मराठी बातम्या /बातम्या /religion /कसा असेल 24 मेचा दिवस? भावनिक बंध जुळण्याला प्राधान्य द्या

कसा असेल 24 मेचा दिवस? भावनिक बंध जुळण्याला प्राधान्य द्या

 प्रत्येक राशीचं 24 मे 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

प्रत्येक राशीचं 24 मे 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

प्रत्येक राशीचं 24 मे 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

  मुंबई, 24 मे: सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 24 मे 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

  तुमची क्षमता उलगडा. तुमच्या कॉस्मिक प्रवासात प्रेम, यश आणि सलोखा यांचा शोध घ्या.

  दिवसासाठीचा सारांश : आज मेष राशीच्या व्यक्ती व्यक्तिगतता जपताना रिलेशनशिप्समध्ये सलोखा तयार करतील. करिअरमधल्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवावा. ऑफिसमध्ये ऑथेंटिक आणि डिटॅच्ड राहावं. वृषभ राशीच्या व्यक्ती रिलेशनशिप्समध्ये विश्वास तयार करतील आणि संयम बाळगतील. रोमान्समध्ये स्थिरता शोधा. सखोलतेतून करिअरमध्ये यश मिळेल. ऑफिसमध्ये संघर्ष टाळा. कर्क राशीच्या व्यक्ती रिलेशनशिप्समध्ये भावनिक बंधाला प्राधान्य देतील. रोमान्समध्ये जवळीक आणि विश्वासाचा शोध घ्या. करिअरमध्ये अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवा. सिंह राशीच्या व्यक्ती रिलेशनशिप्समध्ये धाडसीपणाने प्रेम व्यक्त करतील. रोमान्समध्ये पॅशनला महत्त्व द्या. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी क्रिएटिव्हिटी आणि लीडरशिपला प्राधान्य द्या. ऑफिसमध्ये संघर्षाच्या पलीकडे जा. नव्या व्हेंचर्समध्ये करिष्मा आणि आत्मविश्वास दिसेल. आजच्या राशिभविष्यातल्या या काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत.

  मेष (Aries) (21 मार्च ते 19 एप्रिल)

  पार्टनरशिपमध्ये परस्परांचा युनिकनेसचा आदर करा आणि सलोखा प्रस्थापित करा. पॅशन आणि धाडस या तुमच्या आवडीच्या गोष्टी आहेत. नव्या गोष्टींसाठी तयार राहा. तुमच्या आतल्या आवाजाचं ऐकलंत आणि धाडसाने पुढे जात राहिलात, तर यश प्राप्त करता येईल. ऑफिसमधल्या भांडणांपासून दूर राहा आणि प्रामाणिक राहा. स्वतःच्या विकासावर लक्ष केंद्रित करा. तुमच्याकडे क्रिएटिव्ह कल्पना असतील आणि तुम्ही लवचीक असलात, तर तुमच्या नव्या बिझनेसची प्रगती होईल. तुमचं शरीर, मन आणि स्पिरिट यांच्यामध्ये आरोग्यपूर्ण संतुलन राखा. त्यातून तुमचं संपूर्ण स्वास्थ राखलं जाईल. तुम्हाला समजून घेतलं जावं असं वाटत असेल, तर प्रेम आणि सहानुभूतीने संवाद साधा.

  LUCKY Sign - 4 Leaf Clover

  LUCKY Color - Royal Blue

  LUCKY Number - 22

  वृषभ (Taurus) (20 एप्रिल ते 20 मे)

  विश्वास आणि टिकून राहणं हे तुमचे पायाभूत गुणधर्म आहेत. नातेसंबंध विकसित होण्यास वेळ लागतो. प्रेमाचा आनंद घ्या, पॅशनेट काळात उत्साहाने साजरा करा, संवेदनशीलता अंगी बाणवा. काही समस्या असल्यास तुमच्या धैर्याचा वापर करून सोडवा. सातत्याने पुढे वाटचाल करत राहण्यातून करिअर चांगलं घडेल. खरेपणा कायम राखा, सत्तेसाठीच्या संघर्षापासून दूर राहा आणि एकत्रितपणे काम करण्यावर लक्ष केंद्रित करा. तुमची ध्येयं वास्तववादी ठेवा आणि त्यांवर लक्ष केंद्रित करा. सातत्यपूर्ण प्रयत्नांतून यश मिळेल. स्वतःची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तुमच्या शरीराचं पोषण करा आणि शारीरिक कृतींचा आनंद घ्या. तुमच्या कुटुंबीयांसाठी मजबूत पायाभरणी करा आणि सपोर्टिव्ह वातावरणनिर्मितीसाठी गुंतवणूक करा.

  LUCKY Sign - A Clear Quartz Crystal

  LUCKY Color - Violet

  LUCKY Number - 4

  मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

  गांभीर्याने संवाद साधणं हे नातेसंबंध विकसित होण्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे संवादाचा आधार घ्या आणि तुमच्या मनातलं प्रामाणिकपणे बोला. तुमच्या रोमँटिक मीटिंग्जमध्ये उत्स्फूर्तता येऊ द्या. प्रेमाच्या प्लेफुल स्वरूपाचा आनंद घ्या. लवचीक आणि जुळवून घेणाऱ्या माइंडसेटचा स्वीकार करा. नव्या संधी मिळण्यासाठी बदलाचं स्वागत करा. पक्षपाती न होता आणि विनम्र राहून गॅप्स भरून काढण्यावर लक्ष केंद्रित करा. तुमच्यातल्या जुळवून घेण्याच्या अंगभूत क्षमतेचा अंगीकार करा, वेगवेगळ्या पर्यायांचा तपास करा. लवचिकता हा तुमच्या यशाचा महत्त्वाचा मार्ग असेल. मानसिक आरोग्य राखणं आणि इंटलेक्चुअल स्टिम्युलेशनचा शोध घेणं महत्त्वाचं आहे. खुल्या चर्चेत सहभागी होऊन तुमच्या कुटुंबाचा बौद्धिक विकास घडवा.

  LUCKY Sign - Aroma Diffuser

  LUCKY Color - Neon Pink

  LUCKY Number - 12

  घरातील कलह, वास्तुदोष दूर करण्यासाठी नक्की करा मोरपिसांचे हे उपाय

  कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

  भावनिक बंध जुळण्याला प्राधान्य द्या. तुमच्या प्रिय व्यक्तींसाठी प्रेमळ वातावरण तयार करा. हळवेपणा अंगी बाणवा. भावनिक जवळीक आणि विश्वास यांचा शोध घ्या. प्रेमाच्या बाबतीत तुमच्या मनाचं ऐका. आतल्या आवाजाचं ऐका आणि अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवा. त्यातून तुमची प्रोफेशनल कामं पूर्ण होतील. सहवेदना आणि सहकार्य कायम राखा. कामाचं वातावरण हेल्दी राहण्यासाठी दुसऱ्याचं मन जाणण्याच्या क्षमतेचा वापर करा. भावनिक बुद्धिमत्ता विकसित करा आणि दुसऱ्यांचं मन जाणणारे लीडर व्हा. त्यातून तुमचा नवा बिझनेस यशाकडे जाईल. तुमच्या भावनिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करा. स्वतःची काळजी घेण्याच्या कामांमध्ये आनंद शोधा. गरज पडेल, तेव्हा मदत मागा. कुटुंबात भावनिक नातेसंबंध विकसित करा, प्रेमळ वातावरण विकसित करा.

  LUCKY Sign - An eagle

  LUCKY Color - Crimson

  LUCKY Number - 55

  सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

  पॅशनचा स्वीकार करा आणि तुमच्या प्रिय व्यक्तीशी खात्रीशीर संवाद साधा. तुमच्या संवादातून तुमच्या मनाचं प्रतिबिंब उमटू द्या. रोमान्सच्या उत्साहात सहभागी व्हा. आराधना वाढवा. तुमची नवं काही तरी शोधण्याची आणि नेतृत्व करण्याची क्षमता वापरा. तुमच्या या युनिक क्षमतांमुळे यशप्राप्ती होईल. मतभेदांच्या वर या आणि चांगलं उदाहरण घालून द्या. तुमच्या खरेपणामुळे बाकीच्यांना प्रेरणा मिळेल. तुमच्या नव्या व्हेंचरला तुमच्या आकर्षकपणामुळे आणि इच्छेमुळे चालना मिळेल. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतः व्यक्त होण्याला प्राधान्य द्या. कलात्मक उपक्रमांमध्ये समाधान शोधा. तुमचा अंतरीचा दिवा मार्ग दाखवील. सामर्थ्याचा न संपणारा स्रोत बनून तुमच्या प्रिय व्यक्तींना आराम आणि आनंद द्या.

  LUCKY Sign - Hand Woven Carpet

  LUCKY Color - Midnight Blue

  LUCKY Number - 24

  कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

  खऱ्या आणि थेट, सरळ संवादावर लक्ष केंद्रित करा. एकमेकांवर विश्वास ठेवा. तुमच्या रोमँटिक प्रयत्नांमध्ये विश्वासार्हता आणि स्थिरता शोधा. एकनिष्ठतेमुळे प्रेम टिकतं आणि वाढतं. बारीकसारीक तपशीलांकडे लक्ष द्या आणि तुमच्या नोकरीत काळजी घ्या. तुमच्या प्रयत्नांचं चीज होईल. तुमच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा, शिस्त राखा. अर्थहीन वादांमध्ये सहभागी होणं टाळा. तुमचं विश्लेषणकौशल्य स्वीकारा. बारीकसारीक तपशीलांकडे लक्ष द्या. नव्या बिझनेससाठी उत्तम प्लॅनिंग गरजेचं आहे. तुमच्या आयुष्याच्या सर्व पैलूंमध्ये संतुलन राखा. स्वतःच्या स्वास्थ्याला प्राधान्य द्या. तुमच्या प्रिय व्यक्तींना ठोस मदत करा, स्थिरता द्या. तुमची त्यांची किती काळजी करता ते तुमच्या कृतीतून दाखवून द्या.

  LUCKY Sign - A Sandalwood Stick

  LUCKY Color - Cream

  LUCKY Number - 1

  तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

  नातेसंबंधांत सलोखा आणि संतुलन राखा. समानता आणि निःपक्षपातीपणा अंगी बाणवा. प्रेम आणि सौंदर्याचं कौतुक करा. आकर्षकपणा तुमच्या प्रेमात धाडसाला मार्ग दाखवू शकेल. प्रोफेशनल बाबतींत टीमवर्क आणि डिप्लोमसीला प्रोत्साहन द्या. सर्वांच्या उपयोगी पडणारी सोल्युशन्स काढा. कामाच्या ठिकाणी शांतता आणि निष्पक्षपातीपणाला प्राधान्य द्या. समस्या, भांडणं समजून घेऊन सोडवा. नव्या व्हेंचरच्या यशासाठी युती, आघाडी करून, एकत्र येऊन काम करणं ही महत्त्वाची बाब ठरेल. काम, रिलेशनशिप्स आणि स्वतःची काळजी यांमध्ये संतुलन साधा. कुटुंबात सलोख्याचं वातावरण तयार करा. निष्पक्षपातीपणा आणि समजून घेण्याची क्षमता तयार होण्यासाठी धडपड करा.

  LUCKY Sign - An Indoor Plant

  LUCKY Color - Tan

  LUCKY Number - 8

  वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

  अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवा आणि भावनिक जवळिकतेत खोलवर प्रवेश करून तुमच्या नात्यात होणारं परिवर्तन पाहा. पॅशनला आपलंसं करा. भावना दाबून टाकणं सोडून द्या आणि प्रेमात पडा. तुमच्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवून तुमच्या क्षमतेचा स्वीकार करा. तुमच्या क्षमतेचा वापर करा. मॅनिप्युलेटिव्ह वर्तन टाळा. बुद्धिमत्ता आणि बारीकसारीक तपशीलांच्या अभ्यासासह पॉवर डायनॅमिक्समध्ये जा. तुमच्या नव्या व्हेंचरमध्ये परिवर्तन आणि रि-इन्व्हेंशनला प्राधान्य द्या. जुनी रूटीन्स सोडून द्या आणि बदल स्वीकारा. हीलिंग आणि परिवर्तनाचा सर्व पातळ्यांवर स्वीकार करा. आरोग्या चांगलं राहण्याकरिता भावनिक बॅगेज सोडून द्या. तुमच्या जवळच्या मित्रांच्या गटात दृढ आणि भावनिक बंध जोपासा. परिवर्तनाच्या कठीण काळात एकमेकांना मदत करा.

  LUCKY Sign - Peacock Feather

  LUCKY Color - White

  LUCKY Number - 33

  धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

  पार्टनरशिप्समध्ये उत्स्फूर्तता आणि धाडसाचं स्वागत करा. एकत्रितपणे स्वातंत्र्य आणि प्रगती करता येईल असे मार्ग शोधा. ताजे अनुभव आणि जोडलं जाण्यासाठी शोध घ्या. प्रेमाच्या बाबतीत मुक्तपणे फिरण्यास तुमच्या स्पिरिटला वाव द्या. भटकंती करा. तुमची क्षितिजं विस्तारण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आवडीच्या गोष्टी करा. मन खुलं ठेवा, वेगवेगळे दृष्टिकोन स्वीकारा. लवचीक नसलेल्या आराखड्यांतून स्वतःला मर्यादित करणं टाळा. तुमचा धाडसी स्वभाव जोपासा, कॅल्क्युलेटेड रिस्क्स घ्या. नव्या एंटरप्राइझच्या यशासाठी कल्पनाशक्ती आणि लवचिकता या बाबी महत्त्वाच्या ठरतील. शारीरिक हालचाली कायम राखा. आनंद देणाऱ्या शारीरिक हालचाली करा. मानसिक, भावनिक आरोग्याला प्राधान्य द्या. तुमच्या जवळच्या वर्तुळात वैयक्तिक विकास आणि शोध घेण्याला वाव द्या, एकमेकांच्या उद्दिष्टांसाठी साह्य करा.

  LUCKY Sign - Horseshoe

  LUCKY Color - Grey

  LUCKY Number - 9

  सौंदर्यासाठी महिलांना का महत्त्वाचे आहेत 16 श्रृंगार, जाणून घ्या धार्मिक कारणे

  मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

  रिलेशनशिप्समध्ये सातत्य आणि अवलंबित्व या गोष्टी स्वीकारा. विश्वासाच्या आधारे मजबूत पाया तयार करा. प्रेमाच्या बाबतीत कमिटमेंट आणि दीर्घकालीन सुरक्षिततेचा शोध घ्या. हळू, मात्र सातत्यपूर्ण प्रयत्नांनी शर्यत जिंकता येते. फोकस आणि शिस्त कायम राखा. कष्ट आणि समर्पणामुळे तुम्हाला प्रोफेशनल पातळीवर यश मिळेल. जमिनीवर राहा. वैयक्तिक विकासावर लक्ष केंद्रित करा. विनाकारण सत्तेसाठी लढाई लढू नका. नव्या एंटरप्राइजसाठी मजबूत प्लॅन तयार करून तुमची व्यवहार्यता आणि शिस्त राखा. शिस्तबद्ध वेळापत्रक आखून हेल्दी वर्क-लाइफ बॅलन्स राखा. स्वयंशिस्तीला प्राधान्य द्या. कुटुंबाला सुरक्षितता आणि साह्य द्या, कृतींतून तुमचं प्रेम व्यक्त करा.

  LUCKY Sign - Opal

  LUCKY Color - Green

  LUCKY Number - 2

  कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

  रिलेशनशिप्समध्ये खुलेपणा, स्वातंत्र्य या बाबींना प्रोत्साहन देताना व्यक्तिगतताही जपा. युनिक आणि विचारांना चालना देणाऱ्या रिलेशनशिप्सचा शोध घ्या. रोमान्ससाठी मैत्रीचा पाया असू द्या. क्रिएटिव्ह आणि नावीन्यपूर्ण पद्धतीने विचार करा. त्यातून प्रोफेशनल अचीव्हमेंट्स साध्य होतील. नावीन्याची कास धरा. वस्तुनिष्ठ राहा, योग्य अंतर राखा. मतभेदांना कारण लक्षात घेऊन खुल्या मनाने सामोरे जा. वेगळा विचार करा. क्रिएटिव्हिटी दाखवा. मानसिक, भावनिक आरोग्याला पहिलं स्थान द्या. बुद्धिमत्तेला चालना देणाऱ्या कृतींमध्ये सहभागी व्हा. युनिकनेसचा कायम प्रयत्न करा. पीअर ग्रुपमध्ये खुल्या संवादाला प्रोत्साहन द्या.

  LUCKY Sign - A Cactus

  LUCKY Color - Brown

  LUCKY Number - 11

  मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

  संवादात सहवेदना आणि इतरांचा विचार करून दृढ भावनिक बंध तयार करा. प्रेमाच्या शक्तीला शरण जा. तुमच्या रोमँटिक अनुभवांना इमॅजिनेशनची जोड द्या. आतल्या आवाजाचं ऐका, अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवा. तुमच्या प्रोफेशनमध्ये तुमची संवेदनशीलता हा अत्यंत महत्त्वाचा फायद्याचा गुण आहे. कामाच्या ठिकाणी सहवेदना, इतरांचा विचार करणं याला प्रोत्साहन द्या. 'ऑफिस ड्रामा'मध्ये अडकणं टाळा. अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवा आणि क्रिएटिव्हिटीने काम करा. नव्या व्हेंचरसाठी इमॅजिनेशनच्या माध्यमातून मार्गदर्शन घ्या. भावनिक आरोग्याला प्राधान्य द्या. क्रिएटिव्ह बाबींमध्ये सहभागी व्हा. कलात्मक बाबींमध्ये भाग घ्या. कुटुंबाला निरपेक्ष प्रेम द्या, साह्य करा, भावनिक नातेसंबंध विकसित करा, समजून घ्या.

  LUCKY Sign - Wooden Desk

  LUCKY Color - Fuchsia

  LUCKY Number - 40

  First published:
  top videos

   Tags: Astrology and horoscope, Life18, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion