मुंबई, 25 मे: सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 25 मे 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.
तुमचा वैश्विक मार्ग खुला करा : राशिचक्रासाठी ओरॅकल इनसाइट्स – नातेसंबंध, करिअर, प्रेम आणि बरंच काही! काय आहे तुमच्या नशिबात?
दिवसासाठीचा सारांश : मेष राशीच्या लोकांनी आज आपल्या नात्यांमध्ये सामंजस्य आणि संतुलन साधण्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. नवीन रोमँटिक सहवासाचा आनंद घ्यावा. वृषभ राशीच्या व्यक्तींनी कौटुंबिक नातेसंबंध जोपासताना आपल्या नोकरीत स्थैर्य आणि सातत्यपूर्ण प्रगतीला प्राधान्य द्यावं. मिथुन राशीच्या व्यक्तींनी अनुकूलता स्वीकारणं गरजेचं आहे. नातेसंबंधांमध्ये नवीन शक्यतांचा शोध घ्यावा. यासोबतच बिझनेसमध्ये प्रगतीसाठी संवादाचा वापर करावा. या राशींच्या व्यक्तींनी आपल्या वैयक्तिक ऊर्जेला वाव द्यावा आणि सामंजस्याने निर्णय घ्यावेत असं या दिवसाचं रीडिंग सांगत आहे.
मेष (Aries) (21 मार्च ते 19 एप्रिल)
तुमच्या नात्यांमध्ये सामंजस्य आणि समतोल शोधा. नवीन प्रेमासाठी आणि अनुभवासाठी तयार रहा. तुमची ऊर्जा एकाच दिशेने लावा आणि कामाच्या ठिकाणी नवीन आव्हानं स्वीकारा. ऑफिसमधील गोंधळात सहभागी होणं टाळा, शक्यतो तटस्थ रहा. स्वतःकडे लक्ष देण्याला प्राधान्य द्या. संतुलित जीवनशैली फॉलो करा. कौटुंबिक नातेसंबंध मजबूत करून आनंददायी वातावरण निर्माण करा.
LUCKY Sign – Chrysanthemums
LUCKY Color – Peach
LUCKY Number - 4
वृषभ (Taurus) (20 एप्रिल ते 20 मे)
आपल्या नात्यांमध्ये प्रामाणिकपणा आणि मोकळा संवाद जोपासा. तुमच्या लव्ह लाईफमधील स्पार्क कायम ठेवण्यासाठी थोडी पॅशन निर्माण करा. कामाच्या ठिकाणी स्थिर प्रगतीवर लक्ष द्या. विनाकारण वादात पडू नका. व्यावसायिकता कायम ठेवा. सध्या आराम करण्याला प्राधान्य द्या आणि ताण-तणाव कमी करण्यासाठी उपाय शोधा. कुटुंबाला अधिक वेळ द्या, आणि कुटुंबातील सदस्यांना प्रोत्साहन द्या. यामुळे कौटुंबिक संबंध अधिक मजबूत होतील.
LUCKY Sign – A Fancy Gift
LUCKY Color – Purple
LUCKY Number - 1
मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)
तुमचे नातेसंबंध फ्लेक्सिबल असूद्यात. नात्यांमधील बदलांचा स्वीकार करा. लव्ह लाईफमधील उत्साह टिकवून ठेवण्यासाठी नवनवीन पर्यायांचा शोध घ्या. लवचिकता स्वीकारा आणि विविध क्षेत्रांमध्ये संधींचा शोध घ्या. कोणत्याही प्रकारच्या अफवांना खतपाणी घालू नका. सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा. तुमच्या संवादकौशल्यांचा उपयोग करून बिझनेसचा विस्तार वाढवा. मानसिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्या. कुटुंबामध्ये मुक्त संवाद ठेवा, आणि कुटुंबातील सदस्यांच्या वैयक्तिक विकासाला प्रोत्साहन द्या.
LUCKY Sign – Coaster Seat
LUCKY Color – Mustard
LUCKY Number - 9
सौंदर्यासाठी महिलांना का महत्त्वाचे आहेत 16 श्रृंगार, जाणून घ्या धार्मिक कारणे
कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)
रिलेशनशिपमध्ये असणाऱ्यांनी आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त करणं गरजेचं आहे. भावनिक बंध कायम ठेवा. तुमच्या जोडीदारासाठी एक सुरक्षित आणि प्रेमळ वातावरण तयार करा. करिअरसंबंधी निर्णय घेताना तुमचं मन काय सांगतंय ते ऐका. तुमचा स्वभाव अगदी पोषक असा आहे. याचा फायदा घ्या, आणि दुसऱ्यांना मदत करणाऱ्या एखाद्या व्यवसायाची सुरूवात करा. स्वतःच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या. कुटुंबातील सदस्यांसाठी एक प्रेमळ आणि पोषक असं वातावरण तयार करा.
LUCKY Sign – Pigeon
LUCKY Color – Aquamarine
LUCKY Number - 16
सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)
रिलेशनशिपमध्ये असलेल्या व्यक्तींनी आधी स्वतःला ओळखा. स्वतःचा स्वभाव जाणून घेऊन, तो व्यक्त करा. कामाच्या ठिकाणी नेतृत्वगुण दाखवता येतील अशी पदं आणि आव्हानं स्वीकारा. ऑफिसमध्ये आनंदी रहा, आणि कामातून आत्मविश्वास दिसू द्या. तुमच्या विशेष कल्पनांना सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करा. स्वतःकडे लक्ष देण्याला प्राधान्य द्या, आणि तुम्हाला आनंद देतील अशा गोष्टी करा. आपले वेगळेपण साजरे करा, आणि मनातील इच्छा इतरांना सांगा.
LUCKY Sign – A pyramid crystal
LUCKY Color – Canary Yellow
LUCKY Number - 29
कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)
मुक्त आणि वास्तववादी संवाद साधा. आपलं प्रेम आणि आपुलकी दाखवण्यासाठी साध्या पण प्रभावी मार्गांचा वापर करा. कामाच्या ठिकाणी छोट्याछोट्या गोष्टींकडे लक्ष द्या, आणि पद्धतशीर दृष्टिकोन ठेवा. अनावश्यक वाद टाळा आणि डोकं शांत ठेवा. कंपनीच्या यशासाठी काटेकोर नियोजन आणि संघटन यांची आवश्यकता आहे. तब्येतीकडे लक्ष द्या. संतुलित आहार ठेवा. प्रॅक्टिकल जेश्चर आणि लहान-सहान गोष्टींकडे लक्ष देऊन तुमचा पाठिंबा दाखवा.
LUCKY Sign – Amethyst sphere
LUCKY Color – Baby Pink
LUCKY Number - 33
घरातील कलह, वास्तुदोष दूर करण्यासाठी नक्की करा मोरपिसांचे हे उपाय
तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)
रिलेशनशिपमध्ये असलेल्या व्यक्तींनी नात्यामध्ये सामंजस्य आणि समतोल वाढवण्याची गरज आहे. प्रेमामध्ये समानता जोपासा. दोन्ही बाजूंनी समान प्रयत्न दिसायला हवेत हे लक्षात घ्या. नात्यांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करा. कामाच्या ठिकाणी मुत्सद्देगिरी कायम ठेवा आणि एकमत प्रस्थापित करण्यावर भर द्या. बिझनेसमध्ये पार्टनरशिप आणि कोलॅबरेशन प्रस्थापित करा. आपल्या दिनचर्येत सेल्फ केअरशी संबंधित गोष्टींचा सहभाग करा. कुटुंबामध्ये एक व्यवस्था जपण्याचा आणि शांतीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करा.
LUCKY Sign – Glass decor
LUCKY Color – Deep Red
LUCKY Number - 23
वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)
रिलेशनशिपमध्ये येणारे बदल स्वीकारा, आणि तीव्र भावनिक संबंधांना प्राधान्य द्या. रोमँटिक लाईफमध्ये उत्कटता येऊ द्या. कामाच्या ठिकाणी तुमच्या मनाचे ऐका आणि प्रगतीच्या संधी शोधा. ऑफिसमधील राजकारणात पडू नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि सावधगिरी बाळगा. आतापर्यंत डावलत असलेल्या संधी स्वीकारा आणि आपल्या संसाधनशीलतेचा स्वीकार करा. भावनिक आरोग्याला प्राधान्य द्या. कुटुंबात पारदर्शकता आणि समजूतदारपणा यामुळे विश्वास वाढेल.
LUCKY Sign – A Golden frame
LUCKY Color –Royal Blue
LUCKY Number - 54
धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)
नात्यांमध्ये बौद्धिक उत्तेजना शोधा. यामध्ये जोखीम असू शकते, मात्र ती स्वीकारा. रोमँटिक लाईफमध्ये अनिश्चिततेचे स्वागत करा, आणि नवीन शक्यतांचा शोध घ्या. कामाच्या ठिकाणी तुम्हाला एक्साईट करणारे पर्याय पडताळून पाहा, आणि आपल्या तत्त्वांचं पालन करा. नोकरीत प्रामाणिकपणा आणि सचोटी राखा. तुम्हाला आवडणारी तसंच जोखीम असणारी प्रोजेक्ट स्वीकारा. जीनवशैली सक्रिय ठेवा आणि नवीन अनुभवांचा शोध घ्या. कुटुंबामधील प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व ओळखा आणि स्वीकारा. तसंच, नवीन गोष्टी शिकण्याला प्रोत्साहन द्या.
LUCKY Sign – Camera
LUCKY Color – Green
LUCKY Number - 9
मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)
आपल्या संवादात विश्वासार्हता आणि बांधिलकी दिसू द्या. प्रेमामध्ये निष्ठेच्या माध्यमातून भक्कम पाया तयार करा. करिअरमध्ये लाँग-टर्म गोलवर लक्ष ठेवा आणि त्यानुसार शिस्त बाळगा. कामाच्या ठिकाणी चातुर्याने आणि दूरदृष्टी वापरून नाती सांभाळा. बिझनेसमध्ये यश मिळवण्यासाठी व्यावहारिकता आत्मसात करा आणि परिपूर्ण योजना बनवा. वर्क-लाईफ बॅलन्स करण्यावर भर द्या, आणि तुम्हाला सोयीचं असं वेळापत्रक तयार करा. तुमच्या मुलांसाठी घरामध्ये सुरक्षित आणि सपोर्टिव्ह वातावरण तयार करा.
LUCKY Sign – Magnet
LUCKY Color – Lavender
LUCKY Number - 66
कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)
नात्यांमध्ये परस्परांचा वेगळेपणा जपा, तसंच एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर करा. तुमच्या व्यक्तिमत्वाला अनुसरून असामान्य रोमँटिक पार्टनर शोधा. कामाच्या ठिकाणी नवीन संधींचा फायदा घ्या आणि आपला कल्पक कल कोणत्या दिशेने आहे ते जाणून घ्या. निरर्थक वादांपासून दूर रहा, आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोन ठेवा. आपल्या क्रिएटिव्ह बाजूचा फायदा घ्या, आणि तुमची तत्त्वं प्रतिबिंबित करणारी प्रोजेक्ट हाती घ्या. शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आणि भावनिक आरोग्याला प्राधान्य द्या. एकमेकांच्या उद्दिष्टांना पाठिंबा द्या, आणि व्यक्तिमत्त्वाला प्रोत्साहन द्या.
LUCKY Sign – A lampshade
LUCKY Color – Off White
LUCKY Number - 7
मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)
आपल्या नात्यांमध्ये सहानुभूती आणि करुणा या भावनांवर भर द्या. प्रेमात असलेल्या व्यक्तींनी आपल्या जोडीदाराची संवेदनशीलता स्वीकारून, त्यानुसार भावनिक संबंध जोपासा. कामाच्या ठिकाणी तुमच्या मनाचं ऐका आणि त्यानुसार वागा. ऑफिसमधील गोंधळात विनाकारण अडकू नका. आवश्यक त्या मर्यादा पाळा. बिझनेसमध्ये यश मिळवण्यासाठी आपल्या अंतर्मनावर विश्वास ठेवा आणि आपल्या क्रिएटिव्ह क्षमतांचा वापर करा. स्वतःकडे लक्ष द्या आणि तणाव दूर करणाऱ्या गोष्टींमध्ये सहभागी व्हा. कुटुंबामध्ये एक प्रेमळ वातावरण तयार करा जे भावनिक कल्याणाला प्रोत्साहन देईल.
LUCKY Sign – Salt Lamp
LUCKY Color – Parrot Green
LUCKY Number - 61
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Life18, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion