स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यास प्राधान्य द्या. तुम्हाला आनंद देणार्या ॲक्टिव्हिटीमध्ये व्यस्त रहा.
LUCKY Sign – Floral Prints
LUCKY Color – Crimson
LUCKY Number – 33
Vastu Tips of Kitchen: घरातील किचनची दिशाही ठरवते नशिबाची दशा
वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)
तुमच्या लव्ह लाइफमध्ये उत्साह दिसेल. नातेसंबंधांमध्ये होणाऱ्या बदलामुळे मजबूत भावनिक संबंध निर्माण होतील. तुमच्यामध्ये असणारी जिद्द, इच्छाशक्ती ही तुम्हाला भावनिक मित्र म्हणून ओळख निर्माण करून देईल. एकनिष्ठ राहून तुमची मैत्री विश्वासाच्या बळावर टिकवून ठेवा. प्रेम व नातेसंबंधांवर विश्वास ठेऊन स्वतःमध्ये असणाऱ्या कमतरतेची भीती दूर करण्याची ही चांगली संधी आहे. आर्थिक क्षेत्रातील बदलांकडे लक्ष देऊन विस्ताराच्या शक्यता शोधा. आर्थिक सहकार्य करताना सावधगिरी बाळगा. तुमचा दृढनिश्चय तुम्हाला यशस्वी बनवेल. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेऊन नव्याने येणाऱ्या आव्हानांचा स्वीकार करा. स्व-शोध घेण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी होण्याची ही योग्य वेळ आहे. स्वतःचं भावनिक, मानसिक आरोग्य जपणं गरजेचं आहे. आत्मनिरीक्षण करण्यासाठी काही काळ घालवल्याने तुमची भावनिक दबावातून सुटका होण्यास मदत होईल.
LUCKY Sign – A Vase
LUCKY Color – Mauve
LUCKY Number – 23
धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)
लव्ह लाइफमध्ये रोमांच येण्याची शक्यता आहे. नवीन अनुभव घेताना मनमोकळेपणानं जोडीदाराशी संवाद साधा. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन हा तुमच्या मित्रांना तुमच्याकडे आकर्षित करतो. मित्रासोबत सहलीच नियोजन करून नव्या अनुभवांचा आनंद घेण्यासाठी योग्य वेळ आहे. तुमच्या प्रियजनांवरील विश्वासाची, त्यांना असणाऱ्या स्वातंत्र्याची तुम्ही तुमच्याशी तुलना करू शकता. परंतु नात्यातील आपलेपणा टिकवून ठेवण्यासाठी स्पष्टपणे संवाद साधणं फायद्याचं ठरेल. आर्थिक बाबींमध्ये भर कशी पडेल, याकडे लक्ष द्या. आर्थिक वाढीच्या शक्यता शोधून समजूतदारपणे गुंतवणुकीची जोखीम घ्या. तुमच्यामध्ये असणाऱ्या ऊर्जेला अनुकूल वातावरण असल्यानं ती तुम्हाला नवीन संधीच्या दिशेनं घेऊन जाऊ शकते. विविध रोजगाराच्या संधी निर्माण होतील, त्यामुळे नव्या बदलासाठी सज्ज राहा. नवीन ठिकाणं एक्सप्लोर करणं किंवा नवीन कौशल्यं आत्मसात करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घ्या. बाह्य ॲक्टिव्हिटीमध्ये व्यस्त राहून सक्रिय जीवनशैली जगण्यास प्राधान्य द्या. आरोग्याच्या दृष्टीने मांड्यांची काळजी घ्या.
LUCKY Sign – Camera
LUCKY Color – Green
LUCKY Number – 9
मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)
तुमची लव्ह लाइफ अधिक मजूबत होण्यासाठी तुमच्यातील वचनबद्धता, व्यावहारिकता हे गुण उपयुक्त ठरतील. एक मजबूत, दीर्घकाळ भागीदारी तयार करण्यासाठी तुमची ऊर्जा खर्च होऊ शकते. तुमची एक विश्वासार्ह मित्र म्हणून ओळख आहे. स्वतःच्या ध्येयाबद्दल मित्रांना सांगण्यासाठी, इतरांना प्रोत्साहन देण्यासाठी मित्रांची मीटिंग आयोजित करण्यासाठी योग्य वेळ आहे. प्रियजनांच्या विश्वासार्हतेवर, वचनबद्धतेवर विश्वास ठेवा, फायद्याचं ठरेल. स्वतःतील कमकुवतपणाबद्दल प्रामाणिकपणे इतरांसोबत चर्चा करू शकता. दीर्घकालीन नियोजन आणि आर्थिक स्थिरतेला प्राधान्य द्या. खर्च कमी करून पैशांची सुरक्षित गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल वेळ आहे. तुमची दृढता, आत्म-नियंत्रण व्यावसायिकदृष्ट्या यशाकडे घेऊन जाणारे ठरतील. तुमची उद्दिष्टे लक्षात ठेऊन काम करा. कामाची यादी बनवणं, भविष्यातील योजना बनवणं, यासह प्रोत्साहन देणाऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी व्हा. आरोग्याच्या दृष्टीनं स्वत:ची काळजी घेण्यास प्राधान्य देऊन काम आणि लाइफ यामध्ये संतुलन ठेवा. सांधे, हाडांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करणे टाळा.
LUCKY Sign – Herbs
LUCKY Color – Neon Green
LUCKY Number – 22
कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)
नात्याकडे बघण्याचा तुमचा वेगळा दृष्टिकोन हा तुमच्या लव्ह लाइफमध्ये प्रेम वाढवण्यास उपयुक्त ठरतो. स्वतःचं वेगळेपण स्वीकारून त्याला महत्त्व देणारा जोडीदार शोधा. तुमच्या मनमोकळ्या स्वभावामुळे तुम्ही एक उत्कृष्ट मित्र बनाल. बौद्धिक चर्चा करू शकाल, अशा मीटिंगचे नियोजन करा. स्वत:ला असामान्य वाटणाऱ्या गोष्टींवर वेळप्रसंगी विश्वास ठेऊन प्रियजनांसोबत आनंद साजरा करण्यास प्राधान्य द्या. मोकळेपणानं संवाद साधण्यावर भर द्या. आर्थिक स्वावलंबनावर लक्ष देऊन गुंतवणुकीची संधी शोधा. उत्पन्न मिळवण्यासाठी स्वतःच्या कल्पकतेचा उपयोग करा. तुमची क्रिएटिव्हीटी आणि बौद्धिक क्षमता करिअरला यशाकडे घेऊन जाईल. स्वतःच्या वेगळेपणाची क्षमता ओळखून चौकटीबाहेर जाऊन विचार करण्याची ही योग्य वेळ आहे. समविचारी लोकांशी संवाद साधण्यास मदत करणाऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी व्हा. तुमच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देऊन बुद्धिला चालना देणाऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये व्यस्त राहणे फायद्याचं ठरेल. मानसिक थकवा टाळण्यासाठी विश्रांती घ्या.
LUCKY Sign – A Copper Vessel
LUCKY Color – Electric Blue
LUCKY Number - 3
मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)
तुमची काळजी घेणाऱ्या जोडीदारामुळे तुमचं लव्ह लाइफ उत्तम राहील. सहानुभूतीपूर्वक विचार करून तुमच्या भावना मोकळेपणानं व्यक्त करा. तुमच्या संवेदनशीलतेमुळे तुमची ओळख ही एक मदत करणारा मित्र म्हणून आहे. मित्रांना भेटण्याचं नियोजन करून त्यांच्यासोबत भावनिकरित्या जोडले जाण्यासाठी योग्य वेळ आहे. स्वतःच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेऊन प्रियजनांविषयी संवेदनशील राहाल. आर्थिक बाबींवर लक्ष ठेवा, एखाद्याला जास्त पैसे देणे टाळा. स्थिरता आणि बजेट याकडे लक्ष द्या. तुमचं चातुर्य तुम्हाला व्यावसायिक यशाकडे घेऊन जाईल. तुमची कलात्मक बाजू एक्सप्लोर करा. तुमच्या अंतर्ज्ञानी स्वभावाला स्पर्श करू शकतील अशा ध्यान किंवा इतर आरामदायी ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी व्हा. भावनिकतेला प्राधान्य देणाऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये व्यस्त रहा. आरोग्याच्या दृष्टीनं पायांकडे लक्ष देऊन मैदानी व्यायामाला प्राधान्य द्या.
LUCKY Sign – Elephant Miniature Statue
LUCKY Color – Steel Grey
LUCKY Number - 5
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Life18, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion18