मराठी बातम्या /बातम्या /religion /कसा असेल 25 मार्चचा दिवस? ओळखीची व्यक्ती विश्वासघात करू शकेल

कसा असेल 25 मार्चचा दिवस? ओळखीची व्यक्ती विश्वासघात करू शकेल

प्रत्येक राशीचं 25 मार्च 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

प्रत्येक राशीचं 25 मार्च 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

प्रत्येक राशीचं 25 मार्च 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 25 मार्च : सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 25 मार्च 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

  मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

  आजचं वेळापत्रक हेक्टिक असेल; पण आजचा दिवस काही तरी सकारात्मक बातमी आणेल. तुमच्या टीमला तुमच्याकडून अधिक इंटरॅक्टिव्हिटीची गरज आहे. घरच्या आघाडीच्या व्यवस्थापनासाठी तुमच्या जोडीदाराचं साह्य मिळेल.

  LUCKY SIGN - A rose bouquet

  वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

  अधिकाधिक व्यक्तींना तुमचा दृष्टिकोन स्पष्ट होण्यास आता सुरुवात होईल. बिझनेसमनसाठी आजचा दिवस आणि पुढचा आठवडा चांगला असेल. साधा दृष्टिकोन आज उपयुक्त ठरेल. पेपरवर्क अधिक शिस्तबद्धपणे ठेवणं गरजेचं आहे.

  LUCKY SIGN - A new pen

  मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

  आज तुमचे प्लॅन्स नीट अंमलात येत नसल्यासारखं वाटलं, तरी काळजी करू नका. लवकरच तुम्हाला यश मिळायला सुरुवात होईल. ऐन वेळच्या प्रसंगासाठी ऐन वेळीच उपाय करावे लागतात. तुम्ही एक्सची वाट पाहत असलात, तर तो/ती परत येण्याची शक्यता आहे. दिवसाच्या ऊर्जेवर वैयक्तिक आयुष्याचं राज्य असेल.

  LUCKY SIGN - A feather on the floor

  कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

  कोणाला तरी मदत केल्यानंतर तुम्हाला खरा आनंद अनुभवता येईल. ओळखीची व्यक्ती विश्वासघात करू शकेल आणि तुम्हाला त्याबद्दल कळेलही. छोटे वाद खूप मोठे होईपर्यंत ताणण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांना आज प्रत्यक्ष आयुष्यातले शिकण्याचे अनुभव मिळतील.

  LUCKY SIGN - A flickering light

  सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

  एखाद्या गैरसमजुतीमुळे भविष्यात मनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्य असतानाच गोष्टी स्पष्ट करा. पार्टनरला तुमच्याबद्दल पझेसिव्ह वाटेल. दुपारच्या वेळेस तुम्हाला कंटाळवाणं किंवा त्रासदायक वाटण्याची शक्यता आहे. तुमच्या आईला तुमच्या मदतीची गरज भासण्याची शक्यता आहे.

  LUCKY SIGN - An old bicycle

  कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

  कौतुक करणाऱ्या प्रामाणिक प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत येतील आणि दिवस आनंदात जाईल. आजची तुमची ऊर्जा आठवडा कसा जाईल ते ठरवील. कामाच्या ठिकाणी सलोखा निर्माण करा. स्वतःसाठी थोडा वेळ काढा.

  LUCKY SIGN - An old photograph

  तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

  आज तुमची सर्व प्रकारची भीती लांब ठेवा. आजचा दिवस विजयाचा आणि भविष्याबद्दलचं नियोजन करण्याचा आहे. जवळचा मित्र जेलस असू शकतो. तुमचे गुप्त/जवळचे प्लॅन्स जाहीर करू नका. कारण त्यामुळे त्य प्लॅन्सची सुरुवातीच्या काळातली ऊर्जा नाहीशी होऊ शकते. हलका आहार घ्या.

  LUCKY SIGN - A dreamcatcher

  वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

  तुमच्या कल्पना पुढे मांडण्याची संधी मिळेल. परदेशातली एखादी व्यक्ती तुमच्या प्रयत्नांची दखल घेईल आणि कौतुक करील. कोणाला तरी सरप्राइज देण्याचा तुमचा प्लॅन यशस्वी होईल. तुमचे वडील तुमच्याकडे कदाचित मदत मागतील.

  LUCKY SIGN - A flying kite

  धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

  तुमच्या आयुष्यातली खरी संपत्ती म्हणजे तुमचं कुटुंब आहे आणि तुम्हाला त्यांचं बिनशर्त सहकार्य मिळेल. आरोग्यविषयक काही किरकोळ समस्या उद्भवू शकतील. कामाच्या ठिकाणी गोंधळापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. बँकेच्या कामाविषयी सावधगिरी बाळगा.

  LUCKY SIGN - A bitter taste

  मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

  एखादा गंभीर गैरसमज होणं टाळता येईल. तुमची भावनिक बाजू काळजीचं कारण ठरू शकेल. आउटिंगचा प्लॅन ठरू शकेल. तुमचे आई-वडील तुमच्याशिवाय प्रवासाचा बेत आखतील.

  LUCKY SIGN - A locket

  कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

  सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहून किंवा संगीत ऐकून स्वतःला रिलॅक्स करा. काम तुलनेने कमी असेल; मात्र तुम्ही व्यग्र राहाल. काही जणांना डोकेदुखी त्रास देईल. कुशल कामगारांसाठी इच्छापूर्तीचा दिवस असेल.

  LUCKY SIGN - A black gate

  मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

  आज तुमचं मन तुमच्यावर क्लृप्त्या खेळेल. शांत व्हा आणि आतल्या आवाजावर लक्ष केंद्रित करून ऐका. काही मित्र तुम्हाला कॉल करतील आणि तुमचा उत्तम संवाद होईल. परदेशातल्या नाटेवाईकांकडे एखादी आश्चर्यचकित करणारी बातमी असेल.

  LUCKY SIGN - A copper wire

  First published:
  top videos

   Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion