मराठी बातम्या /बातम्या /religion /आजचे राशीभविष्य : अनुभवी व्यक्तीने दिलेला सल्ला तुम्हाला उपयोगी पडू शकतो

आजचे राशीभविष्य : अनुभवी व्यक्तीने दिलेला सल्ला तुम्हाला उपयोगी पडू शकतो

 प्रत्येक राशीचं 27 जानेवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य

प्रत्येक राशीचं 27 जानेवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य

प्रत्येक राशीचं 27 जानेवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 27 जानेवारी: सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studiowww.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 27 जानेवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

  मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

    प्रत्येक राशीचं 27 जानेवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य

  तुमच्या कामाच्या विस्तारीकरणासाठी काही नवीन मार्ग दिसतील. गेले काही महिने तुम्हाला आई-वडिलांबद्दलची काही चिंता सतावत होती, ती चिंता लवकरच दूर होईल. तुम्ही सुटकेचा निःश्वास टाकाल. कामाच्या पार्टनरशिपसाठीची एखादी कल्पनाही पुढे येऊ शकेल.

  LUCKY SIGN – A tatoo

  वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

  काही व्यक्तींना तुमच्या आयुष्यात काही विचित्र गोष्टी करायला आवडतात. तुम्हाला अशा काहींना सामोरं जावं लागतं. पूर्वीच्या तुलनेत तुम्हाला नियतीचा सगळ्यात जास्त पाठिंबा मिळणार आहे. तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल तर कदाचित तुमच्या एखाद्या रिसोर्सबद्दल तात्पुरती समस्या उद्भवू शकते.

  LUCKY SIGN - A salt lamp

  मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

  तुम्ही इतके दिवस कशावर तरी काम करत होतात, त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रात असलात, तर तुम्हाला तुमच्या कामाच्या विस्तारीकरणासाठी चांगल्या डीलबद्दल कळू शकेल. छोट्या व्यावसायिक गटांना कदाचित कर्जमंजुरी मिळू शकेल.

  LUCKY SIGN – A nightingale

  कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

  तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची शक्यता आहे किंवा प्रगल्भ असं ज्ञान देणाऱ्या दुर्मीळ अशा ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाशी तुमची भेट होऊ शकते. सहली किंवा प्रवासाची शक्यता आहे. एखाद्या अगदी छोट्याशा वादाचं रूपांतरही कदाचित मोठ्या वादात होऊ शकतं.

  LUCKY SIGN – A ropeway

  सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

  एखादी भूमिका मिळू शकते किंवा एखादी ऑडिशन पास होऊ शकाल. तुमचं नशीब फळफळणार आहे. घरातली बाजू कदाचित अजूनही थोडीशी डळमळीत असेल.

  LUCKY SIGN – A golden gate

  कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

  सगळं तुमच्या अ‍ॅटिट्यूडवर अवलंबून आहे. तुमच्याकडे संधी आधीच चालून आलेली आहे आणि आता ती तुम्हाला योग्य रीतीने हाताळून तुमचा ठसा उमटवण्याची गरज आहे. ती कदाचित तुमच्या अपेक्षांपेक्षा थोडी वेगळी असेल; पण त्यासाठी तुम्हाला पूर्ण समर्पण वृत्तीने काम करण्याची आवश्यकता आहे.

  LUCKY SIGN – A silver wire

  तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

  तुमचे हेतू हेच सर्व काही आहे. चांगल्या हेतूसाठी समर्पित भावनेने काम करा, म्हणजे सगळं आपोआप नीट होईल. तुमच्या मनात इतरांबद्दल बऱ्याच शंका आहेत. त्या नकारात्मकतेमुळे तुमच्या सुरळीत होणाऱ्या कामात अडथळे येत आहेत. शेजारी कदाचित तुमच्या गोष्टींमध्ये जास्तच नाक खुपसतील.

  LUCKY SIGN – A glass tumbler

  वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

  तुम्ही तुमचा फोकस अगदी नेमका केलेला आहे आणि तुमचं मनही त्यावर केंद्रित केलं आहे. तुमचा फोकस इतका नेमका असल्यामुळे तुमच्या आजूबाजूच्या व्यक्ती त्याबद्दल किंचित सावध आहेत. तुम्हाला हव्या तशा गोष्टी करून घेण्यासाठी याचा तुम्ही फायदा करून घ्यायला हवा.

  LUCKY SIGN - A green aventurine

  धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

  अन्य व्यक्तींवर अति टीका करणं आता तुम्हाला थांबवण्याची गरज आहे. तुमच्याकडे तुमचे अनुभव असतीलही; पण त्यामुळे एखाद्याच्या खासगी आयुष्यावर अतिक्रमण होत असेल तर त्याचं अजिबातच कौतुक होत नाही. कितीही काळजी वाटत असली तरी दोन पावलं मागे या.

  LUCKY SIGN – A lake

  मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

  संवाद प्रभावी होण्यासाठी बाकीच्या व्यक्तींचा काही प्रमाणात विश्वास जिंकावाच लागतो. कामाच्या ठिकाणी काही वरिष्ठ तुमच्या कामावर समाधानी नसतील. तुमच्या हातात कदाचित आता दोन ते तीन संधी असतील; पण त्यापैकी कोणतीही संधी व्यवहार्य वाटत नाही.

  LUCKY SIGN – A white candle

  कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

  मानसिक आरोग्य आणि स्थैर्य हे सध्या तुमच्यासाठी सगळ्यात जास्त काळजीचे विषय आहेत. सध्या तुमच्या मनात खूप विचार असतील आणि त्यानेच तुमचं मन व्यापलेलं असेल. त्यामुळे, जे नेमकं करायचं आहे, ज्याकडे तुम्हाला लक्ष द्यायची गरज आहे, त्याकडे कदाचित तुम्ही बसून शांतपणे लक्ष देऊ शकणार नाही. तुमच्या अस्वस्थपणावर नियंत्रण मिळवण्याची गरज आहे, स्वत:वर लक्ष केंद्रित करा आणि थोडीशी ध्यानधारणा, चिंतन करा.

  LUCKY SIGN - A black tourmaline

  मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

  हृदयाच्या जवळच्या गोष्टी अवघड होण्याआधी त्या बसून सोडवण्याची गरज आहे. छोट्या छोट्या गोष्टी मनात ठेवल्या, तर त्यामुळे अंतर, दुरावा वाढत जाईल. एखाद्या अनुभवी व्यक्तीने दिलेला सल्ला तुम्हाला उपयोगी पडू शकतो. तुम्ही लवकरच एखादं गेट टुगेदर किंवा लग्नसोहळ्याला हजेरी लावू शकता.

  LUCKY SIGN – A red scarf

  First published:

  Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion